मॅनिओक

अरारुटवरील फायटोप्लाझ्मा रोग

Phytoplasma spp.

जीवाणू

5 mins to read

थोडक्यात

  • अरारुटाच्या शेंड्यावरील खूप लहान फुटव्यांमुळे "चेटकिणीच्या झाडू" सारखे दिसते.
  • मुळे पातळ असतात आणि लाकडावर खोल चिरा असतात.
  • खोडाचा खालचा भाग सूजल्यासारखा दिसतो.
  • पाने मुडपलेली आणि त्यावर विशिष्ट सौंरचना दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
मॅनिओक

मॅनिओक

लक्षणे

फायटोप्लाझ्मा संक्रमणामुळे रोगाची अनेक लक्षणे उद्भवतात पण रोगाला मात्र त्याची शेंड्यावरील पाने झाडूसारखी फाटण्याने नाव पडले आहे. बहुधा ह्यामुळे सुप्तावस्थेत असलेले फुटवे वाढु लागतात ज्यातुन शेंड्यावर छोटी, पिवळी पाने येतात जी "चेटकिणीच्या झाडू" सारखी दिसतात. खोडाच्या खालच्या बाजूला थोडी सूज दिसु शकते तसेच पानांवर विखुरलेले हिरव्या आणि पिवळ्या संरचना दिसतात. मुळे पातळ आणि लाकडी असतात ज्याची साल जाड असते आणि त्यावर खोल चिरा दिसतात. काहीवेळा या चिरा मुळाभोवती रिंगण करतात, ज्यामुळे पाणी आणि अन्नद्रव्ये झाडाच्या वरच्या भागात पोचत नाही ज्यामुळे विशिष्ट वाढ दिसते.

Recommendations

जैविक नियंत्रण

लागवडीपूर्वी अरारुट कलमांवर सहा तासांसाठी ०.०१% स्ट्रेप्टोमायसिन द्रावणाचे उपचार करण्याने अरारुट झाडांचा मृत्यू दर कमी होतो आणि बियाणांच्या बाबतीत ऊगवण क्षमता वाढते. काही परजिवी वॅस्पसचा वापर वाहक किड्यांच्या नियंत्रणासाठी केला जातो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अरारुटवरील फायटोप्लाझ्मा रोगावर कोणताही १००% प्रभावी रसायनिक उपाय सध्यातरी उपलब्ध नाही. कलमांवर आणि बियाणांवर प्रतिजैविकांचे उपचार केल्याने मूळांचे उत्पन्न वाढते आणि पिष्टमय सामग्री चांगलीच वाढते ज्याचा उपयोग फायटोप्लाझ्माच्या साथीचे नियंत्रण करण्यासाठी वापरण्यासाठी केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

फायटोप्लाझ्मा नावाच्या जिवाणूंमुळे लक्षणे उद्भवतात जे फक्त झाडाच्या वाहक भागातच जगतात. त्यांचा प्रसार प्रामुख्याने अरारुटवरीलअन्य मिलीबग्जसह रस शोषक किडींद्वारे होतो. दुसरा महत्वाचा वाहन प्रकार आहे संक्रमित झाड सामग्रीचे इतर शेतात किंवा भागात वहन करणे. हा रोग अरारुट उद्योगासाठी अनेक देशात गंभीर धोका आहे. जर अरारुटच्या विकसनाच्या सुरवातीच्याच टप्प्यावर लागण झाली तर फायटप्लाझ्माच्या साथीमुळे काहीवेळा पूर्ण पिकाचा नाश होऊ शकतो. क्वारंटाईन उपायात संक्रमित झाडाची सामग्रीच्या परिवहनावर काही देशात बंधन आहे आणि त्याला इतरत्रही लागू करायला हवे.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोतांकडुन घेतलेली रोगमुक्त लागवड सामग्रीच वापरा.
  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी शेताचे नियमित निरीक्षण करत चला.
  • शेतात, शेती उपकरणे आणि हत्यारांसाठी उच्च प्रकारची स्वच्छता राखा.
  • संक्रमित एकेकटी रोपे काढुन लगेच शेतापासुन दूर नेऊन खोल गाडा किंवा जाळा.
  • संशयित संक्रमित झाडाचे अवशेष इतर शेतात किंवा बागेत नेऊ नका.
  • जर शेतात लक्षणे दिसली तर क्वारंटाईन अधिकार्‍यांना सूचना द्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा