टोमॅटो

रोप मर

Pythium spp.

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • ऊगवणीपूर्वीच्या काळात बियाणे जमिनीतच कुजतात आणि रोप उगवण्यापूर्वीच मरतात.
  • ऊगवलीच तर त्यावर वैशिष्ट्यपूर्ण पाणी शोषलेले, राखाडी, तपकिरी किंवा काळे भाग खोडाच्या बुडाशी दिसतात.
  • कोवळी रोपे किंवा झाडे जमिनीच्या पातळीवरुन आडवी होतात आणि पांढरी किंवा राखाडी बुरशीसारखी वाढीचे आवरण त्यावर दिसते.

मध्ये देखील मिळू शकते

35 पिके
जव
द्वीदल धान्य
कारले
कोबी
अधिक

टोमॅटो

लक्षणे

रोपमर उगवण्यापूर्वी आणि नंतर असे दोन टप्प्यात निदर्शनात येऊ शकते. ऊगवणीपूर्वीच्या टप्प्यात बुरशी बियाणे पेरल्यानंतर त्यात घर करते ज्यामुळे बियाणे कुजते आणि उगवण होत नाही. ऊगवणीनंतरच्या टप्प्यात, मोडाची वाढ फारच कमकुवत असते आणि खोडाच्या बुडाशी कूज लागते. खोड मऊ, चिकट होते तसेच पाणी शोषल्यासारखे , राखाडी, तपकिरी किंवा काळे डाग दिसतात. कोवळी रोपे किंवा झाडे पिवळी पडुन मरगळु लागतात आणि बुड कापल्यासारखी दिसतात. पांढरी किंवा राखाडी बुरशी मृत रोपांवर किंवा जमिनीच्या पृष्ठभागावर दिसते. जेव्हा रोपमर जास्त असेल तेव्हा तुट भरणे किंवा नवीन लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे.

Recommendations

जैविक नियंत्रण

ट्रायकोडर्मा व्हिरिडे, ब्युव्हेरिया बसानिया बुरशी किंवा स्युडोमोनस फ्ल्युरोसेन्स आणि बॅसिलस सबटिलिस जीवाणूवर आधारीत जैविक बु्रशीनाशके बियाणांवरील उपचारांसाठी किंवा रोपणीच्या वेळी मुळांच्या भागात अळवणी केल्यास देखील उगवणीपूर्वीचे मरचा प्रतिबंध किंवा नियंत्रण केले जाऊ शकते. काही वेळा, बियाणांवर कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा बोरडॉक्स मिश्रणासारख्या कॉपर बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया केली असता देखील रोगाच्या घटना आणि गंभीरता कमी करण्यात मदत होते. युपाटोरियम कॅनाबिनम रोपांच्या अर्कांवर आधारीत घरीच बनविलेली द्रावणेही बुरशीची वाढ पुर्णपणे आटोक्यात आणतात. "धूमन पाणी" (रोपांची सामग्री जाळुन धुराला पाण्यात मिसळणे) सिंचन केले असताही बुरशी प्रभावित होते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. रोग टाळण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे प्रतिबंधक उपाय आणि शेताच्या कामात नियमबद्ध वागणुकच आहे. ज्या शेतात याआधी रोपमरचा इतिहास आहे किंवा पाण्याचा निचरा होण्याच्या समस्या आहेत तिथे बुरशीनाशकांना प्रतिबंधक उपाय म्हणुन वापरण्याचा विचार केला जावा. मेटालाक्सिल-एमची बीज प्रक्रिया केल्यास उगवणीपूर्वीची मर नियंत्रित करता येते. कप्तान ३१.८%, किंवा मेटालाक्सिल-एम ७५% यांचा वापर ढगाळ हवामान असताना फवारणी केली असता मदत मिळते. जमिनीत किंवा रोपांच्या बुडाशी कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा कप्तानची दर पंधरा दिवसांनी अळवणी केली जाऊ शकते.

कशामुळे झाले

रोपमर अनेक पिकांना प्रभावित करते आणि पिथियम जातीच्या बुरशीमुळे होते, जी बरेच वर्षांपर्यंत जमिनीत किंवा झाडांच्या अवशेषात जगु शकते. ऊबदार आणि पावसाळी हवामान, जमिनीत जास्तीची आर्द्रता आणि दाट लागवड केल्यास हे रोग फोफावते. पाणी साचणे किंवा जास्त नत्र वापर सारख्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे रोप कमजोर होतात आणि रोगाच्या विकासास अनुकूल देखील असतात. बीजाणू संक्रमित उपकरणे किंवा कपडे, पायताणावरील मातीतुन पसरतात. जरी ती पिकाला वाढीच्या कोणत्याही टप्प्यावर प्रभावित करु शकत असली तरी उगवणारी बियाणे किंवा कोवळी रोपे जास्त संवेदनशील असतात. हा रोग एका हंगामातुन दुसर्‍या हंगामात त्याच ठिकाणी जात नाही पण जेव्हा परिस्थिती संक्रमणास अनुकूल असते तेव्हाच होतो.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी झाडापासून धरलेली किंवा प्रमाणित स्त्रोतांकडील बियाणे वापरा.
  • प्रतिकारक वाण उपलब्ध असल्यास वापरा.
  • जर जमिनीत पाणी साचत असेल किंवा निचरा चांगला होत नसेल तर गादीवाफे वापरा.
  • लागवडीचे अंतर जास्त ठेवा जेणेकरून झाडी चांगली वाळेल.
  • खोल लागवड टाळा.
  • पहिले लक्षण दिसताच संक्रमित रोपे काढुन टाका.
  • नत्रच्या विभाजित मात्रेसह संतुलित खत योजना करा.
  • पाणी नियमित पण मापात द्या.
  • पाणी सकाळी लवकर द्या म्हणजे दिवसभरात जमिन चांगली वाळेल.
  • बांगडी पद्धतीने सिंचन करा म्हणजे पाणी खोडाच्या थेट संपर्कात येणार नाही.
  • एका शेतातुन माती दुसर्‍या शेतात चुकुनही जाणार नाही याची काळजी घ्या.
  • घरात वापरल्या जाणार्‍या ब्लीचने उपकरणे आणि हत्यारे चांगली स्वच्छ करुन ठेवा.
  • काढणीनंतर झाडाचे अवशेष काढुन नष्ट करा.
  • संवेदनशील नसणार्‍या पिकांसह फेरपालट करा.
  • शक्य असल्यास गादीवाफे प्लास्टिकचा कागद अंथरुन उन्हात तापू द्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा