द्राक्षे

मावा

Aphis

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पाने मुडपलेली आणि विकृत होतात.
  • पानांखाली आणि कोंबांखाली छोटे किडे असतात.
  • वाढ खुंटते.

मध्ये देखील मिळू शकते

57 पिके
बदाम
सफरचंद
जर्दाळू
केळी
अधिक

द्राक्षे

लक्षणे

मावा कमी ते मध्यम संख्येने असल्यास पिकांना जास्त नुकसानदायक नाहीत. गंभीर संक्रमणाने पाने व फांद्या गोळा होऊन वाळतात किंवा पिवळी पडतात ज्यामुळे झाडाची वाढ खुंटते. झाडाच्या जोमात घसरण होत असल्याचे निदर्शनात येते. बरेचदा माव्यांनी सोडलेल्या मधाळ रसामुळे संधीसाधु बुरशींचा अतिरिक्त संसर्गही होतो. पानांवर तयार होणारे बुरशीचे थर हेच दर्शवित असतात. चिकटा पडल्यामुळे मुंग्या आकर्षित होतात. मावा कमी प्रमाणात असताना देखील विषाणूजन्य रोगांचा प्रसार एका झाडावरून दुसऱ्या झाडावर चिकाटीने करत असतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

जर प्रादुर्भाव कमीअसेल तर साध्या कीटकनाशक साबणाचा द्राव किंवा झाडांच्या तेलावर आधारीत द्राव वापरा, उदा. नीम तेल (३मि.ली./ली). दमट हवामानात मावाही बुरशीजन्य रोगास संवेदनशील असतात. त्यांना पळविण्यासाठी प्रभावित झाडांवर साध्या पाण्याची फवारणी देखील उत्तम ठरते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. रसायनिक कीटकनाशकांच्या वापराने माव्यात त्या कीटकनाशकांचा प्रतिकार निर्माण होऊ शकतो. खोडावर वापरण्यासाठी, पेरणीनंतर ३०, ४५, ६० दिवसांनी (डीएएस) फ्लोनिकॅमिड आणि पाणी १:२० प्रमाणात वापरण्याचे योजन करावे. फिप्रोनिल (२ मि.ली.) किंवा थियामेथोक्झाम (०.२ग्रॅ.) किंवा फ्लोनिकॅमिड (०.३ग्रॅ.) किंवा अॅसेटामिप्रिड (०.२प्रति ली. पाणी) दराने वापरले जाऊ शकते. तथापि ह्या रसायनांमुळे भक्षक, परजीवी आणि परागीभवन करणार्‍यांवर नकारात्मक प्रभाव पडतो.

कशामुळे झाले

मावा आकाराने लहान व मऊ शरीराचे किडे असून त्यांचे पाय आणि अॅन्टेना लांब असतात. त्यांची लांबी ०.५ मि.मी. ते २ मि.मी. असून शरीराचा रंग प्रजातीप्रमाणे पिवळा, तपकिरी, लाल किंवा काळा असु शकतो. मावा बरेच प्रकारचे असतात. त्यात पंखहीन असलेला मावा, पंखवाले, मेणकट किंवा लोकरी प्रकारापेक्षा जास्त आढळतात. ते बहुधा पानाच्या खालच्या बाजुला आणि शेंड्यावर एका गटाने बसून आपली सोंड झाडाच्या मऊ पेशींमध्ये टोचून रससोषण करतात. कमी ते मध्यम संख्येने असल्यास झाडाला जास्त नुकसानदायक नाहीत. वसंत ऋतुच्या शेवटी किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला प्राथमिक उपद्रवानंतर त्यांची संख्या नैसर्गिकरीत्या नैसर्गिक शत्रुंमुळे कमी होते. बऱ्याचशा प्रजाती वेगवेगळ्या विषाणूंचे वहन करत असल्याने इतर बर्‍याच विषाणूजन्य रोगांची लागण होऊ शकते.


प्रतिबंधक उपाय

  • शेताच्या आजुबाजुला विविध प्रकारची झाडे मोठ्या प्रमाणात लावा.
  • आधीच्या पिकाचे अवशेष काढुन टाका.
  • प्रकाश परावर्तीत करणार्‍या आच्छादनाचा (मल्चिंग) वापर करावा ज्यामुळे माव्याच्या प्रदुर्भावास आळा बसेल.
  • रोगाच्या किंवा उपद्रवाच्या घटनांच्या गंभीरतेचे मूल्यांकन करण्यासाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • झाडावरील प्रादुर्भाव झालेले भाग काढून टाका.
  • शेतातुन आणि आजुबाजुने तण तपासा.
  • प्रमाणापेक्षा जास्त खत व पाणी देणे टाळा.
  • मुंग्या नेहेमी माव्याचे संरक्षण करत असतात त्यामुळे चिकट सापळे लाऊन मुंग्यांचे नियंत्रण करा.
  • झाडीत हवा खेळती रहाण्यासाठी फांद्या छाटा किंवा खालील पाने काढुन टाका.
  • शक्य असल्यास झाडांच्या संरक्षणासाठी जाळी (इनसेक्ट नेट) लावा.
  • मित्रकिड्यांवर परिणाम होऊ नये म्हणुन कीटनाशकांचा वापर संयमित ठेवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा