इतर

स्टोन फळांची मर

Valsa cincta

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पिवळे-नारिंगी आणि काळे डाग सालीवर येतात ज्यातुन नंतर पिवळसर तपकिरी चिकट स्त्राव गळतो.
  • सालीवरील कँकर्स जे फांद्यांना वेढत वाढतात.
  • खोलगट रंगहीन भाग आणि छोट्या काटक्यांवरील निस्तेज पाने दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

3 पिके
जर्दाळू
चेरी
पीच

इतर

लक्षणे

पिवळे-नारिंगी आणि काळे भाग सालीवर येतात ज्यातुन नंतर चिकट स्त्राव गळतो ह्या रुपात संक्रमण दिसते. चिकट स्त्राव सुरवातीला पिवळसर तपकिरी रंगाचा असतो जो रोगाच्या वाढीबरोबर हळुहळु गडद तपकिरी होत जातो. अखेरीस फांद्या आणि काटक्यांवर कँकर्स येतात आणि बुरशीची वाढ वहनाच्या भागात होत असल्याने ती त्याच्या वरच्या लाकडी भागाला तोपर्यंत वेढत रहाते जोपर्यंत मर होत नाही. साल मरुन सुकुन जाते पण पहिल्या हंगामात शाबूत रहाते. तरीपण, काही वर्षात, खोलगट रंगहीन भागात चिकट स्त्रावाखाली फिकट आणि गडद केंद्रित वर्तुळे दिसतात जी मृत भाग आणि काळ्या बुरशीच्या जास्त वाढीशी क्रमश: संबंधित असतात. प्रभावित भागांवर झाडे पोखरणारे हल्ला करतात जे भरपूर विष्ठा मागे सोडतात. संक्रमित काटक्यांच्या बेचक्यात चिकट स्त्राव आणि मराची लक्षणे दिसतात. जेव्हा फांद्या किंवा काटक्यांवरील संक्रमण गंभीर होते तेव्हा पानांवर लक्षणे दिसतात, जी पिवळी, निस्तेज होतात आणि अखेरीस मरतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

राईच्या तेलाचे द्रावण थेट कँकर्सवर वापरल्याने त्यांची वाढ सीमित होते आणि लक्षणांची गंभीरताही कमी होते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कप्तान, रोव्हराल, टॉपस्पिन किंवा कॅल्शियम प्रोपियोनेटसारखे सक्रिय घटक असलेले उत्पादांचे फवारे ५-६ वेळा मारले जाऊ शकतात किंवा ओलेत्या काळात छाटणीनंतर लगेच वापरले जाऊ शकता. प्रतिकार विकसित न होण्यासाठी रसयाने अदलुन बदलुन वापरा.

कशामुळे झाले

सिटोस्पोरा किंकटा (आज त्याला व्हॅल्सा नावाने ओळखले जाते) नावाच्या बुरशीमुळे सिटोस्पोरा (किंवा व्हॅल्सा) कँकर हा फार विध्वंसक रोग होतो. हा पुष्कळ प्रकारच्या फळझाडांना, ज्यात येतात, पीच, अॅप्रिकॉट,प्लम आणि चेरीची झाडे, ह्यांना प्रभावित करतो. ज्या बागांची काळजी घेतली जात नाही, जुन्या आहेत किंवा निष्क्रियतेच्या काळातील ताण ज्यांवर आहे त्यांवर बहुतेक वेळा संक्रमण होते. थंडीत जेव्हा गोठण्यापेक्षा थोडे जास्त तापमान असते तेव्हा सालीवर बुरशी वाढते पण जेव्हा झाडाची वाढ वसंत ऋतुत परत सुरु होते तेव्हा थांबते. सालीवरील यांत्रिक जखमांतुन मुख्यत: संक्रमण होते, इतर बुरशींमुळे कँकर्स होतात आणि गोठलेल्या दवामुळे, ऊन्हाने भाजण्यामुळे, किंवा कीटकांमुळे झाडांच्या भागांना जखमा होतात. जास्त आर्द्रता (खासकरुन ९०% पेक्षा जास्त), पाऊस आणि फार काळ पाने ओली रहाणे ह्यामुळे रोगाच्या घटना आणि गंभीरता वाढते. कँकर्स सिंचनाच्या पाण्यामुळे सतत ओले रहाण्यानेही बीजाणू तयार होणे आणि प्रसारित होण्यास बढावा मिळतो. तरीपण कमी सापेक्ष आर्द्रता बुरशीच्या जीवनचक्रात बाधा आणते. बीजाणू पावसाच्या उडणार्‍या किंवा वार्‍याने वहाणार्‍या पाण्याने, कीटकांद्वारे, पक्षांद्वारे आणि शेतीच्या घातक सवयींमुळे पसरतात.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोतांकडुन रोगमुक्त रोपणीचे सामान घ्या.
  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • सिटोस्पोरा संक्रमणाचा इतिहास नसलेली जागा निवडा.
  • बागेतुन पाण्याचा निचरा चांगला होईल ह्याची काळजी घ्या आणि फक्त कोरड्या काळातच पाणी द्या.
  • सालीवर कँकर्स दिसतायत का हे पहाण्यासाठी बागेचे नियमितपणे निरीक्षण करा.
  • संतुलित खते द्या आणि नत्राचा जास्त वापर टाळा.
  • रोपांचे संक्रमित भाग कोरड्या काळात काढुन टाका आणि गंभीर संक्रमण असल्यास पूर्ण झाडच काढुन टाका.
  • काढलेले रोपाचे भाग बागेपासुन दूर अंतरावर नेऊन जाळा किंवा खोल पुरा.
  • शेतकाम करताना सालीला यांत्रिक जखमा होऊ देऊ नका.
  • ओलेत्या परिस्थितीत झाडाची छाटणी करु नका.
  • छाटणीची उपकरणे अल्कोहोल किंवा फॉर्माल्डेहाइडने वापरापूर्वी निर्जंतुक करा.
  • फवारा सिंचन टाळा आणि सालीवर पाणी पडु देऊ नका.
  • पाने ओली असताना शेतात काम करु नका.
  • खोड आणि फांद्यांना इजा होऊ देऊ नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा