कांदा

पानांवरील बोट्रिटिस करपा

Botryotinia squamosa

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर बहुधा फिकट हिरवी प्रभावळ असलेले छोटे, पांढरे आणि लांबट डाग येतात.
  • कालांतराने डाग खोलगट आणि फिकट पिवळ्या रंगाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण लंबगोलाकार चीर मध्यावर असलेले येतात.
  • पानांच्या करपण्याने आणि मरण्याने रोपही मरते.
  • शेतात मरणार्‍या रोपांचे मोठे पिवळे भाग दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके
लसुण
कांदा

कांदा

लक्षणे

वाढीच्या कोणत्याही टप्प्यावर संक्रमण होऊ शकते आणि बहुधा जुन्या पानांवर पहिल्यांदा विकसित होते. सुरवातीची लक्षणे पात्याच्या वरच्या बाजुला छोटे (१-५ मि.मी.) गोल किंवा लंबगोलाकार पांढर्‍या डागांनी होते. एकेकटे डाग आणि नंतर डागांचे गटांभोवती फिकट हिरवी किंवा रुपेरी प्रभावळ दिसते जी सुरवातीला पाणी शोषल्यासारखी दिसते. कालांतराने, डागांची संख्या वाढते आणि जुन्या डागांचे केंद्र खोलगट, फिकट पिवळ्या रंगाचे, सुकण्याची सुरवात झाल्यासारखे दिसते. नंतरच्या टप्प्यात लांबट वैशिष्ट्यपूर्ण चीर ह्या डागात येते. पानांची टोके आणि कडा मऊ पडतात आणि हळुहळु सुकतात, ज्यामुळे करपणे आणि मर होते. अनुकूल परिस्थितीत रोग कंदालाही प्रभावित करतो, ज्यामुळे त्याचा आकार आणि प्रत कमी भरते. जसा रोग फैलावतो, मरणार्‍या रोपांचे मोठे पिवळे भाग शेतात दूरवरुन पाहिले जाऊ शकतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

ह्या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी कोणतेही जैव उपचार आतातरी उपलब्ध नाहीत. जर आपणांस माहिती असले तर आम्हाला जरुर कळवा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. संक्रमणाची जोखीम कमी करण्यासाठी शेतीच्या चांगल्या सवयी राबविण्याची गरज आहे. जर बुरशीनाशकांची गरज भासलीच तर आयप्रोडियॉन, पायरिमेथॅनिल, फ्ल्युयाझिनाम किंवा सायप्रोडिनिल बरोबर फ्ल्युडियोक्झोनिल असणार्‍या उत्पादांचा वापर फवारणीतुन केल्यास अतिशय चांगले परिणाम मिळतात. क्लोरथॅलोनिल आणि मँकोझेब वर आधारीत उत्पादही काम करतात पण कमी परिणामकारक असतात. जमिनीच्या धूमनात बुरशीनाशकांचा वापर केल्यास जमिनीवरच्या भागातील फवारणीपेक्षाही जास्त चांगले परिणाम मिळतात.

कशामुळे झाले

बोट्रिटिस स्कामोसा नावाच्या बुरशीमुळे रोग होतो, जी संक्रमित कांद्यात किंवा इतर रोपांच्या शेतात राहिलेल्या अवशेषात किंवा साठवणीच्या जागी रहाते. जेव्हा परिस्थिती अनुकूल असते तेव्हा बुरशीचे बीजाणू ह्या भागात तयार होतात आणि वार्‍याने शेजारच्या रोपांवर पसरतात जे संक्रमणाचे प्राथमिक स्त्रोत होतात. १० ते २० अंश तापमान, जास्त पाऊस, पाने फार काळ ओली रहाणे किंवा जास्त सापेक्ष आर्द्रता बुरशीच्या जीवनचक्रास मानवते. ह्याच्या लक्षणांची गल्लत इतर रोगांशी किंवा दुष्काळाचा ताण, गारपीटीने जखमा, फुलकिडे संक्रमण किंवा वनस्पतीनाशकांनी नुकसान यासारख्या विकारांशी केली जाऊ शकते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोताकडुन निरोगी बियाणे किंवा रोपणीची सामग्री घ्या.
  • लवकर पक्व होणारे वाण लावा.
  • पेरणी करताना हवा चांगली खेळती रहाण्यासाठी शिफारशीत अंतर रोपात ठेवा.
  • कांदे उत्पादनाच्या जागेजवळ बियाणे उत्पादनाची लागवड करु नका.
  • जमिनीतुन पाण्याचा निचरा चांगला होऊ द्या आणि जास्त पाणी देऊ नका.
  • जेव्हा शेंडे सुकु लागतात तेव्हा खते देऊ नका.
  • रोगाच्या लक्षणांसाठी रोपांचे किंवा शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • शेतातुन आणि आजुबाजुने तण आणि स्वयंभू रोपे काढा.
  • संक्रमित रोपे किंवा भाग काढुन जाळुन नष्ट करा.
  • काढणीनंतर खुंटे आणि कांद्यांचे कापलेले शेंडे गोळा करुन जाळुन नष्ट करा.
  • इतर रोगांच्या संक्रमणाची जोखीम वाढु नये म्हणुन २ वर्षांच्या पीक फेरपालटाची शिफारस करण्यात येते.
  • संक्रमित भागातुन इतर शेतात किंवा बागेत कांदे नेऊ नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा