काळजी
लागवडीपूर्वी सुमारे ३५ सें.मी. खोल नांगरणी करण्याची शिफारस केली जाते. झाडांचे उरलेले अवशेष जमिनीत गाडण्यास यामुळे मदत होते ज्यामुळे जमिनीचा कस सुधरतो. तणांसाठी नियमितपणे निरीक्षण करावे आणि काढणीनंतर शेताची तातडीने नांगरणी करावी ज्यामुळे पुढच्या वसंत ऋतुतील लागवडीसाठी शेत रिकामे असेल. पेरणी सुमारे ४-५ सें.मी. खोलीवर करावी. हेक्टरी सुमारे २.५ किलो बियाण्याचे प्रमाण शिफारस केली जाते व त्याबरोबर २०० किलो संतुलित खतांचा सरासरी वापर करावा. ओळीत बियाणांमध्ये ७.५ सें.मी. चे अंतर राखावे. कपाशीच्या शेतात हेक्टरी १-२ मधमाशांची पोळी राखल्यास फायदेशीर ठरते. ज्या भागात पाऊस फार कमी पडतो, तिथल्या कपाशीच्या शेतात पेरणीपूर्वी आणि फुलधारणा ते बोंडे उघडेपर्यंत सिंचन करावे लागते.
माती
पाण्याचा निचरा जर चांगला होत असेल तर कापूस बहुतेक कोणत्याही प्रकारच्या जमिनीत घेता येते. तरीपण कमाल उत्पन्न मिळविण्यासाठी वालुकामय मध्यम जमिनी ज्यात पुरेशी चिकणमाती, सेंद्रिय घटक आणि नत्र आणि स्फुरदाचा मध्यम साठा आहे त्या आदर्श असतात. किंचित उतार उपयुक्त ठरू शकते ज्यामुळे पाणी नियंत्रितपणे एका दिशेने निचरा होते. कपाशीच्या चांगल्या वाढीसाठी जमिनीचा सामू ५.८ ते ८ दरम्यान गरजेचा आहे आणि इष्टतम श्रेणी ६-६.५ आहे.
हवामान
कपाशीच्या पीकाला इष्टतम वाढीसाठी मोठा दवमुक्त काळ, अति उष्णता आणि भरपूर सुर्यप्रकाशची गरज असते. ऊबदार आणि आर्द्र हवामानासोबत ६० ते १२० सें.मी.चा मध्यम पाऊस अनुकूल असतो. जर जमिनीचे तापमान १५ अंशाखाली असेल तर कपाशीची बियाणे उगवत नाहीत. सक्रिय वाढीच्या काळात २१-३७ अंशचे तापमान आदर्श असते. सर्वसामान्य कपाशीची झाडे काही काळासाठी ४३ अंशापर्यंतचे तापमान देखील नुकसान न होता तग धरु शकतात. पक्वतेच्या (उन्हाळ्यात) आणि वेचणीच्या (शरद ऋतुत) काळात वारंवार पाऊस पडल्यास कपासाचे उत्पादन कमी होते.