लाल भोपळा

काकडीवरील विषानुजन्य रोग

CMV

विषाणू

5 mins to read

थोडक्यात

  • पिवळ्या ठिगळांचे पॅटर्न पानांवर आणि फुलांवर दिसतात.
  • पाने आणि पानांचे देठ खालच्या बाजुला वाकतात आणि मुरगळतात.
  • वाढ खुंटते आणि विकृत असते.
  • फुलांवर पांढर्‍या रेषा दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

7 पिके
कारले
काकडी
खरबूज
लाल भोपळा
अधिक

लाल भोपळा

लक्षणे

बाधित झालेल्या झाडांच्या जातीनुसार आणि वातावरणाच्या परिस्थितीनुसार लक्षणे बदलु शकतात. काही वेळा विषाणू हजर असुनसुद्धा लक्षणे छुपी असतात किंवा दिसत नाहीत. पानांवर आणि फळांवर पिवळसर चट्टे किंवा फिकट हिरवे आणि पिवळे दाणे (फोड) दिसुन येतात. फांद्यांची आणि पानाच्या देठांची वाढ आडवी होते, ज्यामुळे पाने आणि त्यांचे देठ खाली वाकलेले दिसतात. नवी पाने सुरकुतलेली आणि अरुंद दिसतात आणि पूर्ण वेलीची वाढ खुंटलेल्या झुडपासारखी दिसते. फुलांवर पांढर्‍या रेषा दिसतात. फळांवर दाणे (फोड) येतात ज्यामुळे ते बाजारात विकल्या जात नाहीत.

Recommendations

जैविक नियंत्रण

पानांवर खनिज तेलाच्या फवारणीनेसुद्धा माव्याचा प्रादुर्भाव कमी होतो आणि त्यामुळे त्यांची लोकसंख्या नियंत्रित रहाते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जर उपलब्ध असली तर जैविक उपचार पद्धतीही वापरा. सीएमव्हीसाठी कोणतेही परिणामकारक रसायन नाही, तसेच असेही कोणते नाही जे रोपाला संसर्गित होण्यापासुन वाचवेल. कीटकनाशक ज्यात सायपरमेथ्रीन किंवा क्लोरपायरिफॉस आहे त्याची फवारणी पानांवर माव्याच्या नियंत्रणासाठी केली जाऊ शकते.

कशामुळे झाले

काकडी मोझाईक व्हायरस (सीएमव्ही)मुळे ही लक्षणे येतात, जी विविध जातींवर परिणाम करतात (वेलवर्गीय पिके, पालक, लेट्युस, ढोबळी मिरची आणि सेलरी तसेच खूपशी फुले खास करुन लिली, डेल्फीनियमस, प्रिम्युलाज आणि डॅफनीज). ह्या विषाणूंचे वहन आणि स्थलांतरण ६०-८० वेगवेगळ्या जातीचे मावा करतात. रोग संक्रमणाचे इतर मार्ग म्हणे संक्रमित बियाणे आणि कलम आणि कामगारांच्या हातावरुन किंवा साधनांवरुन. सीएमव्ही फुलांच्या बारमाही तणात सुप्तावस्थेत राहु शकतात आणि बहुधा पीकावरही, मुळात, बियाणात किंवा फुलातही आपली सुप्तावस्था घालवतात. ह्या विषाणूंचे प्राथमिक संक्रमण, कोवळ्या रोपात होते व कालांतराने हळुहळु वरच्या पानांवर येऊन संपते. जे मावे ह्या रोपांचे रस शोषण करतात ते ह्यांना इतर यजमानांपर्यंत (दुय्यम संसर्ग) पोहचवितात. विषाणू यजमानाच्या वाहिन्यातील पेशींना वापरुन रोपाच्या वेगवेगळ्या भागात पोचतात.


प्रतिबंधक उपाय

  • विषाणूमुक्त बियाणे आणि रोप प्रमाणित स्त्रोताकडुन घेऊन वापरा.
  • प्रतिरोधक किंवा सहनशील वाणांची निवड करा (पालक आणि वेलवर्गीय पिकांसाठी पुष्कळ वाण उपलब्ध आहेत).
  • रोगाच्या लक्षणांसाठी नेहमी पाहणी करा आणि रोगट झाडे काढुन टाका.
  • कोणत्याही तणावरही जर ठिगळांचा पॅटर्न दिसला तर त्यांनाही काढुन टाका.
  • तण काढा तसेच पर्यायी यजमान जे आपल्या पीकाजवळ वाढत असतील त्यांनाही काढा.
  • शेतीशी निगडित हत्यारे आणि अवजारे स्वच्छ ठेवा.
  • पिकाच्या वाढीच्या सुरवातीच्या अठवड्यांमध्ये मावा वगळण्यासाठी फडफडणार्‍या प्लास्टिकच्या पट्ट्या जोडा.
  • हा जास्त असुरक्षिततेचा काळ संपला कि पट्ट्या काढुन टाका म्हणजे मग इतर मित्र किडींची संख्या वाढुन परागीकरणाची शक्यता वाढेल.
  • पीकाच्या बाजुने जी अडथळा पीके माव्यांना आकर्षित करतील ती लावा.
  • जास्त संख्येने माव्यांना पकडण्यासाठी चिकट सापळे वापरा.
  • मावा प्रतिबंधात्मक सामग्री जसे अल्युमिनियम फॉईल जमिनीवर पसरुन ठेवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा