स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीच्या पानांवरील कोणेदार ठिपके

Xanthomonas fragariae

जीवाणू

5 mins to read

थोडक्यात

  • पानांच्या खालच्या बाजुला पाणी शोषल्यासारखे अर्धपारदर्शक आणि कोणेदार डागांच्या रुपात लक्षणे दिसतात.
  • डाग नंतर एकमेकांत मिसळतात आणि लालसर तपकिरी धब्बे पानांवर तयार होतात.
  • जंतुंचा चिकट स्त्राव ह्या डागातुन स्त्रवतो.
  • फ़ळांच्या फांद्या गडद होतात आणि फळे सुकतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी

लक्षणे

रोपाचा प्रकार, हवामान परिस्थिती आणि वर्षातील काळ ह्याप्रमाणे लक्षणे बदलतात. सुरवातीला पाणी शोषल्यासारखे, गडद हिरवे विशिष्ट कोणेदार ठिपके पानांच्या खालच्या पृष्ठभागावर दिसतात. जर पान उन्हात धरले तर ठिपके अर्धपारदर्शक आणि पानांच्या छोट्या शिरांनी वेढलेले दिसतात. जेव्हा आर्द्रता जास्त असते तेव्हा जंतुंनी सोडलेल्या चिकट स्त्रावाचे थेंब ह्या डागातुन गळतात. जसजसा रोग वाढत जातो, तसे डाग अखेरीस ओबड धोबड, तपकिरी किंवा लालसर डागांच्या रुपात पानांच्या वरच्या पृष्ठभागावरही दिसु लागतात. ते नंतर एकमेकांत मिसळतात आणि वाळलेल्या उतींचे मोठे धब्बे तयार होतात, त्यामुळे पाने फाटल्यासारखी आणि भाजल्यासारखी दिसतात. फळांच्या फांद्या तपकिरी काळ्या होऊ शकतात आणि फळे सुकतात कारण पाणी पुरवठा होत नाही. ह्यामुळे फळांची प्रत आणि रुप ह्यावर परिणाम होतो. फळात गोडवा नसतो पण सातत्य नेहमीसारखीच रहाते.

Recommendations

जैविक नियंत्रण

प्रमाणित जैव कॉपर द्रावणांच्या फवारे मारल्यास रोग कमी होतो. सिट्रीक आणि लॅक्टिक अॅसिडची द्रावणे वाढणार्‍या पानांना आणि फळांवर वापरल्यास मोसमातील लवकर लागणीपासुन वाचवु शकतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कॉपरवर आधारीत उत्पाद कमी तापमानात वापरले असता , जंतुंच्या स्त्रावामुळे एका रोपापासुन दुसर्‍या रोपाला होणारी लागण कमी होते. तरीपण, कितीवेळा आणि किती मात्रेत द्यायचे ह्याची योजना बरोबर आखली गेली पाहिजे म्हणजे रोपांना नुकसान होणार नाही. कोरड्या हवेत आणि फुले येण्याच्या सुमारास कॉपर एजंटसचा वापर करु नका. कॉपर हायड्रॉक्साइडची द्रावणे कॉपर सल्फेटच्या द्रावणांपेक्षाही जास्त परिणामकारक असु शकतात. ऑक्झॉलिनिक अॅसिडच्या वापराने रोपवाटिकेच्या काळात चांगले परिणाम दिले. लागवडीच्या सुमारास व्हॅलिडामायसिन-ए हे परिणामकारक द्रावण आहे.

कशामुळे झाले

झॅन्थोमोनोज फ्रॅगेरि नावाच्या जंतुंमुळे ही लक्षणे उद्भवतात जे जमिनीवरील सुक्या पाल्या पाचोळ्यात किंवा जमिनीत गाडलेल्या पानात सुप्तावस्थेत रहातात. हे अतिशय टोकाच्या परिस्थितीला प्रतिरोध करु शकतात जसे कि कोरडेपणा. वसंत ऋतुत जंतुची वाढ पुन्हा सुरु होते आणि ते नविन निरोगी रोपांना बाधीत करतात. एका रोपावरुन दुसर्‍या रोपावर त्यांचे वहन पावसाच्या किंवा तुषार सिंचनाचे पाणी उडण्याने होते. पानाच्या खालच्या पृष्ठभागावर त्यांनी सोडलेला चिकट स्त्राव हा दुय्यम लागणीचा स्त्रोत आहे. दोन्ही बाबतीत जंतु रोपात रोपाच्या नैसर्गिक छिद्रातुन किंवा शेतात काम करताना रोपाला झालेल्या जखमातुन प्रवेश करतो. किंवा बाधीत रोपे नविन शेतात नेऊन लावल्यास लागण होते. थंड आणि आर्द्र हवामान जसे वसंत ऋतुतील थंड दिवस आणि गोठविणारे रात्रीचे तापमान ह्यांना अनुकूल असते.


प्रतिबंधक उपाय

  • पेरणीसाठी प्रमाणित स्त्रोतांकडुन निरोगी बियाणे घ्या.
  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास प्रतिरोधक वाण लावा.
  • रोपांत पुरेसे अंतर ठेवा.
  • डोक्यावरुन सिंचन टाळा आणि सिंचन करताना रोपांवरुन पाणी लवकर सुकेल याची काळजी घ्या.
  • वाळलेले गवत अंथरल्याने पाणी उडणे कमी होते.
  • रोपे ओली असताना अवजारे आणि शेतमजुरांची जास्त हालचाल होणार नाही याची खात्री करा.
  • शेतात काम करताना रोपांना इजा होऊ देऊ नका.
  • पीक फिरवणीची शिफारस करण्यात येत आहे.
  • पानांवर कोणेदार ठिपके ज्या शेतात आले असतील तिथे पुढची ३ वर्षे तरी स्ट्रॉबेरीची लागवड करु नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा