इतर

स्टोन फ्रुट (टणक बिया असणारी फळे) फळांवरील जिवाणूजन्य ठिपके

Xanthomonas arboricola

जीवाणू

5 mins to read

थोडक्यात

  • पानांच्या खालच्या बाजुला पाणी शोषल्यासारखे जांभळट भाग येतात.
  • पानांवर, सहसा टोकाच्या बाजुला मध्यशिरेला लागुन कोणेदार, तसेच संख्येनेही जास्त असतात.
  • गंभीर पानगळतीमुळे बहुधा फळांचे आकार कमी भरुन ती उन्हाने करपुन तडकतात.

मध्ये देखील मिळू शकते

4 पिके
बदाम
जर्दाळू
चेरी
पीच

इतर

लक्षणे

प्रभावित झाडाच्या जातीप्रमाणे लक्षणे वेगवेगळी असतात. सुरवातीला, पानांच्या खालच्या बाजुला बहुधा टोकाजवळ किंवा मध्य शिरांजवळ, बारीक, पाणी शोषलेले आणि राखाडीसर डाग येतात. काही काळानंतर कोणेदार ते बेढब आकाराचे आणि जांभळे, तपकिरी किंवा काळे होतात. काहीवेळा त्यांची केंद्रे सुकुन गळतात ज्यामुळे फाटलेले "शॉट होल" दिसते. गंभीरपणे संक्रमित पाने पिवळी पडतात किंवा करपतात आणि अकाली गळतात ज्यामुळे पानगळ होते. फळांवर छोटे, गोल, खोलगट भाग तयार होतात, काही वेळा ऊन एकाच भागाला लागल्यानेही हे होते. हे भाग गडद हिरवे, तपकिरी ते काळे असतात आणि त्याभोवताली पाणी शोषल्यासारखी प्रभावळ असते. जसे ते फळ पक्व होते, हे भाग कडक होतात आणि काही वेळा त्यातुन पिवळसर चिकट स्त्राव पावसानंतर गळतो. संधीसाधु जंतु चीर गेलेल्या किंवा नुकसानीत फळात घर करतात ज्यामुळे कूज होते. काटक्यांवर फोड येतात जे नंतर कँकर्समध्ये विकसित होतात ज्यातुन जंतुमय रस गळतो.

Recommendations

जैविक नियंत्रण

झँथोमोनाज अॅर्बोरिकोलावरील कोणतेही पर्यायी उपचार आम्हास ठाऊक नाहीत, माफ करा. जर आपल्याकडे ह्या रोगावरील काही उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जंतुजन्य डागांच्या नियंत्रणासाठी पूर्ण यशस्वी फवारे नाहीत. प्रतिबंधक उपाय आणि रसायनिक उपचारांचे संयोजन ह्याच्या घटना कमी करण्यासाठी गरजेचे आहे. कॉपरवर आधारीत फवारे एकेकटे किंवा प्रतिजैवकांबरोबर वापरल्यास मध्यम प्रतिबंध करता येऊ शकतो. पानांना नुकसान होऊ नये म्हणुन मात्रा हळुहळु कमी करावी लागते.

कशामुळे झाले

झँथोमोनाज आर्बोरिकोला नावाच्या जंतुंमुळे ही लक्षणे उद्भवतात, ज्यांचे यजमान आहेत पीच, नेक्टरिन, प्रुन,प्लम आणि अॅप्रिकॉट. कळ्यांवर, फांदीवरील खाचात किंवा पानांवरील ओरखड्यात हे जंतु विश्रांती घेतात. वसंत ऋतुत जेव्हा हवामान अनुकूल असते तेव्हा ह्यांची वाढ परत सुरु होते आणि फांदीच्या उरलेल्या भागात घर करतात, आणि जंतुमय रस सोडतात. पडणार्‍या दवाने, वार्‍याने किंवा पावसाच्या उडणार्‍या पाण्याने हा द्रव पसरुन निरोगी काटक्यांवर, फळांवर आणि पानांवर पडतो. पानांवरील किंवा सालीवरील नैसर्गिक छिद्रातुन आत शिरतो. ऊबदार तापमानवाबरोबर (२१-२९ अंश) हलका पाऊस, जास्त दव आणि जोरदार वाहता वारा ह्या रोगाच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी अनुकुल असतो. ह्याउलट जर हवामान उष्ण आणि कोरडे असेल तर ह्या जंतुची वाढ आणि संक्रमण प्रक्रिया बाधीत होते. रोगामुळे उत्पन्नाचा नाश होतो जो संवेदनशील वाणात खूपच जास्त असु शकतो.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोताकडुन निरोगी बियाणे किंवा रोपणीचे सामान घ्या.
  • ह्या रोगास थोडाफार प्रतिकार करणारे वाण लावा.
  • खोलगट किंवा सावलीतल्या जागा जिथे हवा चांगली खेळती नाही आणि पाण्याचा निचरा चांगला होत नाही, त्या टाळा.
  • हवा चांगली खेळण्यासाठी आणि रोपाचा जोम कायम राखण्यासाठी झाडाची छाटणी करा.
  • ओल्या हवेत छाटणी करु नका.
  • कोवळ्या लागवडीत जोम चांगला राखा.
  • जोरदार वार्‍याने मातीचे कण उडुन रोपांना होणारे नुकसान टाळण्यासाठी जमिनीवरील आच्छादने घाला किंवा वार्‍याचे अडथळे उभारा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा