केळी

मोको रोग

Ralstonia solanacearum

जीवाणू

5 mins to read

थोडक्यात

  • संक्रमित झाडांची पान वाळतात आणि नंतर कोलमडतात.
  • जर पाने कापली तर स्पष्ट फिकट पिवळी ते तपकिरी रंगहीनता शीरांच्या भागात दिसते.
  • संक्रमित फळाची वाढ विकृत होते आणि आतील गर कोरड्या कुजीने नष्ट झाल्यामुळे ती आक्रसतात.
  • फळे उघडल्यास जिवाणूचे स्त्राव दिसते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

केळी

लक्षणे

संक्रमित झाडांची कोवळी पाने कोमजतात आणि नंतर मर होऊन कोलमडतात. देठांतील जोम जातो, ज्यामुले हिरवी पाने देखील लोमकाळतात आणि झाडाचा जोम कमी होतो. जसजसा रोग वाढतो, जुन्या पानांवरही प्रभाव दिसु लागतो. स्पष्ट, फिकट पिवळी ते तपकिरी रंगहीनता शिरा कापल्यास दिसते. संक्रमित फळांचे आकार विकृत होतात आणि आतील गर कोरड्या कुजीमुळे नष्ट झाल्याने आक्रसतात, आत फक्त गडद तपकिरी रंगाचा रंगहीन मांसल भाग दिसतो. जर फळे उघडली तर जिवाणूचा स्त्राव दिसु शकतो. झाडात जिवाणू वाढल्याने वहनाची समस्या होते आणि पाणी तसेच पोषके झाडाच्या वरच्या भागात पोचत नाहीत.

Recommendations

जैविक नियंत्रण

रोपाभोवती ब्लीचिंग पावडर पसरल्यास रोगाचा प्रसार सिमीत करता येतो. लागवडीआधी जमिनीत १% बोर्डो मिश्रणाची आळवणी करा, ०.४% कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा स्ट्रेप्टोमायसिन किंवा स्ट्रेप्टोमायसिलिन (५ ग्राम/ १०ली.) सारख्या प्रतिजैविकांत ३० मिनीटे रोप बुडवून नंतर लागवड करावी.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मोको रोगासाठी कोणतेही थेट रसायनिक उपचार उपलब्ध नाही.

कशामुळे झाले

रालस्टोनिया सोलानासेरम नावाच्या जिवाणूमुळे मोको नावाचा केळीवरील रोग होतो. हे संक्रमित झाडांच्या भागात किंवा इतर यजमानांवर पूर्ण वर्ष रहातात किंवा जमिनीत १८ महिन्यापेक्षा अधिक काळ राहू शकतात. उच्च तापमान आणि जमिनीतील उच्च आर्द्रता रोगास चांगली मानवते. जंतुंचा प्रसार एका झाडा वरून दुसऱ्या झाडावर किंवा बागांतुन वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो. झाडाचे सर्व भाग (मुळापासुन ते फळांच्या सालीपर्यंत) संक्रमाणाचे संभाव्य स्त्रोत आहेत. याच कारणासाठी, छाटणी तसेच झाडास इजा होणे टाळावे. संक्रमित माती जेव्हा गाडीच्या चाकाला लागुन, पायताणाने किंवा प्राण्यांद्वारे पसरते तेव्हा प्रसाराचा तो आणखीन एक स्त्रोत असतो. फुल खाणारे किडे किंवा पक्षी (मधमाशी, वॅस्पस आणि फळमाशी) आणि पर्यायी यजमान देखील रोगाचा प्रसार करु शकतात. रोगाचा प्रसार सिंचनाद्वारे किंवा वाहत्या पाण्यानेही होऊ शकतो.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोतांकडुन निरोगी लागवड सामग्री वापरा.
  • रोगाच्या कोणत्याही लक्षणांसाठी बागाचे निरीक्षण करा.
  • झाडांचे अवशेष काढुन जाळुन टाका.
  • पाटातुन पाणी देणे टाळा आणि शक्य झाल्यास निर्जंतुक केलेले पाणी वापरा.
  • कापणीची हत्यारे, पायताण आणि गाडीची चाके निर्जंतुक करुन पुढील प्रसार थांबवा.
  • १०% गाईचे ताजे शेण पातळ करुन झाडांच्या सभोवताली टाका.
  • बागेतुन तण आणि हेलिकोनिया प्रजातीची झाडे काढुन टाका.
  • पाण्याचा निचरा चांगला होऊ द्या.
  • किमान सहा महिन्यांसाठी जमिन पडिक ठेवा.
  • १२ महिन्यांसाठी पीक फेरपालट करा.
  • फ्रेंच झंडूसोबत आंतरपीक करून या रोगाचा प्रसार कमी करा.
  • मशागत करताना झाडांना धक्का लागु नये याची काळजी घ्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा