आंबा

आंबा पिकावरील भिरूड

Chlumetia transversa

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • रोपे मरगळतात.
  • पांढरी अंडी फांद्या व नविन कोंबांवर दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

आंबा

लक्षणे

भिरूडाचे सुरवंट विकसित होणार्‍या फुलांत आणि कोवळ्या पानांच्या मध्यशिरेत किंवा नविन फांद्यात शिरतात आणि बोगदे करत खाली सरकतात. झाडाचे संक्रमित भाग सुकतात आणि संधीसाधु जंतुंच्या दुय्यम संसर्गास संवेदनशील होतात. अळ्या अर्धपारदर्शक फिकट हिरव्या किंवा तपकिरी असून त्यांचे डोके काळे असते. त्या खासकरून नविन फांद्यांना खाण्यासाठी बाहेर येतात व शिरकाव केलेल्या छिद्राच्या आजुबाजुला भरपूर विष्ठा सोडतात. तपकिरी कोष झाडांच्या अवशेषांवर आणि जमिनीच्या वरच्या थरात सापडु शकतात. ह्या किड्यांचे आंबा आणि लिची हे दोनच माहितीत असलेले यजमान आहेत.

Recommendations

जैविक नियंत्रण

सुरुवातीच्या काळात म्हणजे जेव्हा किड्यांची संख्या कमी असते तेव्हा लसुण आणि मिरचीचा अर्क पाण्यात मिसळुन फवारल्यास सुरवंट पळुन जातात त्यामुळे भिरूडाचे संक्रमण कमी होते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ह्या किड्यांचे परिणामकारक रीतीने नियंत्रण करण्यासाठी संक्रमित कलमे किंवा रोपे काढुन टाका आणि किड्यांचे प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी त्यावर ०.०४% डायमिथोएटची फवारणी करा. कीटनाशके जसे कि पेन्थोएट सुद्धा ह्या किड्यांच्या नियंत्रणासाठी वापरले जाऊ शकते.

कशामुळे झाले

मुख्यत्वे अळ्यांनी खाल्ल्यामुळेच झाडाच्या विविध भागांचे नुकसान होते. प्रौढ पतंग राखाडीसर काळे आणि ८-१० मि.मी. लांबीचे असतात. त्यांचे शरीर निमुळत्या आकाराचे असुन त्यांना लांब मिशा असतात. त्यांचे पंख जवळपास १५ मि.मी. लांबीचे असतात. पुढचे पंख तपकिरी असुन त्यावर तपकिरी रंगाच्या विविध छटांचे पट्टे असतात आणि पंखांच्या कडेला फिकट चट्टे असतात. पाठचे पंख साध्या तपकिरी रंगाचे असतात. ते दुधाळ पांढरी अंडी नविन फांद्या व खोडावर घालतात. अळ्या ३- ७ दिवसात उबुन बाहेर येतात व पुढील ८-१० दिवस म्हणजे कोषावस्थेत जाईपर्यंत खात असतात. कोषातुन बाहेर येणारे प्रौढ इतर झाडांवर किंवा एका बागेतून दुसऱ्या बागेत उडून जातात. पाऊस आणि वाढलेली आद्रता भिरूडाच्या वाढीसाठी अनुकूल असते तर त्यामानाने जास्त तापमान ह्या किड्यांचे जीवनचक्र दडपते.


प्रतिबंधक उपाय

  • बागेचे अंडी, अळ्या, पतंग व कोषांसाठी नियमित निरीक्षण करत चला.
  • झाडाचे संक्रमित भाग छाटून खोल पुरा किंवा जाळून टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा