सोयाबीन

दाक्षिणात्य लष्करी अळी

Spodoptera eridania

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर पांढरे खवले असलेली हिरवट अंडी पुंजक्यांनी दिसतात.
  • खाण्याने झालेल्या नुकसानाने पानांचे फक्त सांगाडे उरतात.

मध्ये देखील मिळू शकते


सोयाबीन

लक्षणे

पतंगाच्या अंगावरील पांढरट खवल्यांनी आच्छादिलेली हिरवट अंडी पुंजक्यांनी पानांच्या खालच्या बाजुला दिसतात. त्या जशा वयात येतात तशा त्या एकेकट्या रहातात आणि शेंगातही पोखरतात. जर खाद्य कमी पडले तर त्या कोवळ्या फांद्या आणि शेंगा देखील खातात आणि गंभीर प्रदुर्भावात झाडाची संपूर्ण पानगळ होते. ज्या ठिकाणी फक्त सोयाबीनचेच पीक लागोपाठ घेतले जाते तिथे त्या झपाट्याने विकसित होतात आणि फार मोठी पानगळ करतात. सोयाबीन पिकाचे नुकसान आणि आर्थिक हानी करणारा उपद्रव म्हणुन त्यांना मानले जाऊ शकते.

Recommendations

जैविक नियंत्रण

संक्रमण कमी करण्यासाठी नैसर्गिक भक्षकांना उदा. परजीवी वॅस्पस जसे कि कोटेसिया मारजिनिव्हेन्ट्रिस, चेलोनस इनस्युलॅरिस, मेटिओरस ऑटोग्राफे, एम. लाफिग्मे किंवा कँपोलेटिस फ्लाविसिन्क्टा प्रोत्साहन द्या. लेसविंग्ज आणि लेडीबर्डस हे इतर मित्रकिडीत येतात. काही पक्षीही प्रौढ पतंगांना खातात. ब्युव्हेरिया बसियाना बुरशीचे संक्रमण अळ्यांवर करण्याचा प्रयोग देखील आपण करु शकता. अळ्यांना खाण्यापासुन तिटकारा येण्यासाठी नीम तेलही वापरले जाऊ शकते. तरीपण वनस्पतिशास्त्रीय कीटकनाशकांनी अळ्यांचे नियंत्रण करणे कठिण आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अळ्यांच्या सुरवातीच्या काळात कीटकनाशकांची फवारणी करून दाक्षिणात्य लष्करी अळ्यांचे नियंत्रण करा. अॅसेलेप्रिन आणि सिंथेटिक पायरेथ्रॉइडच्या गटातील रसायने या उपद्रवाविरुद्ध वापरली गेली आहेत.

कशामुळे झाले

स्पोडोप्टेरा एरिडानिया नावाच्या दाक्षिणात्य लष्करी अळीमुळे नुकसान होते. प्रौढ पतंग राखाडी तपकिरी असतात आणि त्यांचे पुढचे पंख चिन्हीत तपकिरी असुन पाठचे पंख पांढरे अर्धपारदर्शक असतात. अळ्या सुरवातीला काळपट हिरव्या असुन त्यावर गडद विखुरलेले ठिपके असतात आणि पूर्णपणे लालसर तपकिरी डोका असतो. त्यांच्या पाठीवर पांढरी रेघ आणि बगलेत पांढरे पट्टे असतात जे कालांतराने जास्त ठळक होतात. अळ्यांच्या उशीराच्या टप्प्यावर त्यांची कातडी गडद होते, त्यांच्या पाठीवर काळ्या त्रिकोणाच्या दोन ओळी उमटतात आणि पहिला भाग गडद पट्ट्याने वेढला जातो. १० ते २५ अंश सेल्शियसचे तापमान यांच्या विकासाला उत्कृष्ट आहे तर ३० डिग्री सेल्शियसवरील तापमानात यांचे जीवनचक्र ठप्प होते.


प्रतिबंधक उपाय

  • मागील 3 महिन्यांत कीटकांपासून मुक्त असलेल्या ठिकाणचेच रोपे वापरा.
  • प्रमाणित कीडविरहित बियाणे वापरा.
  • पतंगांची संख्या निरीक्षण करण्यासाठी व पकडण्यासाठी कामगंध सापळे वापरा.
  • ज्या रोपावर किंवा त्यांच्या भागांवर अंडी किंवा अळ्यांचे संक्रमण झाले आहे त्यां भागांना काढुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा