भात

पानावरील जिवाणूजन्य रेषा

Xanthomonas oryzae pv. oryzicola

जीवाणू

5 mins to read

थोडक्यात

  • गडद हिरवे व कालांतराने तपकिरी ते पिवळसर राखाडी होणारे समांतर व्रण पानांवर येतात.
  • संपूर्ण पान तपकिरी होऊ शकते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात संक्रमित पानांवर पाणी शोषल्यासारखे ठिपके असलेल्या गडद-हिरवट रेषा दिसून येतात. या रेषांची संख्या वाढते आणि त्या पिवळसर नारिंगी ते तपकिरी होतात. रेषात जिवाणूंनी सोडलेले पिवळसर थेंब दिसु शकतात. भातावरील पर्ण ठिपक्यांच्या नंतरची लक्षणे ही कडा करप्यासारखीच असतात पण पर्ण ठिपक्यांच्या रेषा जास्त समांतर असतात आणि किनारीही कडा करप्याने संक्रमित पानांच्या कडांसारख्या जास्त वेड्यावाकड्या नसतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

झॅन्थोमोनाज ऑरिझे पीव्ही. ऑरिझिकोलाविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत, माफ करा. जर आपणांस या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. गंभीर संक्रमण झाल्यास ओंब्या येण्याच्या सुमारास कॉपरवर आधारीत बुरशीनाशके वापरुन भातावरील पर्ण ठिपक्याचे प्रभावी नियंत्रण केले जाऊ शकते. कॉपरयुक्त बुरशीनाशके फुलोर्‍यांच्या उशीराच्या काळानंतरच वापरावे.

कशामुळे झाले

सिंचनाच्या पाण्याने जिवाणू पसरतात आणि संक्रमणाचा संबंध पाऊस, उच्च आर्द्रता आणि उच्च तापमानाशी जोडला जातो. रोगाचा विकास थंड आणि कोरड्या वातावरणात होत नाही. जिवाणू पानांवरील नैसर्गिक छिद्रातुन आणि जखमातुन आत प्रवेश करतात आणि तिथेच संख्येने वाढतात. पानांच्या पृष्ठभागावर जिवाणूनी सोडलेल्या द्रवाचे प्रमाण हे रात्रीच्या आर्द्रतेवर अवलंबुन असते.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी आणि रोग प्रतिकारक रोपांची लागवड करा.
  • शेतातील तण नियंत्रण चोखपणे करा.
  • भाताचे धसकट, तूस आणि स्वयंभू रोपांना नांगरुन जमिनीत गाडा.
  • पोषक तत्वांची विशेषतः नत्राची उपलब्धता व्यवस्थित राहील याची काळजी घ्या.
  • शेतातील आणि रोपवाटिकेतील पाण्याचा निचरा चांगला होऊ द्या.
  • पीक नसलेल्या काळात जमीन चांगली तापू द्या जेणेकरून जमीन व अवशेषातील जिवाणू मरतील.
  • खूप पाणी साचल्यास वाहून जाऊ द्यात.
  • थंड वातावरणात पेरणी करा जेणेकरून जंतु वाढु शकणार नाहीत.

प्लँटिक्स डाऊनलोड करा