इतर

पाश्र्चिमात्य प्रकारचा रोपांवरील भूंगेरा

Lygus hesperus

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • कोवळ्या फळांवर, खळ्या, खड्डे आणि ओरखडे तसेच खोलगट भाग येतात ज्यामुळे पक्व फळे विकृत किंवा "मांजरीच्या तोंडासारखे" दिसतात.
  • पांढरे खडबडीत भाग फळाच्या पृष्ठभागाखाली असतात.
  • फुलांच्या कळ्या आणि फुटवे आक्रसुन मरतात, ज्यामुळे उत्पन्न चांगलेच कमी होते.

मध्ये देखील मिळू शकते

11 पिके

इतर

लक्षणे

विकसित होणार्‍या फुलांच्या कळ्यांवर आणि कोवळ्या फळांवर खाण्याने झालेल्या नुकसानामुळे कुरुप दिसणार्‍या खळ्या, खड्डे, ओरखडे आणि खोलगट भाग दिसतात. काढणीपर्यंत फळे फारच विकृत होतात, ज्या लक्षणाला "मांजरीचे तोंड" असे संदर्भित केले जाते आणि पृष्ठभागावर स्त्राव दिसु शकतो. फळाच्या पृष्ठभागाखालील भाग पांढरा खडबडीत दिसतो आणि बिया सडताना दिसतात. खाण्यामुळे फुलांच्या कळ्या आणि फुटवे विकृत होतात किंवा मरतात, जे आक्रसुन मरतात ज्यामुळे उत्पन्न खूपच कमी होते. ह्या किड्यांचे यजमान भरपूर श्रेणीचे असुन ज्यात स्टोन आणि पोम फळे, पडित जमिनीतील वनस्पती आणि आजुबाजुचे तणही येतात. हा उपद्रव झाड पिकावर प्रजोत्पादन करीन नाही पण ह्या यजमानावरुन बागेवर आक्रमण करतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

ह्या उपद्रवांच्या शिकार्‍यात मोठ्या डोळ्यांचे बग्ज, डॅमसेल बग्ज, अॅसासिन बग्ज आणि कोलॉप्स बीटल्स तसेच अतिसुक्ष्म पायरेट बग्ज अंड्यांचे शिकारी आहेत. परजीवी किड्यात अॅनाफेस आयोल्स आणि ट्रिसोल्कस हॅलिमोर्फे, जे मांजराच्या तोंडाच्या किड्यांच्या अंड्यात आपली अंडी घालतात. निंबोळीचा अर्कही एल. हेस्पेरस आणि इ. कॉनस्पेर्ससचा नायनाट करतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. एसफेनव्हॅलरेट, फॉर्मेंटानेट हायड्रोक्लोराइड, मेथोमिल, इन्डोक्सीकार्ब किंवा लँब्डा-सायहालोथ्रिन असणारी कीटनाशके मांजरीच्या तोंडाच्या किड्यांविरुद्ध परिणामकारक आहेत. ही संयुगे मासे आणि इतर पाण्यातील अपृष्ठवंशीयांसाठी विषारी आहेत आणि पृष्ठभागावरील पाण्यात ती वाहून जाऊ देऊ नयेत. पायरेथ्रॉइड उत्पाद फवारल्यास प्रौढ किड्यांना लक्ष्य करतात.

कशामुळे झाले

"मांजरीचे तोंड" म्हणुन ओळखली जाणारी लक्षणे किड्यांच्या पुष्कळ जातींमुळे उद्भवतात ज्यात झाडावरील किडे लायगस हेस्पेरस आणि स्टिंक बग्ज युस्चिस्टस कॉनस्पेर्ससही येतात. प्रौढ संरक्षित जमिनीवरील आच्छादनात विश्रांती घेतात. हंगामात लवकर ते रुंद पानांच्या पिकांना किंवा शेताजवळच्या तणांना खातात. नंतर उन्हाळ्यात, जसे हे पर्यायी यजमान सुकु लागतात, हे किडे पोम आणि स्टोन फळांच्या झाडांवर उडुन जातात. झाडावरील प्रौढ किडे चपटे, अर्धगोलाकार, पिवळे, हिरवे आणि गडद तपकिरी ते काळ्या रंगाचे असतात. त्या सगळ्यांच्या पाठीवर स्पष्ट पिवळे किंवा फिकट हिरवे त्रिकोण असतात. प्रौढ स्टिंक बग्जचा आकार चपट्या ढालीसारखा असतो आणि रंगाने ते राखाडी ते तपकिरी ते हिरवे असतात. स्टिंक बग्ज उडताना त्यांच्या सोंडेतुन फार आवाज करतात. फळांच्या बागेत जमिनीवरील रुंद पानांच्या तणांबरोबर किंवा अल्फाल्फाच्या किंवा इतर यजमान रोपांजवळील शेतात ते समस्या निर्माण करतात.


प्रतिबंधक उपाय

  • अशी जागा शोधा कि मांजरीच्या तोंडासारख्या किड्यांचे शिकारी आकर्षित होतील अणि कीटनाशकांचा अविचारी वापर टाळा.
  • प्रौढ स्टिंक बग्जच्या उपस्थितीसाठी फळांच्या झाडांची झाडी अधुनमधुन तपासा.
  • जवळपासचे तण सुकु लागतातकिंवा जवळपासची यजमान पिकांची काढणी होते ती वेळ किड्यांना शोधण्यासाठी फार महत्वाची आहे.
  • गवताच्या शेताजवळ, तण असलेल्या भागात किंवा पडिक जमिनीजवळ अॅप्रिकॉटची लागवड करु नका.
  • हंगामात सुरवातीलाच तण व्यवस्थापन योग्य राहू द्या.
  • काढणीनंतर दोन अठवड्यापर्यंत तरी बागेतील जमिनीला साफ करु नका कारन जर जमिनीच्या आच्छादनात किड्यांचे संक्रमण झाले असले तर ते झाडाच्या कॅनोपीत शिरतील.
  • जाळीने प्रौढांना पकडा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा