ऑलिव्ह

ऑलिव्हवरील फळमाशी

Bactrocera oleae

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पिकणार्‍या फळावर टोचल्याची त्रिकोणी छिद्रे स्पष्ट दिसतात.
  • ती पहिल्यांदा गडद हिरवी असतात पण नंतर ती पिवळसर तपकिरी होतात.
  • अळ्या गर खाऊन फळाला नुकसान करतात.
  • ऑलिव्हची फळे सुकतात आणि अकाली गळतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
ऑलिव्ह

ऑलिव्ह

लक्षणे

पिकणार्‍या फळांवर अंडी घालण्यासाठी माद्यांनी केलेली छिद्रे स्पष्ट दिसतात. त्यांचा विशेष त्रिकोणी आकार असते आणि गडद हिरवा रंग असतो जो नंतर बदलुन पिवळसर तपकिरी होतो. फळांच्या आतुन अळ्यांनी खाल्ल्याने सर्वात जास्त नुकसान होते. ऑलिव्हची फळे सुकतात आणि अकाली गळतात. ह्या जखमातुन जंतु आणि बुरशीचे जंतु आत शिरु शकतात. ऑलिव्ह फळांच्या उत्पन्न आणि तेलची प्रत दोन्हींवर प्रभाव पडतो.

Recommendations

जैविक नियंत्रण

ऑलिव्हवरील फळमाशीच्या लोकसंख्या नियंत्रणासाठी बागेत पुष्कळ प्रकारचे परजीवी वॅस्पस सोडले जाऊ शकतात. ओपियस कॉनकोलर, निगालियो मेडिटेरेन्युयस, फोपियस अॅरिसॅनस, डायचास्मिमोर्फा क्रासी किंवा युरिटोमा मारटेली यातील काही आहेत. लॅसियोप्टेरा बेरलेसियाना शिकार्‍यांत येतात. नीम झाडाचा अर्क किंवा रोटेनॉनचा वापर नैसर्गिक रिपेलंट म्हणुनही केला जाऊ शकतो. काओलिन पावडरीचा वापरही यशस्वीपणे मादीला फळांवर अंडी घालण्यापासुन परावृत्त करण्यासाठी केला गेला आहे. कॉपरवर आधारीत रिपेलंटस (बोरडॉक्स मिश्रण, कॉपर हायड्रॉक्साइड, कॉपर ऑक्झिक्लोराइड) प्रतिबंधक म्हणुन वापरल्यासही काम होते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जेव्हा लोकसंख्या मान्य सीमेपर्यंत पोचते तेव्हा डायमिथोएट, डेल्टामेथ्रिन, फॉस्मेट किंवा इमिडाक्लोरिड सारख्या सक्रिय तत्वांवर आधारीत कीटनाशकांचा वापर केला जाऊ शकतो. विषारी प्रोटिन आमिष किंवा सापळे वापरुन थव्याने पकडणे हे प्रतिबंधक उपायही शक्य आहेत.

कशामुळे झाले

बॅक्टोसेरा ओलेये नावाच्या ऑलिव्हवरील फळमाशीच्या अळ्यांमुळे लक्षणे उद्भवतात, जिचे यजमान फक्त ऑलिव्हची झाडेच आहेत. प्रौढ सुमारे ४.५ मि.मी. लांबीचे, काळ्या तपकिरी शरीराचे, नारिंगी डोके आणि छातीवर दोन्ही बाजुला पांढरे किंवा पिवळे ठिपके असतात. त्यांचे पंख अर्धपारदर्शक असुन त्यांच्या टोकाजवळ गडद डाग असतात आणि शिराही गडद असतात. ऑलिव्हवरील फळमाशी प्रौढ म्हणुन पुष्कळ महिने जगु शकते. माद्या सुमारे ४०० पर्यंत अंडी त्यांच्या जीवनकालात घालतात. अंडी घालण्यासाठी ओटीपोटाच्या बुडाशी असलेली नांगी वापरुन त्या पिकणार्‍या फळाच्या सालीत छिद्र करतात आणि एक अंडे त्या छिद्रात घालतात. अळ्या दुधाळ पांढर्‍या असतात आणि फळांचा गर खातात ज्यामुळे पुष्कळ नुकसान होते आणि अकाली गळही होते. तापमानाप्रमाणे ( अति अनुकूल २०-३० अंश), ऑलिव्हवरील फळमाशीच्या २-५ पिढ्या प्रतिवर्षी होतात.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण निवडा.
  • चिकट किंवा कामगंध सापळे वापरुन माशांना पकडा किंवा त्यांच्या संख्येचे निरीक्षण करा.
  • जास्त नुकसान टाळण्यासाठी लवकर काढणी करा, उत्पन्नातील नुकसानाची भरपाई प्रतीमुळे भरुन निघु शकते.
  • लोकसंख्या वाढुन जमा होणे टाळण्यासाठी बागेतील स्वच्छता अतिशय महत्वाची आहे.
  • संक्रमित फळे झाडावरुन किंवा जमिनीवरुन काढुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा