द्राक्षे

वेलींवरील पिवळा कोळी

Eotetranychus carpini

कोळी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांची व फुटींची वाढ अनियमित होते, पाने वेडीवाकडी होतात किंवा सुकतात, दोन पेर्‍यातील अंतर कमी होणे हे प्रादुर्भावाचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे.
  • पानांच्या शिरांच्या बाजुने लाल ते तपकिरी ठिपके दिसतात व कालांतराने पिवळी पडून करपतात.
  • प्रादुर्भावामुळे मणी लवकर परिपक्व न होणे, गोडी कमी राहणे व उत्पादनात मोठी घट होते असते.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके

द्राक्षे

लक्षणे

मोसमाच्या सुरुवातीच्या काळात ह्या पिवळ्या कोळ्याचा प्रादुर्भाव झाल्यास पानांची व फुटींची वाढ अनियमित होते, पाने वेडीवाकडी होतात किंवा सुकतात, दोन पेर्‍यातील अंतर कमी होणे हे प्रादुर्भावाचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे. वाढीच्या नंतरच्या काळात प्रादुर्भाव झाल्यास पानांच्या शिरांच्या बाजुने लाल ते तपकिरी ठिपके दिसतात. जशी कोळ्यांची संख्या वाढत जाते, ही लक्षणे पानाच्या इतर भागातही दिसु लागतात, नंतर ते भाग पिवळे होऊन करपतात. यामुळे प्रकाशसंश्लेषण दर कमी होतो ज्यामुळे परिणामी मणी लवकर परिपक्व न होणे, गोडी कमी राहणे व उत्पादनात मोठी घट होते असते. जरी कोळ्यांची संख्या कमी असली तरी सुरुवातीच्या काळात उपाद्रव झाल्यास मोठे नुकसान होत असते.

Recommendations

जैविक नियंत्रण

काही प्रकारचे अणुजीव प्रजाती विशेषत: नैसर्गिक शिकार करणार्‍या कांपिमोड्रोमस ऍबरन पिवळा कोळ्याच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरली जाऊ शकते. तरीपण कँम्पिमोड्रोमस अॅबेरान्स हा शिकारी कोळीनाशकाच्या फवारणीमुळे प्रभावित होतो. छोटे पायरेट बग्ज किंवा फ्लॉवर बग्ज (अँथोकोरिडाई) च्या काही प्रजाती हॉर्नबिम कोळ्यांना खातात, हा एक उपद्रवावर नियंत्रण ठेवण्याचा आणखी एक मार्ग असू शकतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ह्यांच्या उत्तम नियंत्रणासाठी फुट निघण्याच्या काळात व फुट १० सें.मी. लांबीची होते त्यावेळी दोन कोळीनाशाकाचे फवारणी करणे गरजेचे असतात. कोळीनाशकचे अॅक्रिनॅथ्रिन, बेन्झोक्सिमेट, क्लोफेनटेझाइन, सिहेक्झाटिन, डायकोफॉल, फेनेझाक्विन, फेनब्युटानिन ऑक्साइड, फ्लयुफेनॉक्झ्युरॉन, हेक्झिथियाक्झॉक्स, प्रोपारजइट, पायरिडाबेन आणि टेब्युफेनपायरॅड हे मुख्य प्रकार आहेत. हे उत्पाद कँम्पिमोड्रोमस अॅबेरान्स नावाच्या नैसर्गिक शिकार्‍यांवरही परिणाम करतील. काही कीटनाशके फुल किड्यांवरही परिणाम करतात. उन्हाळ्यात कोळ्यांची संख्या कमी करण्यासाठी १२ दिवसांच्या अंतराने दोन कोळीनाशकांच्या फवारण्या केल्यानेही नियंत्रित केली जाऊ शकते.

कशामुळे झाले

योटेट्रानिचस कार्पिनि नावाच्या वेलीवरील पिवळ्या कोळ्यामुळे ही लक्षणे होतात व द्राक्षे आणि पीच सारख्या पिकांना मोठे नुकसान करतात. माद्या लांबट असून त्यांचा रंग फिकट ते लिंबाच्या पिवळ्या रंगासारखा असतो. त्या फांद्यांच्या सालींखाली गटाने त्यांची सुप्तावस्था घालवतात. जेव्हा पहिली फुट दिसायला लागते तेव्हा ते बाहेर येऊन जवळपास दहा दिवस नव्या पानांवर उपद्रव करतात. मग ते पानांच्या खालच्या बाजुला बारीक रेघ असलेली गोलाकार अर्धपारदर्शक अंडी घालतात. पिल्लावस्थेत ते एक मोठ्या समूहामध्ये आढळतात व एका पातळ जाळीद्वारे संरक्षित असतात आणि पानांच्या शिरांनी तयार केलेल्या रसाला शोषतात. माद्या जास्तीत जास्त १२ ते ३० दिवस जगतात आणि पानांची स्थिती तसेच तापमानावर अवलंबुन त्यांच्या पिढ्या (५ ते ६) होतात. त्यांच्या वाढीला २३ डिग्री सेल्शियस हे तापमान उत्कृष्ट असते.


प्रतिबंधक उपाय

  • उन्हाळ्यात आणि कळ्या येण्याच्या सुमारास कोळ्याच्या लक्षणांसाठी निरीक्षण करा.
  • कीटनाशकांचा वापर सिमित ठेवा जेणेकरुन हॉर्नबीम माइटचे नैसर्गिक शत्रु प्रभावित होणार नाही.

प्लँटिक्स डाऊनलोड करा