इतर

एरंडीवरील उंटअळी

Achaea janata

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पानांचे सांगाडे शिल्लक रहातात.
  • पूर्ण पानगळ होते किंवा सांगाडेच शिल्लक रहातात .

मध्ये देखील मिळू शकते


इतर

लक्षणे

गुळगुळीत राखाडीसर तपकिरी सुरवंट पानांचे सांगाडे (फक्त मुख्य शिराच शिल्लक रहातात) ते झाडाच्या पू्ण पानगळीपर्यंत किंवा शेताचा पूर्ण नासाडी होईपर्यंत पिकाचे नुकसान करतात. लहान अळ्या पानांना कुरतडतात तर मोठ्या अळ्या इतके खातात कि त्या संपुर्ण झाडाला खाऊ शकतात आणि शेताचे भरपूर नुकसान करतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

निंबोळीचा अर्क ५% आणि नीम तेल २% मिश्रण अळ्या येण्याच्या सुरवातीच्या काळात वापरल्यास त्यांची संख्या कमी होते. ट्रायकोग्रामा एव्हानेसेन्स मायन्युटम या परजीवी वॅस्पची प्रजाती या उंटअळ्यांची अंडी खाते. अळ्यांना ब्रॅकोनिड परजीवी, मायक्रोप्लिटिस माक्युलिपेनिस आणि र्‍होगासच्या प्रजाती खातात. इतर परजीवीही विक्रीसाठी उपलब्ध आहेत किंवा संशोधनाधीन आहेत. पक्षांच्या काही जातीही मोठ्या अळ्यांना खातात. शेतात पक्षी थांबे करा त्यामुळे ह्या उपद्रवाच्या घटना कमी होण्यात मदत मिळते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. फुलधारणे पासुन दर तीन अठड्याच्या अंतराने तीन वेळा मॅलॅथियॉनची फवारणी केली जाऊ शकते. उंटअळ्यांची संख्या खूप जास्त असल्यास क्लोरपायरिफॉस २ मि.ली. प्रति लीटर पाण्याची फवारणी परिणामकारक होऊ शकते.

कशामुळे झाले

ऑफिउसा मेलिसर्टा नावाच्या अळ्यांमुळे हा उपद्रव होतो. प्रौढ पतंग फिकट तपकिरी रंगाचे असुन सर्व शरीरावर खवले असतात त्यामुळे ते हँग ग्लायडरसारखे दिसतात. पाठच्या पंखाच्या खालच्या भागात वैशिष्ट्यपूर्ण काळ्या व पांढऱ्या संरचना असतात. माद्या पानाच्या पृष्ठभागावर आणि झाडाच्या कोवळ्या भागांवर पुंजक्याने अंडी घालतात. अंडी हिरवट रंगाची असून त्यांच्या पृष्ठभागावर सुंदरशी सरी वरंब्याची रचना असते. पूर्ण वाढ झालेले सुरवंट सुमारे ६० मि.मी. लांबीचे असतात व डोके काळे असून त्यांच्या शरीरावर विविध रंगाच्या संरचना असतात. शरीर मखमलीसारखे दिसते आणि पाठीच्या मणक्यावर काळा पट्टा, काळ्या पार्श्र्वभूमीवर असतो. अळ्यांचा काळ सुमारे १५-१९ दिवसांचा असतो व संपूर्ण जीवनक्रम ३३-४१ दिवसात संपतो.


प्रतिबंधक उपाय

  • झाडांचे निरीक्षण करा आणि मोठ्या अळ्या किंवा संक्रमित झाडांचे भाग वेचुन काढा.
  • मित्र किडी प्रभावित होऊ नयेत यासाठी कीटनाशकांचा नियंत्रित वापर करा.
  • अळ्या खाणार्‍या पक्षांना येण्यासाठी मोकळी जागा ठेवा.
  • पतंगाची संख्या निरीक्षण करण्यासाठी व पकडण्यासाठी सापळे लावा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा