इतर

फळझाडांची पाने गुंडाळणारा किडा

Archips argyrospila

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • छोट्या अळ्या फुलात आणि कळ्यात छिद्रे करतात ज्यामुळे आतील भागाला नुकसान होते.
  • मोठ्या अळ्या पानांना एकत्र गुंडाळुन निवारा तयार करतात.
  • हल्ला केलेली पाने फाटल्यासारखी दिसतात आणि गंभीर बाबतीत पानगळ होते.
  • फ़ळात उथळ सालीजवळ उथळ पोकळ्या आणि तांबट रंगाचे व्रण दिसतात.
  • गंभीर संक्रमण झाल्यास रेशमी धाग्यांनी झाड पूर्णपणे आच्छादले जाते.

मध्ये देखील मिळू शकते


इतर

लक्षणे

छोट्या अळ्या सुरवातीला फुले आणि कळ्या खातात, त्यांना छिद्र करुन आतील भागापर्यंत पोचतात. मोठ्या अळ्या पानाच्या दोन्ही कडांना रेशमी धाग्याने स्वत:भोवती गुंफुन निवारा तयार करतात आणि ह्या निवार्‍याच्या आतुन मुलत: रोपाच्या सगळ्या भागांवर हल्ला करतात. हल्ला झालेली पाने फाटल्यासारखी दिसतात आणि गंभीर बाबतीत पानगळ होऊ शकते. फळांत सालीजवळ पोकळ्या असतात आणि जी फळे अकाली गळत नाहीत त्यावर जाळीसारख्या खडबडीत पृष्ठभागाचे तांबट व्रण उमटतात. फळे विकृत होणे सर्वसामान्य आहे, ज्यामुळे ती बाजारात विक्रीयोग्य रहात नाहीत. गंभीर संक्रमण झाल्यास रेशमी धाग्यांनी झाड आणि त्याखालची जमिनही पूर्णपणे आच्छादले जाऊ शकतात. ह्या झाडाखालील रोपांवरही अळ्या जमिनीवर पडताना खाण्यासाठी हल्ला करू शकतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

लेसविंग्ज, बीटल्स आणि लेडीबर्डस सारखे सर्वसामान्य शिकारी फळझाडांची पाने गुंडाळणार्‍या किड्यांच्या अळ्यांना खातात. ट्रकोग्रामा जातीचे परजीवी वॅस्प फळझाडांची पाने गुंडाळणार्‍या किड्यांच्या अंड्यांवर आपली अंडी घालतात आणि छोट्या अळ्या बाहेर आल्यानंतर वाढताना खातात. हे नैसर्गिक शत्रु लोकसंख्या कमी राखण्यात मदत करतात पण क्वचित उद्रेक होऊ शकतो. अरुंद श्रेणींची तेले किंवा बॅसिलस थुरिंगिएनसिस किंवा स्पिनोसॅड वर आधारीत सेंद्रिय वापर मान्य केला जातो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मेथोक्झिफेनोझाइड, क्लोरपायरीफॉस, मेथोमिल, क्लोरान्ट्रानिलिप्रोल किंवा स्पिनेटोरामसारखे सक्रिय घटक असणारे उत्पाद लोकसंख्या कमी करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. शेवटी दिलेले मधमाशांसाठीही विषारी आहे. लक्षात घ्या कि पिकाच्या प्रकाराप्रमाणे उपचार ठरविले जावेत.

कशामुळे झाले

आर्चिप्स आर्गिरोस्पिला नावाच्या पतंगांच्या अळ्यांमुळे ही लक्षणे उद्भवतात, ज्यांना सामान्यपणे फळझाडांच्या पानांना गुंडाळणारे पतंग ह्या नावानेही ओळखले जाते. प्रौढांचे तपकिरीसर केसाळ शरीर असते आणि पुढचे पंख सुमारे १० मि.मी. लांब असुन चौकोनी आकारासारखी असतात. ते लालसर तपकिरी, गडद तपकिरी आणि गव्हाळ रंगांचे मिश्रणाचे असतात. पाठचे पंख पूर्णपणे राखाडीसर असुन झालरीसारख्या कडांवर सौम्य तपकिरीसर छटा टोकाला दिसते. माद्या सामान्यपणे नरांपेक्षा सौम्य रंगाच्या असतात. त्या यजमान रोपांच्या काटक्यांवर पुंजक्याने अंडी घालुन त्यावर संरक्षक आच्छादन घालतात. छोट्या अळ्या कळ्यात छिद्रे करतात तर मोठ्या अळ्या निवार्‍यासाठी पानांना स्वत: भोवती गुंडाळुन घेतात किंवा पानांना किंवा फळांना एकत्र गुंफतात. तिथुन त्या बाहेर येऊन पाने, फुले, कळ्या किंवा काही वेळा यजमान रोपांची फळेही खातात. अळ्या विस्तृत श्रेणीच्या यजमानांवर हल्ला करतात, ज्यात सफरचंद आणि पेयरची झाडे, लिंबुवर्गीय आणि स्टोन (टणक बिया असणारी चेरीसारखी) फळेही येतात. त्यांची एकच पिढी प्रतिवर्षी होते.


प्रतिबंधक उपाय

  • ह्या उपद्रवाच्या लक्षणासाठी बागेचे निरीक्षण करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा