ऑलिव्ह

मोगऱ्यावरील पतंग

Palpita vitrealis

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पानांच्या खालच्या बाजुने अळ्यांनी खाल्ल्यामुळे "खिडक्यांच्या चौकटी"ची रचना दिसते आणि वरची बाजु अबाधित असते.
  • काळी विष्ठा आणि रेशमी तंतुंनी पानांवर बांधलेले दिसते.
  • खाण्याची छिद्रे आणि गॅलरीज फळांवर दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
ऑलिव्ह

ऑलिव्ह

लक्षणे

छोट्या अळ्या पानांच्या खालच्या बाजुने ओरबाडुन खातात आणि वरचा थर तसाच अबाधित ठेवतात. ह्यामुळे "खिडक्यांच्या चौकटी"सारखी सुकलेल्या, तपकिरी किंवा राखाडीसर पानाच्या वरच्या पृष्ठभागावर रचना दिसते. मोठ्या अळ्या पूर्ण पानांत छिद्रे करतात. असे नुकसान देठांपर्यंत पोचते आणि पानगळही होऊ शकते. त्या पुष्कळदा पानाचे भाग किंवा विविध पाने रेशमी धाग्यांनी एकत्र गुंफुत घरटी तयार करतात ज्याला नंतर कोषात जाण्यासाठी वापरले जाते. काळ्या विष्ठेचे कण आणि रेशमी धाग्यांचे तंतु रोपाच्या नुकसानीत भागात स्पष्ट दिसतात. टोकाच्या कळ्यांवर खाल्ल्याचे दिसु शकते आणि फळांवरही खाल्ल्याची छिद्रे किंवा गॅलरीज ज्या आतील टणक भागापर्यंत जातात, दिसु शकतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

ऑलिव्ह बागेतुन सकर्सना काढणे हा चमेलीच्या पतंगांची लोकसंख्या झपाट्याने वाढण्याचे टाळण्यासाठी उत्कृष्ट मार्ग आहे. ट्रिकोग्रामा आणि अॅपॅन्टेलेस प्रजातींचे परजीवी वॅस्पस आणि अँथोकोरिस नेमोरालिस आणि क्रिसोपेर्ला कारनिया शिकारी हे चमेली पतंगांचे महत्वाचे शत्रु आहेत. बॅसिलस थुरिंगिएनसिसवर आधारीत द्रावणांच्या वापराची शिफारसही पी. युनियॉनालिसविरुद्ध केली जाते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. १%पेक्षा जास्त फळांवर प्रभाव पडत असेल तरच झाडांवर रसायनिक उपचार करण्याचा विचार करावा. वसंत ऋतुत जर रोपवाटिकेत किंवा कोवळ्या लागवडीतील ५%पेक्षा जास्त झाडे प्रभावित होत असतील तरच उपचार करावेत. डायमेथोएट, डेल्टामेथ्रिन आणि सायपरमेथ्रिन सारखे सक्रिय घटकांवर आधारीत कीटनाशकांचा रसायनिक उपयोग ऑलिव्ह बागेतील चमेली पतंगाच्या नियंत्रणासाठी केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

पाल्पिटा युनियनालिसच्या अळ्यांनी खाल्ल्यामुळे लक्षणे उद्भवतात, जी मुख्यत्वेकरुन ऑलिव्हच्या झाडांवरच हल्ला करते. पतंगांचे शरीर हिरवट, १५ मि.मी. लांबीचे आणि पांढर्‍या खवल्यांनी पूर्णपणे आच्छादिलेले असते. पंख अर्धपारदर्शक असुन थोडे चमकतात आणि कडा झालरवाल्या असतात, पुढच्या पंखांवर दोन काळे ठिपके मध्यावर आणि पुढच्या कडा तपकिरी असतात. माद्या सुमारे ६०० अंडी कोवळ्या पानांवर, फुलांवर, फळांवर आणि फांद्यांवर घालतात. ऊबुन बाहेर आलेल्या अळ्या हिरव्या पिवळ्या, सुमारे २० मि.मी. लांबीच्या असतात. सुरवातीला त्या अधाशासारख्या वागतात, पण कालांतराने त्या पसरतात आणि त्यांची स्वत:ची घरटी पुष्कळशी पाने विणुन तयार करतात. सामान्य परिस्थितीत भरपूर नुकसान करण्याइतकी सुरवंटांची संख्या नसते. तरीपण रोपवाटिकेत ह्यांची समस्या होऊ शकते.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या देशातील क्वारंटाइन नियमांबाबत जागरुक रहा.
  • प्रतिकारक किंवा लवचिक वाण आपल्या भागात उपलब्ध असल्यास निवडा.
  • पी.
  • युनियोनालिसच्या लक्षणांसाठी ऑलिव्हच्या झाडांचे नियमित निरीक्षण करा.
  • लोकसंख्या झपाट्याने जमा होऊ नये म्हणुन ऑलिव्हच्या जुन्या बागातुन सकर्सना काढुन टाका.
  • शिकारी किड्यांनाही मारतील अशा विस्तृत श्रेणीच्या कीटनाशकांचा वापर टाळा.
  • रोपाचे संक्रमित साहित्य इतर बागांमधुन नेऊ नका.
  • कामगंध सापळे वापरुन पतंगाची उपस्थित संख्या ठरवा आणि नियंत्रक उपाय करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा