कापूस

कपाशीच्या पानांवरील सर्कोस्पोरा ठिपके

Mycosphaerella gossypina

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • सुरवातीला, लालसर ठिपके पानांवर दिसतात, नंतर ते मोठे होत जातात आणि राखाडी ते तपकिरी रंगाचे होऊन त्यावर गडद किंवा जांभळट रंगाची कडा तयार होते.
  • जसे जसे ते ठिपके मोठे होतात, त्याची कडा एकापाठी एक अशी हलक्या आणि गडद रंगांच्या वर्तुळात बदलत जाते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

कापूस

लक्षणे

हा रोग जास्तकरुन प्रौढ रोपांच्या जुन्या पानांवर पडतो. प्रादुर्भावाच्या सुरवातीला पानांवर लालसर ठिपके दिसु लागतात. जसा जसा रोग वाढतो तसे तसे ठिपके मोठे होत जातात आणि पांढर्‍या रंगावरुन हलक्या तपकिरी किंवा भुर्‍या रंगाचे होऊन सभोवताली जांभळी, गडद तपकिरी किंवा काळसर किनार तयार होते. हे ठिपके आकाराने गोल किंवा ओबड धोबड आकाराचे असुन त्याचे आकारमान हे संसर्ग होऊन किती वेळ झाला ह्यावर अवलंबुन असते. पानावर एकाच केंद्रीत जागी ठिपके दिसु लागतात, ज्यांच्या कडा गडद आणि हलक्या तपकिरी किंवा लाल रंगाच्या असतात. प्रादुर्भावित पानाचा रंग शेवटी अगदी फिकट होऊन ते गळुन पडते.

Recommendations

जैविक नियंत्रण

आजपर्यंत तरी कोणतेही जैविक नियंत्रण पद्धती माहिती नाहीत. जर आपणास ह्या रोगाचा प्रादुर्भाव किंवा गंभीरतायशस्वीपणे टाळण्यात किंवा नियंत्रित करण्याचे काही उपाय माहिती असतील तर ते कृपया आम्हाला जरुर कळवा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मँन्कोझेब किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइडचे प्रमाण २ कि.ग्रॅम प्रत हेक्टर चे मिश्रण रोगाच्या प्राथमिक दशेतच फवारा आणि १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा फवारा. बुरशीनाशके ज्यात कार्बेनडिझेम असेल त्याला ३ ग्रॅम/प्रति लिटर, कॅप्तान २ ग्रॅम/प्रति लिटर, प्रमाणात वापरल्यासही चांगले परिणाम मिळतात.

कशामुळे झाले

मायकोस्फाएरेला गॉसीपीना नावाच्या सर्कोस्पोरा जातीच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात, जी कपाशीच्या रोपांवर हल्ला करते. ही बुरशी, इतर बुरशींपेक्षा, ज्या सोयाबीन किंवा मिर्‍याच्या झाडांवर येतात त्यापेक्षा वेगळी आहे. शेतात पुष्कळदा सर्कोस्पोरा पानांवरील ठिपके आणि इतर पानांच्या रोगांना जसे टार्गेट स्पॉट, यांच्यात वेगळेपणा ओळखणे कठिण असते. पण ह्या रोगाची विशिष्टता आहे कि हा शक्यतो दुष्काळग्रस्त किंवा कुपोषित (मुख्यत्वे पलाश) झाडांमध्ये आढळुन येतो. उत्तम खत योजनेने रोपांचा जोम राखता येतो आणि पाणी नियोजनाने दुष्काळाचा ताण टाळता येतो ज्यामुळे ह्या रोगाचा प्राथमिक प्रादुर्भाव टाळण्यात मदत मिळु शकते. ह्यामुळे रोगाचा उद्रेकाची गंभीरताही कमी होते. ह्या रोगाच्या प्रसारासाठी उत्तम तापमान २० ते ३० डिग्री सेल्शियस आणि उच्च दमटपणा आहे खूप अनुकूल असते.. ह्या रोगाचे बीजाणू सुदृढ पानांवर वार्‍याने आणि पाणी फवारणीच्या थेंबांबरोबर पसरतात.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिरोधक किंवा सहनशील प्रकारची वाण वापरा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी नियमितपणे पिकांचे निरीक्षण करत चला.
  • संक्रमित झाडे आणि त्यांचे अवशेष वेळोवेळी शोधुन काढुन टाका व शेतापासुन दूर नेऊन नष्ट कर (जाळुन टाका).
  • खताचा समतोल साधा (खासकरुन पोटॅशियम वापरा) आणि नियमित पाणी द्या ज्याने रोपावरील ताण कमी होईल.
  • पीक संपल्यावर झाडांचे राहिलेले अवशेष समुळ काढुन शेतापासुन दूरवर एकतर खोलवर पुरुन किंवा जाळुन नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा