मका

मक्यावरील लीफ स्ट्रीक व्हायरस

MSV

विषाणू

5 mins to read

थोडक्यात

  • संक्रमणाच्या सुरवातीच्या टप्प्यावर बारीक, पिवळे, गोलाकार ठिपके कोवळ्या पानांच्या बुडाजवळ दिसतात.
  • ठिपक्यांची संख्या वाढत जाते आणि ते एकमेकात मिसळतात.
  • कालांतराने ते अरुंद पांढर्‍या ते पिवळ्या छटेच्या पट्ट्यामध्ये विकसित होतात व पानांच्या शिरांना समांतर वाढतात.
  • ते पूर्ण पान ग्रासु शकतात आणि परिणामी झाडाची वाढ खुंटते, कणसे बरोबर विकसित होत नाहीत आणि दाणेही व्यवस्थित भरत नाहीत.

मध्ये देखील मिळू शकते

5 पिके

मका

लक्षणे

लक्षणे वाण आणि हवामान परिस्थिती अनुरूप थोडी फार बदलु शकतात. संक्रमणाच्या सुरवातीच्या टप्प्यावर बारीक, पिवळे, गोलाकार ठिपके कोवळ्या पानांच्या बुडाजवळ दिसतात. जसजसा रोग वाढत जातो तसतशी ठिपक्यांची संख्याही वाढत जाते आणि ते एकमेकात मिसळतात. संवेदनशील प्रकारच्या वाणात, ठिपके अरुंद, पांढर्‍या ते पिवळ्या छटेच्या पट्ट्यात बदलतात जे पानांच्या शिरेला समांतर वाढतात. जर वाढीच्या सुरवातीच्या टप्प्यावर लागण झाली तर छटा पूर्ण पानास ग्रासते आणि झाडाची वाढ खुंटते, फुल आणि कणीस नीट विकसित होत नाहीत तसेच दाणेही व्यवस्थित भरत नाहीत.

Recommendations

जैविक नियंत्रण

एमएसव्हीवर कोणतेही जैविक उपचार सध्यातरी उपलब्ध नाहीत. जर आपल्याकडे या रोगावरील काही खात्रीलायक उपचार असल्यास कृपया आम्हाला सांगा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. विषाणूंच्या रोगांसाठी कोणाताही रसायनिक उपचार उपलब्ध नाही. विषाणू वाहकांची संख्या कमी केल्याने रोगाचा प्रसार कमी होतो. डायमेथोएट किंवा मॅलेथियॉनवर आधारीत उत्पादांच्या फवारण्या केल्या जाऊ शकतात पण हे उपाय संभावित उत्पादनाचे नुकसान आणि रोगाची साथ येण्याची अनिश्र्चितता यांचा विचार करुन केले पाहिजेत.

कशामुळे झाले

मक्यावरील लीफ स्ट्रीक व्हायरस हा मुख्यत्वे आफ्रिकेतील रोग आहे पण दक्षिण पूर्व एशियातही हा सापडल्याचे अहवाल आहेत. सिकाड्युलिना नावाच्या तुडतुड्यांच्या काही प्रजातींमुळे या रोगाचे विषाणू पसरतात. हे तुडतुडे वाढणार्‍या कोवळ्या पानांतील रस शोषण करताना विषाणूंना उचलतात. हवामानाप्रमाणे किड्याचे वाढचक्र २२ ते ४५ दिवसांचे असते. २०-३५ डिग्री सेल्शियसचे तापमान यांच्या विकासासाठी अनुकूल असते आणि परिणामी पिकांना रोग लागण्याची जोखिम वाढते. तृणधान्याचा मोठा गट (गहू, ओट्स, राय, बार्ली, ज्वारी वगैरे) विषाणूंसाठी पर्यायी यजमान म्हणुन काम करतो.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी झाडापासून धरलेले किंवा प्रमाणित स्रोतांकडील बियाणे वापरा.
  • सहनशील किंवा प्रतिकारक प्रकारचे वाण उपलब्ध असल्यास लावा.
  • नाकतोड्याला आकर्षित करणार्‍या, यजमान असणार्‍या पिकांबरोबर आंतरपीक घ्या ज्यामुळे पीकावरील संक्रमण कमी होईल.
  • तुडतुड्यांचे नियंत्रण करण्यासाठी अडथळे तयार करा.
  • शेताचे निरीक्षण करुन संक्रमित झाड शोधुन नष्ट करा.
  • शेतातील आणि आजुबाजुचे तण नियंत्रण करा.
  • एकापाठोपाठ मक्याचे पीक त्याच शेतात घेऊ नका.
  • शेंगवर्गीय पीके जसे कि घेवडा, चवळी किंवा इतर यजमान नसणार्‍या पीकांबरोबर पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा