द्राक्षे

द्राक्षावरील लाल कोळी

Calepitrimerus vitis

कोळी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर सूक्ष्म अर्धपारदर्शक ठिपके दिसतात.
  • पानांवर पांढरी लव आणि गडद हिरवट जांभळ्या रंगाची रंगहीनता दिसते.
  • वाढ खुंटते.
  • फळ उत्पादन कमी होते.

मध्ये देखील मिळू शकते


द्राक्षे

लक्षणे

या उपद्रवाचे पहिले लक्षण पानांवरील बारीक ठिपक्यांतुन दिसते व हे पान सुर्यप्रकाशाकडे पकडल्यास हे ठिपके जास्तच स्पष्ट दिसतात. पानांवर किती प्रमाणात ठिपके आहेत त्या वरून प्रादुर्भावाची कल्पना करता येते. मोठ्या प्रमाणात पांढर्या. लवीची उपस्थिती देखील उपद्रवाचे लक्षण आहे. या प्रादुर्भावामुळे पानांवर जखमांमुळे गडद हिरवट जांभळ्या रंगाचे चट्टे येऊन ती वेडीवाकडी होतात. मोसमात लवकर जास्त प्रादुर्भाव झाल्यास कोंबांना आणि पानांना गंभीर नुकसान होते. पानगळ होते आणि वाढ देखील खुंटते. फुल जखमी झाल्यामुळे किंवा वाढ खुंटल्यामुळे उत्पादन कमी होते. साधारणपणे लाल कोळी ही द्राक्ष पिकामध्ये मोठी समस्या नाही कारण वेल, ही खुंटलेली वाढ मोसमाच्या शेवटी भरुन काढत असते. तथापि, जर पोषक परिस्थिती लोकसंख्येच्या जलद विकासासाठी लाभल्यास यामुळे उत्पादन आणि गुणवत्ते वर नक्कीच विपरीत परिणाम घडू शकतो.

Recommendations

जैविक नियंत्रण

लाल कोळी हे अनेक नैसर्गिक शत्रू खासकरुन शिकारी कोळ्यासाठी सोपी शिकार आहेत. सुप्तावस्थेमध्ये व फुट निघण्याच्या काळात पाण्यात विरघळणार्‍या गंधकाचा वापर देखील ह्या कोळ्याच्या नियंत्रणासाठी उत्तम उपाय आहे. तरीपण एकदा ही फवारणी थांबली कि त्यांची संख्या वाढु शकते. नीमतेल व काही कीटकनाशक साबणांचा वापरही फवारणी द्वारे केला जाऊ शकतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बहुतेक वेळा, कोळीनाशकांचा प्रयोग टाळण्यात येतो कारण शिकारी कोळी जे ह्या लाल कोळ्याच्या उपद्रवाचे नियंत्रण करु शकतात यांची संख्या कमी होऊ शकते.

कशामुळे झाले

(कॅलेपिट्रिमेरस व्हिटिस) ह्या लाल कोळ्यामुळे ही लक्षणे उद्भवतात जो व्हिटिस व्हिनिफेरावरील अवलंबित उपद्रव आहे. प्रौढ माद्या खोडाच्या सालीखाली किंवा वेलीवरील खाच्यात आपली सुप्तावस्था घालवतात आणि वसंत ऋतुच्या सुरवातील तिथुन निघुन नविन फुटींवर स्थलांतरित होतात. त्यांचा अतिलहान, दृष्टीस न पडणारा आकार आणि पारदर्शी रंगांमुळे ते लवकर लक्षात येत नाहीत. बहुधा हे पानांच्या लवीमध्ये वेढलेले असतात. वसंत ऋतुच्या सुरुवातीला ते नविन पानांवर आणि कोंबांवर सोंड आत खुपसुन रस शोषण करतात. रससोषण करतेवेळेस ते काही द्राव पेशीत सोडतात ज्यात हॉर्मोनल घटक असतात आणि ह्यामुळे पानांचे आकार विकृत होतात. उन्हाळ्याच्या मध्यापासुन ते शेवटपर्यंत हे कोळी त्यांच्या विश्रांतीसाठी सुरक्षित जागा शोधतात. त्यांना खाणारे शिकारी कोळी आणि कीटक असंख्य असल्याकारणाने ह्यांना बहुधा मोठी समस्या मानण्यात येत नाही.


प्रतिबंधक उपाय

  • शेताची तयारी करताना पाण्याच्या निचर्याेची चांगली व्यवस्था करा.
  • सेंद्रीय खते देऊन जमिनीतील कर्बचे प्रमाण संतुलित ठेवा.
  • या प्रदुर्भावाच्या लक्षणांसाठी वेलींचे नियमित निरीक्षण करा.
  • फुलकिड्यांची उपस्थितीसाठी बागेचे नियमित निरीक्षण करा.
  • कीटकनाशकांचा वापर सिमीत ठेवा ज्यामुळे मित्रकिड्यांची संख्या कमी होणार नाही आणि ते सुदृढ रहातील.
  • खते वेळेत आणि योग्य प्रमाणात द्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा