काळजी
बीन (फरसबी, वाल घेवडा) ही भारतातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाणारी भाजी आहे. हिरव्या कवळ्या शेंगांना शिजवुन भाजी म्हणुन खाल्ले जाते. कोवळ्या शेंगांना ताज्या, फ्रोजन किंवा डबाबंद करुन विकले जाते. हे महत्वाचे कडधान्य पीकही आहे आणि हरभरा किंवा वाटाण्याच्या तुलनेत याची उत्पादन क्षमता खूप जास्त आहे.
माती
गादीवाफे भूसभुशीत पण घट्ट जमिनीसह पुरेशी आर्द्रता आणि तण तसेच रोपांचे अवशेष नसणारे असावेत. आम्ल जमिनींना पेरणीपूर्वी चुनखडी वापरून आम्लता कमी करावी. जमिन तयार करण्यासाठी पॉवर टिलर किंवा कुदळीने जमीन २ ते ३ वेळा नांगरली पाहिजे. शेवटच्या नांगरणीच्या वेळी पेरणीसाठी जमिनीत भुसभुशीत करण्यासाठी थापटणी केली जाते.
हवामान
या पिकाच्या योग्य वाढीसाठी १०-२७ अंश तापमान आदर्श असते. ३० अंशावर तापमान गेल्यास फुलगळीची गंभीर समस्या होऊ शकते आणि तापमान ५ अंशाखाली गेल्यास फांद्या आणि विकसित होणार्या शेंगांचे नुकसान होऊ शकते.