बटाटा

बटाट्यावरील वाय प्रकारचा विषाणू

PVY

विषाणू

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर टोकापासुन सुरु होऊन पिवळे ते गडद हिरव्या रंगाचे ठिगळ येतात.
  • कोंबांवर व पानांवर काळे सुकलेले डाग व रेषा दिसतात.
  • झाडाची वाढ खुंटते.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके
बटाटा
तंबाखू

बटाटा

लक्षणे

लागवड केलेले वाण, झाडाचे वय आणि हवामानाप्रमाणे संक्रमणाची लक्षणे बदलतात. पिवळ्या ते गडद हिरव्या रंगाच्या ठिगळासारख्या संरचना पानाच्या पृष्ठभागावर दिसतात व त्यांना विखुरलेल्या ठिपक्यांचे आणि विकृत रूप देतात जे बहुधा पानाच्या टोकापासुन सुरु होतात. पानांच्या शिरांवर आणि फांद्यांवर तपकिरी ते काळ्या रंगाच्या रेषा आणि मृत पेशींचे गोल डाग दिसतात. कळ्या आणि फुले पुढे विकसित होत नाहीत. संक्रमित झाडांचे कंद लहान आकाराचे असतात आणि त्यांच्या सालीवर सुकलेली किंवा मृत वर्तुळे दिसतात. संपूर्ण झाडाची वाढ खुंटते आणि उत्पादनात मोठी घट येते.

Recommendations

जैविक नियंत्रण

खनिज तेलाचा वापर अठवड्यातुन एकदा केला असता विषाणूंचा प्रसार कमी करता येतो. या तेलाच्या वापरामुळे मावाद्वारे विषाणूचे ग्रहण कमी होते आणि त्यांचे खाण्याचे वर्तन बदलते ज्यामुळे ते निरोगी रोपांवर जास्त संक्रमण करु शकत नाहीत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. विषाणूजन्य रोगांवर कोणतेही रसायनिक उपचार शक्य नाहीत. तरीपण माव्याची संख्या कमी करण्यासाठी कीटनाशकांचा वापर केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

हे विषाणु अत्यंत संक्रमक आहेत. हे मुख्यतः टोमॅटो, बटाटे आणि मिरचीसारख्या सोलॅनेसियस कुटुंबातील पिकांवर जास्त प्रादुर्भाव करतात. या विषाणूचे वहन पंख असलेले मावा, संक्रमित झाडांची सामग्री आणि दुषित अवजारांमुळे होते.


प्रतिबंधक उपाय

  • फक्त प्रमाणित बियाणेच वापरा.
  • सहनशील किंवा प्रतिकारक वाण निवडा.
  • शेताचे निरीक्षण करुन सर्व संक्रमित झाडे काढा/नष्ट करा.
  • अतिसंवेदनशील यजमानांजवळ बटाट्याची लागवड करु नका.
  • तण व मागच्या पिकामुळे आलेली बटाट्याची रोप काढुन टाका.
  • झाडांना इजा होऊ नये याची काळजी घ्या.
  • हत्यारे व अवजारे निर्जंतुक करा.
  • विषाणु सुप्तावस्थेत रहाण्याचे स्त्रोत नष्ट करा, उदा.
  • जुन्या नको असलेल्या बटाट्यांच्या राशी.

प्लँटिक्स डाऊनलोड करा