ऊस

ऊसावरील हुमणी

Lepidiota stigma

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • मुळांवर उपद्रव झाल्यामुळे अन्नद्रव्य आणि पाणी पुरवठा कमी होतो.
  • कालांतराने पाने तपकिरी होऊन पक्व खोड खराब होतात.
  • प्रतिकूल वातावरणात झाड कोलमडतात.
  • अळ्या ऊसाच्या खोडात बोगदे करतात.

मध्ये देखील मिळू शकते

3 पिके
कॉफी
मका
ऊस

ऊस

लक्षणे

अळ्या ऊसाच्या मुळांना खाऊन नुकसान करतात ज्यामुळे पाणी आणि पोषकांचा पुरवठा पूर्ण झाडाला पोचत नाही. पानावरील सुरवातीचा पिवळेपणा व सुकवा दुष्काळाच्या नुकसानासारखाच दिसतो. कालांतराने पाने तपकिरी होऊन पक्व होणारे खोड खराब होतो. गंभीर प्रदुर्भावात झाडाची संपूर्ण मुळे अळ्या खाऊन टाकतात आणि विपरीत हवामानात किंवा स्वत:च्या वजनाने झाड कोलमडते. काही वेळा, अळ्या ऊसाच्या खोडात बोगदे देखील निर्माण करतात. ऊस वाढीच्या सुरुवातीच्या काळात गंभीर प्रदुर्भाव झाल्यास पीकाची परत लागवड करण्याची गरज भासू शकते.

Recommendations

जैविक नियंत्रण

सापळा झाडे लावुन भुंग्यांना आकर्षित करुन त्यांचा सहजपणे नाश करणे हा जवळच्या ऊस शेतातील हुमणीचा उपद्रव कमी करण्याचा चांगला उपाय आहे. जयंती (सेस्बानिया सेस्बान), तुरी (सेस्बानिया ग्रँडिफ्लोरा), अॅकाशिया टोमेंटोसा, आसाम (टॅमारिंडस इंडिका), जेंगकोल (पिथेसेलोबियम जिरिंगा) आणि काजू (अॅनाकार्डियम ऑक्सिंडेंटाले) चा वापर सापळा म्हणून केला जाऊ शकतो. काजू यासाठी उत्तम आहे कारण ते हलक्या जमिनीत वाढुन देखील फळ देते. ब्युव्हेरिया प्रजाती असणारी जैविक कीटनाशके या प्रादुर्भावाचे नियंत्रण करण्यासाठी वापरुन पहा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बहुधा जमिनीत कीटनाशके वापरुन रसायनिक नियंत्रण केले जाते. क्लोरपायरीफॉस किंवा क्लोरपायरीफॉस मिथिलसारख्या जमिनीत हळुहळु कीटनाशके सोडणारी कीटनाशके असणार्‍या उत्पादांचा वापर लागवडीच्या आधी मुळांच्या भागात केल्यास या अळ्यांवरुद्ध चांगला परिणाम देतात. तरीपण खोडवा पिकात यांचा वापर शक्य नाही.

कशामुळे झाले

अनेक प्रकारच्या भुंग्यांच्या अळ्यांमुळे नुकसान उद्भवते, ज्यात लेपिडोटा स्टिग्मा हे महत्वाचे आहे. फिलोफेगा हेलेरि, पॅक्नेसा निकोबारिका, ल्युकोफोलिस प्रजाती आणि सिलोफोलिस प्रजातीसारख्या इतर जातीही सापडू शकतात. अळ्या फिकट पांढर्‍या असतात आणि शरीर C आकाराचे असते. त्या जशा मोठ्या होत जातात तसे जास्त अधाशीपणे खातात त्यामुळे जर वेळीच नियंत्रण केले नाही तर गंभीर नुकसान होते. हुमणीमुळे झालेले नुकसान हे त्यांच्या संख्येवर आणि अळी काय वयाची आहे आणि संक्रमण होताना ऊसाचे वाण आणि वाढीचा कोणता टप्पा आहे यावर अवलंबुन असते. पक्व ऊसावर संक्रमण झाल्यास पीकाच्या उत्पादनावर परिणाम होतो.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास जास्त सहनशील वाणाची लागवड करा.
  • अळ्या आणि भुंग्याच्या लक्षणांसाठी शेताचे नियमितपणे निरीक्षण करा.
  • सापळे वापरुन प्रौढांची संख्या तपासा किंवा मोठ्या संख्येने पकडा किंवा त्यांना हाताने वेचुन काढा.
  • किंवा झाड हलवुन त्यांना कापडात गोळा करा.
  • सापळा पिके लावुन प्रौढांना आकर्षित करा आणि हाताने वेचुन काढा.
  • चिकणमातीच्या भारी जमिनीत ऊसाची लागवड करणे टाळा.
  • संतुलित खत नियोजन करून जमिनीचा कस योग्य राखा.
  • मित्र किड्यांचे नुकसान करणारी विस्तृत श्रेणीतील कीटनाशके वापरु नका.
  • खोल नांगरुन अवशेष खणा जे त्यांच्या विघटनास अनुकूल होईल आणि अळ्या भक्षकांसाठी उघड्यावर येतील.
  • पीक घेतल्यानंतर खोल नांगरून पिकाचे अवशेष आणि खुंट काढुन जाळुन टाका.
  • शेंगवर्गीय पिकांसारख्या पर्यायी नसणार्‍या यजमानांबरोबर पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा