लिंबूवर्गीय

लिंबुवर्गीय पिकांवरील देवी रोग (कँकर)

Xanthomonas axonopodis pv. citri

जीवाणू

5 mins to read

थोडक्यात

  • पिवळ्या प्रभावळने वेढलेले लालसर तपकिरी मस्स्यासारखे खड्डे पानांवर दिसतात.
  • नंतर ते फुटुन फिकट तपकिरी किंवा राखाडी असलेले केंद्र , तेलकट, पाणी शोषलेल्या कडा असलेल्या डागात बदलतात.
  • अशीच लक्षणे फळ आणि काटक्यांवरही दिसु शकतात.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

झाडाच्या वाढीच्या सर्व टप्प्यांवर संक्रमण होऊ शकते आणि लक्षणे पान, फळ किंवा फांद्यांवर दिसु शकतात. बारीक थोडे उंचवटलेले आणि स्पंजासारखे डाग पहिल्यांदा नविन संक्रमित पानांच्या दोन्ही बाजुला उमटतात. कालांतराने ते ठिपके वाढुन लालसर तपकिरी मस्स्यासारखे खड्डे बनुन आजुबाजुने वैशिष्ट्यपूर्ण ठळक पिवळी प्रभावळ दिसते. अखेरीस ते फुटतात, त्यातील सामग्री बाहेर पडते आणि फिकट तपकिरी किंवा राखाडी तेलकट केंद्र असलेले आणि पाणी शोषल्यासारख्या तपकिरीसर कडा असलेले विशिष्ट डाग तयार होतात. क्वचित कँकर्सचे केंद्र गळुन पडतात ज्यामुळे बंदुकीने गोळी मारल्यासारखे छिद्र पडतात. अशीच लक्षणे फळ आणि फांद्यांवर आढळतात जिथे कँकर बरेच मोठे होतात. या डागांचे केंद्र विशेषतः उंचवटलेले आणि दिसायला खपली किंवा बुचासारखे असते. पानगळ आणि अकाली फळगळ होते आणि वाहक भाग वेढला गेल्याने फांद्या वाळतात. जी फळे तयार होतात ती विक्रीलायक रहात नाहीत.

Recommendations

जैविक नियंत्रण

झँथोमोनस अॅक्सोनोपोडिस पीव्ही. सिट्रीविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. दुर्दैवाने एकदा निदान झाल्यानंतर सिट्रस कँकरविरुद्ध कोणतेही परिणामी नियंत्रक उपाय नाहीत. रोगाचा बागेतील प्रभाव कमी करण्यासाठी प्रतिबंधक उपाय जसे कि झाडांच्या गळलेल्या सामग्रीला गोळा करुन नष्ट करणे. सिट्रस सिलिडचे नियंत्रण देखील नुकसान सीमित करण्याचा मार्ग आहे. कॉपरवर आधारित बुरशीनाशके किंवा जिवाणूनाशके संक्रमणाविरुद्ध बंधन देऊ शकतात पण असलेल्या संक्रमणाचा उपचार करु शकत नाहीत.

कशामुळे झाले

लिंबुवर्गीय आणि कुटुंबातील व्यावसायिक पिकांवरील खैर्या रोग हा खूप गंभीर आणि सांसर्गिक रोग आहे. झँथोमोनस सिट्री नावाच्या जिवाणूमुळे हा रोग होतो, जे १० महिन्यांपेक्षा जास्त काळापर्यंत फळ, पान आणि फांद्यांवरील व्रणात रहातात. झाडाला झालेल्या जखमा किंवा पानाच्या नैसर्गिक छिद्रातुन ते आत शिरतात आणि तिथे पद्धतशीरपणे वाढतात. पानांवर आणि इतर भागात तयार होणार्‍या खड्ड्यात जिवाणू असतात जे पाने ओली असताना, पावसाच्या उडणार्‍या पाण्याने किंवा तुषार सिंचनाने कमी अंतरावर पसरतात. या रोगाला उच्च आर्द्रता, उष्ण (२०-३० डिग्री सेल्शियस) तापमान आणि पावसाळी वातावरण ज्यात जर जोरदार वारे असले तर उत्तम, फार मानवते. सिट्रस सिलिडस, नागअळी, पक्षी तसेच संक्रमित हत्यारे आणि अवजारेसुद्धा या जिवाणूची बागेतुन किंवा झाडांतुन वहन करतात. अखेरीस संक्रमित झाडाचे किंवा भागांचे वहन बागेतुन किंवा रोपवाटिकेतुन केल्यास या रोगाची समस्या वाढु शकते.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या भागातील क्वारंटाइन नियम तपासा.
  • रोगाला जास्त प्रतिकारक वाण निवडा.
  • प्रमाणित स्त्रोतांकडुन निरोगी रोप सामग्री घ्या.
  • रोगाच्या लक्षणांकरीत झाडांचे निरीक्षण करा.
  • कोरड्या मोसमात संक्रमित झालेले झाडाचे भाग छाटुन टाका.
  • रोगाचा प्रसार टाळण्यासाठी वापरलेली हत्यारे आणि अवजारे पुन्हा वापरण्याआधी निर्जंतुक करा.
  • झाडी ओली असताना बागेत काम करु नका.
  • वेगवेगळ्या शेतात काम करण्यापूर्वी पायताण, कपडे चांगले स्वच्छ करा.
  • जवळपासच्या निरोगी झाडांना बाधा होऊ नये म्हणुन गंभीरपणे संक्रमित झालेली झाडे नष्ट करा.
  • पडलेली पाने, फळे किंवा फांद्या जमिनीवरुन गोळा करुन नष्ट करा.
  • प्रसार थांबविण्यासाठी दोन बागांमध्ये दाट झाडांचे कुंपण लावा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा