बटाट्यावरील बांगडी रोग

 • लक्षणे

 • सुरु करणारा

 • जैव नियंत्रण

 • रासायनिक नियंत्रण

 • प्रतिबंधक उपाय

बटाट्यावरील बांगडी रोग

Streptomyces scabies

जंतु


थोडक्यात

 • झाडाच्या वरच्या भागात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
 • बटाट्याच्या पृष्ठभागावर तपकिरी, जाडसर खरबडीत फोड दिसतात.
 • बटाट्याच्या कंदावर उथळ ते खोल छिद्रे आणि जाळीसारख्या चिरा दिसतात.

यजमान

बटाटा

लक्षणे

झाडाच्या वरच्या भागात म्हणजे पान, फांद्या किंवा देठांवर लक्षणे दिसत नाहीत. तरीपण हे जंतु लक्षणांची मालिका बटाट्याच्या कंदावर दर्शवितात. ती लालसर तपकिरी उंचावटलेली जाड, खरबडीत साल असु शकते किंवा उथळ ते खोल छिद्रे पडलेला पृष्ठभाग असु शकतो किंवा जाळीसारखी छिद्रांची मालिका बटाट्याच्या सालीच्या वरच्या थरात दिसु शकते. ह्यामुळे उत्पादनात घट होते आणि बटाट्याच्या कंदांची प्रतही कमी भरते.

सुरु करणारा

बांगडीचा जिवाणू जमिनीत संक्रमित भागात बीजाणुच्या रुपात जगतो. झाडात जखमेतुन प्रवेश करतो. कंद वाढण्याच्या वेळी कोरडे आणि उष्ण हवामान असल्यास लागणीची जोखिम वाढते. या जिवाणूंना भरपूर प्राणवायुची गरज असते म्हणुन लागण होण्याची शक्यता मोकळ्या आणि चांगल्या हवेशीर जमिनीत जास्त असतात. हे जिवाणू जास्त करुन कोरड्या आणि अल्काच्या जमिनीत सापडतो.

जैव नियंत्रण

कंपोस्ट, कंपोस्ट चहा किंवा दोन्हीचा संयोगाचे उपचार केल्याने या रोगाची तीव्रता कमी होते. जीवाणूंच्या स्पर्धात्मक प्रजातींवर आधारित जैविक खतांचा वापर केल्यास उत्पादनही वाढते व कंदाची प्रतही सुधरते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बटाट्यावरील बांगडी रोगाचा रसायनिक उपचार कठिण असतो कारण त्यामुळे झाडाला जखमा होऊ शकतात. फ्ल्युएन्झिनाम, ऑक्झिटेट्रासायक्लिन, क्लोरोथॅलोनिल आणि मँकोझेब सारख्या औषधांची बीज प्रक्रिया केल्यास या रोगाची लागण खूप कमी प्रमाणात झालेली आढळून आलेली आहे.

प्रतिबंधक उपाय

 • सहनशील वाण लावा.
 • चांगला समन्वय असलेल्या पिकांसोबत पीक फेरपालट करा.
 • नियमित पाणी देऊन जमिनीची आर्द्रता राखा पण जास्त पाणी देऊ नका.
 • विशिष्ट पोषण योजनेसह मातीची सामू पातळी कमी ठेवा उदा.
 • मूलभूत गंधक, जिप्सम किंवा अमोनियम सल्फेट वापरुन जमिनीचा सामू कमी राखा आणि रोगाची गंभीरता कमी करा.
 • जमिनीचे सामू कमी करण्यासाठी लागवडीपूर्वी चुन्याचा वापर करु नका.