ज्वारी

ज्वारीवरील अरगोट

Claviceps africana

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • अंडाशय पांढर्‍या रंगाने आच्छादिली जातात.
  • मधाळ पदार्थ झाडाच्या सर्व भागांवर सोडला जातो.
  • पांढरी खपली धरते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

ज्वारी

लक्षणे

ज्वारीच्या कणसातील काही भाग किंवा सर्व फुलोऱ्यांच्या जागी मऊ, पांढरी जवळपास गोलाकार बुरशीची रचना फुलांच्या बुडाशी दिसते. झाडांवर बीजाणू असणारे चिकट, पातळ किंवा घट्ट, नारंगी-तपकिरी किंवा वरवरच्या पांढर्‍या रंगाच्या पातळ द्रवपदार्थाचा स्त्राव होतो. उच्च आर्द्रतेच्या काळात मधाळ पदार्थ जास्त घट्ट नसतात आणि पृष्ठभाग पांढरा असतो. कणिस, दाणे, पान, खोड आणि जमिनीचा पृष्ठभागसुद्धा गळणारा मधाळ रस पसरण्यामुळे पांढरा दिसतो. मधाळ रस सुकुन पांढर्‍या खपल्या सगळीकडे दिसतात. मधाळ रसामुळे पुष्कळ प्रकारच्या संधीसाधु बुरशीदेखील घर करु शकतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

काही बाजारातील उत्पादात ट्रायकोडर्मा प्रजाती असलेले काही विशिष्ट जैविक बुरशीनाशके, मुख्यकरुन बुरशीचे प्रजनन होण्यापूर्वी खूप दिवस आधी वापर केल्यास, रोग कमी किंवा नियंत्रण करू शकतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. संक्रामक मधाळ रसामुळे प्रभावित झालेले बियाणे कॅप्टनने उपचारित केले जाऊ शकतात. पावसाच्या अनुपस्थितीत, ५-७ दिवसांच्या अंतराने प्रॉपिकोनॅझोल किंवा टेब्युकोनॅझोल (ट्रायाझोल बुरशीनाशके) सह ३-४ फवारण्या जमिनीवर केल्यास वाणांच्या बिजोत्पादनावर चांगले परिणाम दिसून आले आहेत. ही बुरशीनाशके तसेच अॅझोक्सिस्ट्रोबिनसुद्धा थेट बुरशीवर वापरल्यासही समाधानकारक परिणाम दिसतात.

कशामुळे झाले

क्लॅव्हिसेप्स आफ्रिकाना नावाच्या बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात. संक्रमित कणसातील फुले, प्राथमिक बीजाणूचे उच्च केंद्रीकरण असलेला मधाळ रस सोडतात. या व्यतिरिक्त वार्‍याबरोबर वहन होणारे बीजाणूही निर्माण केले जातात जे मध्यम ते लांब अंतरापर्यंत पसरु शकतात. प्राथमिक संक्रमण बियाणेजन्य पक्व बीजाणू, काढणीच्या वेळी जमिनीवर पडलेल्या संक्रमित कणीस आणि / किंवा मधाळ रसाचे अवशेष बियाणांना चिकटल्यामुळे होते. सुकलेला मधाळ रस ९-१२ महिन्यांसाठी संक्रामक राहतो. हे बीजाणू १४-३२ अंश सेल्शियस आणि अतिशय अनुकूल २० अंश सेल्शियस तापामानात उगवतात.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी झाडापासून धरलेले किंवा प्रमाणित स्रोतांकडील बियाणे वापरा.
  • बुरशी उगविण्याची वेळ टाळण्यासाठी जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर पेरणी करा.
  • बुरशीला कमी संवेदनशील उदा.
  • बुटक्या जाती, फुलधारणेपूर्वी तापमानास सहनशील, घट्ट कणीस आणि कमी फुलधारणेचा कालावधी असलेले वाण लावा.
  • शेताचे निरीक्षण करुन संक्रमित कणीस लगेच निर्जंतुक केलेल्या अवजाराने काढुन टाका.
  • शेतात झाडांच्या अवशेषांना नांगरणी करून खोल पुरल्यास आणि ३ वर्षांसाठी पीक फेरपालट केल्यास संक्रमण कमी होते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा