पपयांवरील विषासणुजन्य केवडा   रोग - पपई

पपई पपई

N

Konti favarni gheu ani khat pan shendriy

Jhadach shenda pivla padun vad khuntli ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
T

Hello dear Nilesh Hivare how are you dear the symptom i suspected seem to be Papaya Mosaic Virus dear spray amino acid+bifenthrine because virus can be spread from insects dear

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

Nilesh Hivare व्हायरस चा प्रादुर्भाव दिसत आहे बुरशी नाशकाची फवारणी करावी.व जिवामृत द्यावे. ॥ बुरशी नाशके (विषाणू ) ( एक एकर साठी.)॥ ०१. २०० लि.पाणी. २० लि.गाळलेले जीवामृत ०२. १०० लि.पाणी ५ ते ६ लि.आंबट ताक ( आंबट ताक हे चांगले बुरशी नाशक, विषाणू नाशक आहे तसेच संजीवक व जंतूरोधक आहे. ) ०३. एका भांड्यात २ लि.पाणी घ्या,त्यामध्ये २०० ग्रॅम सुंठ पावडर टाका व चांगले ढवळून घ्या व झाकन ठेऊन त्या द्रावणाला ऊकळा. अर्धे झाल्यावर विस्तव बंद करून थंड होऊ द्या दुसर्‍या भांड्यामध्ये २ लि.दुध घ्या व ते मंद आचेवर एक उकळी येऊ द्या मग त्याला थंड होऊ द्या. २०० लि पाण्यामध्ये वरील सुंठ व दुध मिसळून चांगले ढवळा, दोन तास तसेच ठेवा. त्यानंतर गाळून घ्या व फवारणी करा. ( हे द्रावण ४८ तासाच्या आत वापरावे.) ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य बलशाली करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

॥ जिवामृत.॥ ( पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी ) ++ जिवामृत बणविन्यासाठी साहित्य :- पाणी २०० लिटर गोमूत्र २० लिटर शेण १० किलो ( देशी गायींचे ) गुळ १ किलो. बेसन १ किलो. ++ कृती :- २०० लि.पाण्यात २०. लि गोमुत्र व १० किलो शेण मिसळावे,त्यात गुळ बारीक करून टाकावा व बेसण थोड्या पाण्यामध्ये कालवून पातळ करून त्यात टाकावे. वरील मिश्रण तीन दिवस घडाळ्याच्या काट्याप्रमाणे दिवसातून २ वेळा २ मिनीटं ढवळणे. पिंप सावलीत बारदाणाने झाकून ठेवावा. तीन दिवसांनी तयार झालेले जिवामृत सांगितल्या प्रमाणे देणे. तसेच नुसते जिवामृत रोपांना पाण्यासोबत दर २१ दिवसांनी दिले किंवा फवारणी केली तरी पिकांची वाढ चांगली होते व पिक जास्त तसेच पौष्टिक चवदार होते,रोगराई कमी होते, २०० लिटर एक एकर साठी पुरते. ++ ( देशी गायीच्या गोमूत्रात असणारे घटक.) नत्र ( नायट्रोजन ),सफुर ( फॉस्फरस ),पलाश (पोटॅश ),अमोनिया,सोडीअम,कॅल्शिअम,सल्फर ( गंधक ),तांबे ,लोह (आर्यन ),मॅंगनीज ,सुवर्णक्षार,अन्य खनिजे कार्बोनिक आम्ल,एन्झाईम, संजीवके, व जीवनसत्व A.B.C.D.E. व लाक्टोज असते.तसेच मायक्रोरायझा बुरशी पण असते.याचा वापर शेतीमध्ये वारंवार केला तर कालांतराने ती निर्माण होते. ++( देशी गायीच्या एक किलो शेणात असणारे घटक.) नत्र ( नायट्रोजन ) २० ग्रॅम,पलाश २७ ग्रॅम, स्फुरद ९ ग्रॅम, गंधक ४ ग्रॅम, कॅल्शिअम २८ ग्रॅम,मोलेब्डेनिअम ३ ग्रॅम, मॅग्नेशियम २०० मिली, जस्त २०० मिली, तांबे २५ ते ३० ग्रॅम, बोरॉन ३० ते ४० ग्रॅम,कोबाल्ट ३ मिली ग्रॅम व कोटीच्या संख्येत अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे उपयोगी जिवाणू असतात. ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य बलशाली करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)

3वाईट मतप्रदर्शन
K

फवारनीसाठी किती प्रमाण घ्यावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा