मका

मक्यावरील करपणे (प्रणघातक मर) रोग

MLND

विषाणू

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर पिवळ्या-हिरव्या उंचवटलेल्या ठिगळांची संरचना शक्यतो शिरांना समांतर दिसतात.
  • पाने कडांपासुन मध्याकडे वाळू लागतात.
  • गंभीर संक्रमणात संपूर्ण झाड वाळते आणि खोडाच्या आत गाभा जळणे यासारखे लक्षण दिसते.
  • वाढ खुंटते, फुल वांझ असतात, कणीस बेढब आणि कमी भरतात.
  • संक्रमित झाडांवर संधीसाधु बुरशी आणि सूत्रकृमी हल्ला करून कूज निर्माण करतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

मका

लक्षणे

संक्रमणाच्या सुरवातीच्या टप्प्यात पानांवर पिवळ्या-हिरव्या उंचवटलेल्या ठिगळांची संरचना शक्यतो शिरांच्या समांतर दिसते आणि पानाच्या बुडापासुन सुरु होते. जसजसा रोग वाढत जातो, पाने शक्यतो कडांपासुन मध्याकडे वाळू लागतात. गंभीर संक्रमणात हीच लक्षणे हळुहळु पूर्ण झाड ग्रासतात आणि खोड चिरले असता आत मृत गाभा सारखी लक्षण दिसतात. संक्रमित रोपाची वाढ खुंटते, फुल वांझ असतात, कणीस बेढब आणि कमी भरतात. संक्रमित झाडांवर संधीसाधु बुरशी आणि सूत्रकृमी हल्ला करून कुज निर्माण करतात आणि दाण्यांचे प्रमाण आणि गुणवत्ता कमी भरते.

Recommendations

जैविक नियंत्रण

माफ करा या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी कोणतेही जैविक उपचार उपलब्ध नाहीत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. विषाणूंच्या रोगांवर कोणतेही रसायनिक उपचार उपलब्ध नाहीत. इमिडाक्लोप्रिडचा वापर बीज प्रक्रियेत आणि फवारणी द्वारे करून केले असता विषाणूंचे वहन करणार्‍या किड्यांच्या संख्येस आळा बसु शकतो.

कशामुळे झाले

मक्याचे सर्व प्रकार या रोगास संवेदनशील आहेत. तरीपण जिवाणू, हवामान परिस्थिती आणि झाडाच्या वाढीचा टप्पा याप्रमाणे लक्षणे थोडी बदलु शकतात. रोग बहुधा मक्यावरील क्लोरोटि मॉटल विषाणू आणि दुसरा विषाणू, बहुधा उसावरील मोझाईक विषाणू अशा दोन विषाणुंच्या संयोगाने होतो. या रोगाचे संक्रमण करणाऱ्या विषांणूंचे वहन बहुधा शेतात आणि आजुबाजुला मक्यावरील फुलकिडे, मुळातील जंत आणि लीफ बीटल तसेच तृणधान्यवरील बीटल द्वारे होतो. दुष्काळ, कमी कसाची जमिन आणि शेतीच्या वाईट सवयी सारख्या विपरित परिस्थितीत लक्षणे अजुन खराब होतात


प्रतिबंधक उपाय

  • सहनशील वाण उपलब्ध असल्यास लावा.
  • निरोगी झाडापासून धरलेले किंवा प्रमाणित स्रोतांकडील बियाणे वापरा.
  • आपल्या भागातील वाहक कीड्यांची उच्च संख्या टाळण्यासाठी मोसमात लवकर किंवा उशीरा पेरणी करा.
  • गंभीर संक्रमण झालेली झाडे पाळामुळासह काढुन जाळा ज्यामुळे रोगाचा प्रसार होणार नाही.
  • शेतातील आणि आजुबाजुचे तण नियंत्रण करा.
  • त्याच भागात मका हे एकच पीक घेऊ नका.
  • शेंगवर्गीय पिके, चवळी, बटाटे, कसावासारख्या आणि इतर यजमान नसणार्‍या पीकांबरोबर पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा