तूर

हेलिकोव्हर्पा सुरवंट

Helicoverpa armigera

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • फुल, फळ, शेंगा, बोंड आणि पानांवर देखील खाल्ल्याने झालेले नुकसान दिसुन येते.
  • आत शिरण्याचे व बाहेर पाडण्याचे छिद्र, विष्ठा दिसतात.
  • दुय्यम जंतुंच्या वाढीमुळे प्रभावित भाग आणि फळे कुजू लागतात.

मध्ये देखील मिळू शकते

29 पिके
जव
द्वीदल धान्य
कारले
कोबी
अधिक

तूर

लक्षणे

पांढरट ते तपकिरी अंडी पुंजक्याने फुलरचनेच्या आणि शेंड्याकडील कोवळ्या पानांच्या आजुबाजुला दिसतात. झाडाच्या कोणत्याही भागावर खाल्ल्याचे नुकसान दिसते पण यजमान झाडाप्रमाणे फुल आणि बोंड/कणीस/फळ/शेंगांवर जास्त करुन दिसते. छोट्या अळ्या पान, शेंडे किंवा फळरचना खरवडतात, ज्यामुळे कमी नुकसान होते. मोठ्या अळ्या फुलात किंवा लहान बोंड/कणीस/फळ/शेंगात पोखरुन आतुन पोकळ करतात, ज्यामुळे दाण्यांना नुकसान होते आणि बाजारात ते विक्रीयोग्य रहात नाहीत. खालेल्या छिद्रांभोवती विष्ठा दिसते. दुय्यम जंतु या जखमात शिरुन प्रभावित भागांची कूज होते. एच. आर्मीगेरा हा शेतातील सर्वात नुकसानकारक उपद्रव आहे.

Recommendations

जैविक नियंत्रण

ट्रायकोग्रामा वॅस्पस (टी. चिकोनिस किंवा टी. ब्रासिलिएनसिस) ला फुलधारणेच्या काळात सोडल्यास ते अंड्यांवर हल्ला करतात. मायक्रोप्लिटिस, हेटेरोपेल्मा आणि नेटेलिया वॅस्पस अळ्यांवर परजीवीपणा करतात. भक्षक बग्ज (बिग-आइड बग, ग्लॉसी शिल्ड बग आणि स्पाइन्ड प्रिडेटरी शिल्ड बग), मुंग्या, कोळी, इयरविग्ज, क्रिकेट्स आणि माशा अळ्यांवर हल्ला करतात त्यामुळे यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. स्पिनोसॅड, न्युक्लियोपॉलिहेड्रोव्हायरस (एनपीव्ही), मेटार्हाआयझियम अॅनिसोप्लिये, ब्युव्हेरिया बसानिया किंवा बॅसिलस थुरिंगिएनसिसवर आधारीत जैव कीटकनाशके वापरुन अळ्यांचे नियंत्रण केले जाऊ शकते. वनस्पती उत्पाद उदा. नीम तेल, निंबोळी अर्क (एनएसकेई ५%), मिरची किंवा लसूणला फवारणीसाठी वापरले जाऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मित्र किड्यांना त्रास होऊ नये पण यांना देखील शेतातुन नाहीसे करण्यासाठी निवडक कीटकनाशक उपचार करणे हा उत्कृष्ट उपाय आहे. सुरवंट काही काळानंतर कीटनाशकांना सहन करु लागतात म्हणुन अंडी आणि अळ्यांना शोधणे फारच महत्वाचे ठरते. क्लोरॅनिलिप्रोल, क्लोरपायरिफॉस, सायपेरमेथ्रिन, अल्फा आणि झिटा सायपरमेथ्रिन, एमामेक्टिन बेन्झोनेट, एसफेनव्हॅलरेट, फ्लुबेनडीयामाइड, मेथोमिलवर आधारीत उत्पादांचा वापर केला जाऊ शकतो. पहिला वापर फुलधारणेच्या काळात आणि नंतर १०-१५ दिवसांच्या अंतराने करावा. कमी मूल्याच्या पिकात रसायनिक उपचार व्यवहार्य नाहीत.

कशामुळे झाले

हेलिकोव्हर्पा आर्मिगेराच्या सुरवंटांमुळे नुकसान होते, जे पुष्कळशा पिकातील सर्वसामान्य उपद्रव आहेत. हेलिकोव्हर्पा आर्मिगेरा हा कृषी क्षेत्रातील सर्वान विनाशक उपद्रव आहे. पतंग फिकट तपकिरी असुन पंखांचा पल्ला ३-४ सें.मी. असतो. पुढचे पंख पिवळे ते नारिंगी किंवा गडद नक्षीसह तपकिरी ठिपकेदार असतात. पाठचे पंख पांढरट, गडद शिरा असलेले आणि गडद लांबट डाग खालच्या कडांवर असलेले असतात. माद्या चेंडुसारखी गोलाकार, पांढरट अंडी एकेकटी किंवा पुंजक्याने मुख्यकरुन शेंड्याकडील भागातील फुलांवर किंवा पानांच्या पृष्ठभागावर घालतात. अळ्या त्यांच्या वयाच्या टप्प्याप्रमाणे गडद हिरव्या ते गडद लालसर तपकिरी असतात. त्यांच्या शरीरावर बारीक काळे ठिपके विखुरलेले असतात आणि डोके गडद रंगाचे असते. वयात आल्यानंतर शेवटी रेषा आणि पट्टे त्यांच्या पाठीवर आणि छातीवर उमटतात. जशी त्यांची संपूर्ण वाढ होते तशा त्या जमिनीत कोषात जातात. या किडींची लोकसंख्या बहुधा फळे/शेंगा/बोंड विकसनाच्या वेळी परमोच्च असते ज्यामुळे उत्पादनात मोठी घट होते.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक किंवा सहनशील वाण लावा.
  • किडींची परमोच्च संख्या टाळण्यासाठी लवकर लागवड करा.
  • झाडांमध्ये पुरेसे अंतर ठेवा.
  • या किडींचा जीवनचक्र मोडण्यासाठी थोड्या भागात लागवड करु नका.
  • झेंडू (टॅजिटस इरेक्टा) सारखी सापळा पिके दर ५-६ ओळी नंतर लावा.
  • प्रकाश किंवा कामगंध सापळे वापरुन पतंगांचे निरीक्षण करा किंवा मोठ्या संख्येने पकडा.
  • चांगली निचरा व्यवस्था करुन पाण्याचा ताण टाळा.
  • फुल, फळ, शेंगां किंवा बोंडांचे अंडी आणि उपद्रवाच्या लक्षणांसाठी निरीक्षण करा.
  • अळ्या अणि अंडी असणारी पाने किंवा झाडाचे भाग हाताने वेचून काढा.
  • शेतातील संक्रमित झाडांना आणि शेतातील तसेच आजुबाजुचे तण काढा.
  • प्रत्येक पीकाच्या काढणीनंतर पिकाचे अवशेष काढुन टाका.
  • काढणीनंतर खोल नांगरुन अळ्या आणि कोषांना नैसर्गिक भक्षकांसाठी आणि उन्हाने करपण्यासाठी उघड्यावर आणा.
  • एकच पीक सातत्याने घेऊ नका आणि फायदेशीर पिकांसह आंतरपिके घ्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा