केळी

केळीवरील पतंग

Opogona sacchari

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • मूळ, खोड, फांद्या, देठ आणि फळांवर बोगद्याच्या स्वरुपात खाल्ल्याचे नुकसान दिसते.
  • झाडे पूर्णपणे पोखरली जाऊ शकतात.
  • पाने वाळुन गळु शकतात अकाली पानगळ होते.
  • पतंग ठळक तपकिरी शरीराचे, ११ मि.मी.
  • लांबीचे असतात.

मध्ये देखील मिळू शकते


केळी

लक्षणे

झाडी वाढीच्या, फुलधारणेच्या काळात आणि काढणीनंतरही संक्रमण होऊ शकते. थोडक्यात, प्रौढ पतंग क्षतिग्रस्त आणि तणावग्रस्त रोपांवर आकर्षित होतात. प्रादुर्भाव फक्त अळ्यांमुळेच होतो ज्या सामान्यतः कुजत असलेल्या झाडाची सामग्री खातात. अवशेष खाल्ल्यानंतर त्या निरोगी रोपाच्या भागांना (मूळ, खोड, मुनवे, फांद्या, देठ आणि फळे) खायला सुरवात करतात. बियांवर देखील हल्ला होऊ शकतो. सुरवातीची लक्षणे बोगद्याच्या स्वरुपात दिसतात पण सुरुवातीच्या टप्प्यात त्यांना ओळखणे कठिण असते. सामान्यतः या उपद्रवाची ओळख उशीराच्या टप्प्यत होते. झाडांचे मांसल भाग पूर्णपणे खाऊन संपविले जातात आणि पाने वाळल्यासारखी दिसतात. प्रतिकूल परिस्थितीमध्ये पानगळ आणि झाड कोलमडणे देखील पाहिले जाऊ शकते.

Recommendations

जैविक नियंत्रण

हरितगृहातील प्रयोगात, स्टेनेर्नेमा फेल्टिये, हेटेरोर्हाब्डिटिस बॅक्टेरोफोरा आणि हेटेरोर्हाब्डिटिस हेलियोथिडिस नावाचे सुत्रकृमी अळ्यांविरुद्ध परिणामकारक आढळून आलेले आहेत. तसेच बॅसिलस थुंरिगिएनसिस उत्पादही वापरले जाऊ शकतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. उपचारांसाठी इमिडाक्लोप्रिड असणारे उत्पाद वापरले जाऊ शकतात.

कशामुळे झाले

ओपोगोना सैकरी प्रजातीच्या अळ्यामुळे ही लक्षणे उद्भवतात. पतंग निशाचर असतात. त्यांचे शरीर तपकिरी, सुमारे ११ मि.मी. लांबीचे असते आणि पंख १८-२५ मि.मी. लांबीचे असतात. पुढचे पंख एकसंध तपकिरी असुन काही वेळा त्यावर लांब गडद पट्टे दिसतात. नरांवर गडद तपकिरी ठिपके असतात. पाठचे पंख राखाडी आणि ठळक रंगाचे असतात आणि कडांना झालर असते. पतंगांच्या माद्या सुमारे ५०-२०० अंडी, ५ च्या गटाने झाडाच्या जखमात आणि चिरात घालतात. सुमारे १२ दिवसांनी पांढर्‍या किंवा फिकट हिरव्या, थोड्याशा पारदर्शक अळ्या ऊबुन बाहेर येतात. अळ्यांचे डोके ठळक लालसर ते तपकिरी असुन डोळ्यांसारखी चिन्हे त्यांच्या दोन्ही बाजुंना असतात. अळ्या ५० दिवसात सुमारे २६ मि.मी. वाढतात. मग त्या खाऊन तयार केलेल्या बोगद्याच्या टोकाला कोषात जातात व त्या नंतर २० दिवसांनी प्रौढ पतंगांची नवी पिढी बाहेर येते. थंड हवामान (सुमारे १५ डिग्री सेल्शियस) आणि कोरडे हवामान यांच्या विकासाला चांगले असते. हा काळ ऊबदार वातावरणात थोडा कमी होतो.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी कंद आणि मुनवे वापरा.
  • प्रदुर्भावाच्या लक्षणांसाठी झाड व बागेचे नियमितपणे निरीक्षण करा.
  • संक्रमणाचे नियंत्रण करण्यासाठी संक्रमित झाड किंवा त्याचे भाग खुडुन टाका.
  • झाडाचे मृत अवशेष संक्रमाणचे स्त्रोत बनु शकत असल्याने त्यांना काढुन टाका.
  • लागवड आणि मशागत करताना झाडांना इजा होऊ नये याची काळजी घ्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा