मावा - भेंडी

भेंडी भेंडी

D

भेंडी पिकावरील मावा व वाढ खुंटली

भेंडी पिकावर मावा आहे व वाढ खुंटली आहे

3वाईट मतप्रदर्शन
V

Dipak Ghadge माव्याच्या Aphids नियंत्रणासाठी रोगर + असेफेट चि फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

Dipak Ghadge ॥ निमास्त्र ॥ ( रस शोषक किडी,पांढरी माशी,मावा,तुडतुडे व लहान अळ्यांचे नियंत्रण होते.) साहित्य : पाणी २०० लिटर. गोमूत्र १० ते २० लिटर ( देशी गायींचे ) शेण २ किलो. (देशी गायीचे ) कडुलिंबाचा पाला. १० किलो किंवा निंबोळी पावडर/ पेंड १० किलो. कृती : वरील सर्व पदार्थ एका ड्रम किंवा पिंपात २०० लि.पाण्यामध्ये मिसळून सवेगतीने चांगले ढवळणे. ४८ तास सावलीखाली गोणपाटाणे ठेवणे. ४८ तासानंतर तयार होईल. २०० लि.एका एकर साठी वापरावे पाणी मिसळू नये. ६ महिने टिकते. रस शोषक किडींचे फक्त नियंत्रण होते,पाण खाणार्‍या अळींचे नियंत्रण होत नाही. रस शोषक किटकांचा आमावस्याला रात्री प्रकोप होतो ,आमावस्याच्या २ दिवस आधिपासून त्यांचा प्रभाव वाढायला सुरवात होते, तेंव्हा आमावस्याच्या २ ते ३ दिवस आधी फवारणी करावी. ॥ माव्याचे सेंद्रिय नियंत्रण ॥ १५ लि. पंम्प साठी साहित्य : १ लि.पाणी. १०० ग्रॅम मैदा ५ लिंबू १०० ते २०० ग्रॅम गुळ २५० मिली गोमूत्र एक लहान बादली कृती : बादलीत पाणी घेऊन त्यात मैदा टाकून तो व्यवस्थित एकजीव करावा. नंतर गोमूत्र मिसळावे. लिंबू कापून पिळून त्याचा रस मिश्रणात टाकावा. सर्वात शेवटी गुळ मिसळावा. एक रात्र तसेच ठेवायचंय. दुसर्‍या दिवशी वापरावे. वापर : वरिल मिश्रण १५ लि.साठी आहे . फवारणी सकळी किंवा संध्याकाळी करावी परिणाम चांगला मिळतो. यातील गुळ व मैद्याचे मिश्रण माव्याच्या अंगावर पडले की त्या मिश्रणामुळे माव्याचे बारीक पाय एकमेकांना चिकटतात व माव्याचीअन्न खाण्याची क्रिया बंद पडते व तो मरून जातो. ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य बलशाली करा. नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)

4वाईट मतप्रदर्शन
A

Bhendi vathi sati Kay upai

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
B

प्रती एक पंपासाठीचे प्रमाण आहे का सर हे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Bhimrao Tongale माव्याचे सेंद्रिय नियंत्रण, १५ लिटर च्या पंम्पसाठी आहे.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा