आम्ही जगभरातील छोट्या शेतकर्यांना आणि कृषी-किरकोळ विक्रेत्यांना मदत करू इच्छितो. एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञान, माहिती विश्र्लेषण आणि वैज्ञानिक संशोधन वापरुन योग्य उपाय प्रदान करणे, शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि शेतीची उत्पादकता वाढवणे हे आमचे ध्येयआहे.
आपल्या कृषी प्रणालीचा कणाच मजबूत करण्यावर आमचा भर आहे - छोटे शेतकरी आणि कृषी किरकोळ विक्रेते. आमचे दोन अॅप, प्लँटिक्स आणि प्लँटिक्स पार्टनर हे फक्त टूलच नाहीत; तर ते कृषी उद्योगात होऊ घातलेल्या क्रांतीची पायाभरणी आहे, ज्यातुन शेतकर्यांना त्यांचे उत्पन्न वाढविण्यात मदत मिळेलच तसेच कृषी किरकोळ विक्रेतेही त्यांच्या शेतकरी समुदायास चांगली सेवा देऊ शकतील.
आमची ब्रँड मूल्ये, आम्ही कशावर विश्वास ठेवतो आणि आमचा व्यवसाय कसा निवडतो हे दर्शवितात. ती मार्गदर्शक तत्त्वे आहेत जी आपण केलेल्या प्रत्येक गोष्टीला साकारतात.
जर्मनी आणि भारतात कार्यालये असलेली एक आंतरराष्ट्रीय कंपनी म्हणुन, सर्व स्तरातील आणि विविध सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना समान संधी प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे. प्रगती, कल्पकता आणि प्रामाणिकपणाला महत्त्व देणारी, प्रत्येकजण भरभराट करु शकेल असे वातावरण निर्माण करणार्या कार्यस्थळातील संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही समर्पित आहोत.