लिंबूवर्गीय

लिंबुवर्गीय पिकांवरील जिवाणूजन्य ठिपके

Xanthomonas alfalfae subsp. citrumelonis

जीवाणू

5 mins to read

थोडक्यात

  • मुख्यत: हा रोग ट्रायफॉलिएट नारंगीचा आणि त्याच्या संकरीत वाणांचा उदा.
  • रोपवाटिकेतील परिस्थितीत स्विंगल सिट्रुमेलोचा आहे.
  • चपटे किंवा खोलगट गोलाकार डाग ज्यांचे केंद्र करपट असते जे नंतर गळुन पडल्याने बंदुकीने गोळी मारल्यासारखे छिद्र तयार होते.
  • या डागाभोवती पाणी शोषल्यासारखी कडा व फिकट पिवळी प्रभावळ असते.
  • गंभीर संक्रमण झालेली पाने पिवळी पडतात किंवा करपुन अकाली गळतात.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

मुख्यत: हा रोग ट्रायफॉलिएट नारंगीचा आणि त्याच्या संकरीत वाणांचा उदा. रोपवाटिकेतील परिस्थितीत स्विंगल सिट्रुमेलोचा आहे. संत्र्याच्या इतर प्रकारांवर येणार्‍या लिंबुवर्गीय पिकावरील खैर्‍या रोगसारखीच याची लक्षणे असतात पण ते चपटे किंवा खोलगट असतात आणि उंचवटलेले नसतात. पानांवर त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे गोलाकार, तपकिरी, करपट केंद्र जे नंतर तडा जाऊन गळुन पडते आणि बंदुकीने गोळी मारल्यासारखे छिद्र दिसते. लिंबुवर्गीय पिकावरील खैर्‍या रोगासारखेच त्यांच्या सभोवताली पाणी शोषल्यासारख्या कडा आणि फिकट पिवळी प्रभावळ असते. लिंबुवर्गीय पिकावरील खैर्‍या रोगापेक्षा काही जास्त आक्रमक स्ट्रेनसनी तयार केलेल्या डागांच्या कडा जास्त ठळकपणे पाणी शोषल्यासारख्या असतात. कालांतराने ते मोठे होतात आणि एकमेकात मिसळुन टोकदार किंवा अनियमित फिकट तपकिरी भाग तयार होतात. गंभीर संक्रमणात पाने पिवळी किंवा करपल्यासारखी होऊन अकाली गळु शकतात ज्यामुळे पानगळ होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

झँथोमोनाज अल्फाल्फेविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. लिंबुवर्गीय पिकांवरील डाग देणार्‍या जिवाणूंचे पूर्ण नियंत्रण करण्यासाठी कोणताही यशस्वी फवारणी कार्यक्रम उपलब्ध नाहीत.यांची घटना कमी करण्यासाठी प्रतिबंधक उपाय आणि रसायनिक उपचारांचा संयोग गरजेचा आहे. कॉपरवर आधारीत एकटे किंवा प्रतिजैविकांबरोबर किंवा मँकोझेब रसायनांबरोबर फवार्‍यांचा वापर केल्यास मध्यम परिणाम मिळतात. पानांना नुकसान होऊ नये आणि जंतुंमध्ये प्रतिकार निर्माण होऊ नये याकरीता वापराची मात्रा (प्रमाण) हळुहळु कमी केली पाहिजे.

कशामुळे झाले

झँथोमोनाज अल्फाल्फे नावाच्या जिवाणूमुळे हा रोग होतो. या जिवाणूच्या तीन प्रजाती आहेत ज्या त्यांच्या यजमानात वेगवेगळ्या गंभीरतेच्या पातळीची लक्षणे दर्शवितात. वार्‍याने उडणारा पाऊस, पडणारे दव किंवा तुषार सिंचनाने यांचा प्रसार बागेतील रोपवाटिकेत होतो. जिवाणूचे वहन एका झाडावरुन दुसर्‍या झाडावर मुख्यत: जेव्हा पाने ओली असतात तेव्हा बागेत किंवा रोपवाटिकेत काम केल्याने हत्यारांद्वारे होते. पानांवरील किंवा खोडावरील नैसर्गिक छिद्रांतुन हे जंतु आत शिरतात. तथापी, जेव्हा कोवळ्या रोपांची लागवड बागेत केली जाते तेव्हा हे जंतु मरतात आणि लक्षणे हळुहळु नाहीशी होतात. ऊबदार हवामान (१४ ते ३८ डिग्री सेल्शियस) याबरोबर हलका पाऊस, जास्त दव आणि वारे यामुळे रोगाचा विकास आणि प्रसार चांगला होतो. याविरुद्ध जेव्हा हवामान ऊष्ण आणि कोरडे असते तेव्हा जिवाणूची वाढ आणि संक्रमण प्रक्रियेत बाधा येते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोताकडुन निरोगी लागवड सामग्री घ्या.
  • या रोगाचा थोडातरी प्रतिकार असणारे वाण निवडा.
  • खोलगट, कमी प्रकाश आणि कमी खेळती हवा असणारे किंवा मातीचा र्‍हास झालेल्या जमिनीत लागवड टाळा.
  • झाडाचा जोम राखण्यासाठी आणि हवा चांगली खेळती ठेवण्यासाठी छाटणी करा.
  • नविन लागवड जोमदार राहील याकडे लक्ष द्या.
  • झपाट्याने वाढणार्‍या झाडांचे कृत्रिम किंवा नैसर्गिक कुंपण करून जोरदार वार्‍याने उडणार्‍या मातीमुळे होणारे नुकसान टाळता येतात.
  • झाडी पावसाने किंवा दवाने ओली असते तेव्हा शेतात काम करणे किंवा छाटणी करणे टाळा.
  • संक्रमित कोंबांची छाटणी करते वेळेस सालीवरील संक्रमणाच्या काही सें.मी.
  • खालच्या भागापासून छाटणी करा.
  • नागअळी सारख्या उपद्रवी किड्यांचे नियंत्रण करा जेणेकरुन पानांना नुकसान होऊन संक्रमण होणार नाही.
  • बागेत काम केल्यानंतर हत्यारे आणि अवजारे निर्जंतुक करा.
  • आपल्या देशातील संभावित क्वारंटाईन नियम तपासा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा