भात

भाताची पाने गुंडाळणारी अळी

Cnaphalocrocis medinalis

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • सुरवंटाभोवती पान गुंडाळी जातात.
  • पानांवर लांब पांढरे पारदर्शी पट्टे येतात.
  • पानाच्या टोकावर गोलाकार चपटी अंडाकृत अंडी दिसतात.
  • पतंगाच्या पंखांवर तपकिरी झिग-झग रेषा असतात.

मध्ये देखील मिळू शकते


भात

लक्षणे

पाने गुंडाळणारा म्हणुनही ओळखला जातो. प्रौढ पतंग मानवी नखाच्या लांबीचे असतात आणि तपकिरीसर नागमोडी रेषा पंखांवर दिसतात. अंडी बहुधा पानांच्या टोकांवर घातली जातात. सुरवंट पानांना स्वत:भोवती गुंफून घेतो आणि रेशमी धाग्यांनी पानाच्या कडांना विणतो. ते गुंडाळलेल्या पानाला आतुन खातात ज्यामुळे पानांच्या पात्यांवर लांब पारदर्शक पांढुरक्या ओळी येतात. काही वेळा पाने टोकापासुन देठापर्यंत गुंडाळली जातात. गोलाकार चपटी अंडी एकेकटी किंवा विष्ठेसकट सापडणे हे ही संक्रमणाचेच लक्षण आहे.

Recommendations

जैविक नियंत्रण

पेरणीनंतर १५ दिवसांनी सुरु करुन ट्रायकोग्रामा चिलोनिस (१००,००० प्रौढ/हे) यांना ५ ते ६ वेळा शेतात सोडल्यास प्रभावी आणि स्वस्तात नियंत्रण मिळते. तसेच नैसर्गिक शत्रु जसे अंडी खाणारा परजीवी वॅस्प (ट्रायकोग्रामाटिडे), कोळी, भक्षक भुंगे, बेडुक आणि ड्रेगॉन फ्लाइज, पॅथोजेनिक बुरशी किंवा जीवाणू आणि काही विषाणूंना किड्यांची लोकसंख्या कमी करण्यासाठी शेतात सोडा. नीमची पाने शेतात पसरली असता प्रौढांना अंडी घालण्यास प्रतिबंध होतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पीक पोटरीवर येण्याच्या सुमारास, प्रादुर्भाव खूप जास्त झाल्यास (>५०%) फ्ल्युबेन्डियामाइड ०.१ मि.ली. किंवा क्लोरान्ट्रोनिलप्रोल ०.३ मि.ली. प्रति लीटर पाण्यात मिसळुन फवारणी करा. क्लोरपायरिफॉस, क्लोरँनिलिप्रोल, इनडोक्झाकार्ब, अॅझाडिरॅकटिन, गॅमा- किंवा लँब्डा सायहॅलोथ्रिन वर आधारीत इतर कीटनाशकेही मदत करु शकतील. अळ्यांच्या नियंत्रणासाठी अल्फासायपरमेथ्रिन, अॅबामेक्टिन २% हे काही इतर कीटनाशकात येतात. ज्या रसायनांनी किड्यांचे पुनरुत्थापन होऊ शकते ती न वापरण्याची काळजी घ्या.

कशामुळे झाले

भातावरील पाने गुंडाळणारी अळी सर्व प्रकारच्या भातशेतीत उद्भवते आणि पावसाळी हंगामात अधिक मुबलक प्रमाणात आढळते. उच्च आद्रता, शेतात जास्त सावली आणि भातशेतात तसेच आजुबाजुला गवतवर्गीय तण असणे हे उपद्रवाच्या वाढीस अनुकूल आहेत. सिंचित भातशेतीचा वाढीव भाग, एकापेक्षा जास्तवेळा भाताचे पीक घेणे आणि कीटनाशकांनी प्रेरित परत डोके वर काढणे हे किड्यांची संख्या जास्त होण्यातील महत्वाचे घटक आहेत. खतांचा जास्त उपयोग किड्यांची संख्या जलद गतीने वाढण्यात प्रोत्साहन देतो. उष्णकटिबंधातील भाताच्या शेतीत ते पूर्ण वर्षभर कार्यरत असतात तर समशीतोष्ण देशात ते मे पासुन ऑक्टोबरपर्यंत कार्यरत असतात. २५-२९ डिग्री सेल्शियसचे तापमान आणि ८०% आद्रता त्यांना अनुकूल असते. कोवळ्या आणि हिरव्या भाताच्या रोपांना गंभीर प्रादुर्भाव होतो.


प्रतिबंधक उपाय

  • प्रादुर्भावाचा उद्रेक प्रतिबंधीत करण्यासाठी प्रतिकारक वाण लावा.
  • उपद्रवाच्या लक्षणांसाठी शेताचे निरीक्षण करा.
  • लागवड करताना रोपांची संख्या कमी करा.
  • भाताच्या रोपांना हंगामात पुरेसे पाणी मिळण्याची काळजी घ्या.
  • नत्राच्या विभाजित मात्रेसह संतुलिन खतयोजना करा.
  • प्रौढांना आकर्षित करुन गोळा करण्यासाठी प्रकाश किंवा चिकट सापळे वापरा.
  • शेतातुन आणि आजुबाजुने गवत वर्गीय तण काढा.
  • किड्यांना पळवुन लावण्यासाठी पानांवर थॉर्न वुडचा वापर करा.
  • फरतड म्हणजे फुटवे छाटुन पुढच्या हंगामासाठी ठेऊ नका.
  • कीटनाशकांचा वापर संयमित करा म्हणजे भक्षक किडे (कोळी, परजीवी वॅस्पस, शिकारी बीटल्स, बेडुक आणि ड्रेगॉन फ्लाइज) भातावरील पाने गुंडाळणार्‍या अळ्यांचे नियंत्रण करतील.
  • भाताची वेगवेगळ्या पिकांसोबत पीक फेरपालट करा.
  • काढणीनंतर शेत नांगरुन अवशेष काढुन टाका.
  • काढणीनंतर काही अठवडे, महिन्यांपर्यंत शेत पडित ठेवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा