भात

मूर्ख रोग (खोडाची उंची वाढणे व बुंधा कुज)

Gibberella fujikuroi

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • ह्या रोपांची पाने पिवळसर हिरवी असतात आणि ओंबीचे पान फिकट हिरवे असते.
  • खोड असामान्य रीतीने उंच वाढतात.
  • कमी नांगरणे आणि कुजलेल्या खोडाच्या सांध्याला मुळे येतात.

मध्ये देखील मिळू शकते


भात

लक्षणे

बकाने मुख्यतः कोवळ्या रोपांवरील रोग आहे पण झाडाच्या वाढीच्या सर्व टप्प्यांवर पाहिला जाऊ शकतो. ही बुरशी मुळांतुन किंवा बुंध्यातून आत प्रवेश करते आणि मग पद्धतशीरपणे खोडातुन झाडाच्या सर्व भागात पसरते. रोपे जर संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात तग धरु शकली तर ती असामान्यरीत्या उंच (पुष्कळ वेऴा खूप इंचांनी) वाढतात आणि त्यांची पाने फिकट, पातळ आणि कोरडी असतात ज्यांना खूप कमी कांडे येतात. खोडाची आतली बाजु कुजते आणि वरच्या बाजुला असलेल्या पेऱ्यातुन नविन मुळे उगवतात. संक्रमित झाडांच्या खोडावर तपकिरी ठिपके येतात. जर झाडे वाढीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जगली तर अंशतः भरलेले, वांझ किंवा पोकळ दाणे विकसित करतात. त्या झाडांमध्ये मुख्य पान उंच होऊन आडवे वाढते.

Recommendations

जैविक नियंत्रण

या रोगाविरुद्ध कोणतेही जैव उपचारआजपर्यंत ज्ञात नाहीत. मीठाचे पाणी वापरुन हलकी (बाधीत) बियाणे निरोगी बियाणांपासुन भिजविलेल्या काळात वेगळी केली जाऊ शकतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ट्रायफ्लुमिझोल, प्रोपिकोनाझोल, प्रॉक्लोरॅझ (एकेकटे किंवा थायरमसह) असलेल्या बुरशीनाशकाच्या द्रावणात बियाणांना पाच तासापर्यंत भिजवुन ठेवल्यासही परिणाम चांगला दिसतो. या रोगाची घटना कमी करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईडची बीज प्रक्रिया देखील परिणामकारक ठरते. वर नमुद केलेल्यांची मिश्रणेही वनस्पती टप्प्यावर अठवड्यातुन दोनदा केल्यासही रोगाचे चांगले नियंत्रण होते.

कशामुळे झाले

बकाने हा बियाणातील बुरशीमुळे उद्भवणारा रोग आहे. हा रोग शक्यतो संक्रमित बियाण्यांच्या (उदा. ज्या बियाणांवर बुरशीचे बीजाणु असतात) वापराने होतो पण जमिनीत किंवा रोपावर बीजाणू असल्यास देखील होऊ शकतो. बीजाणूचे वहन वारा किंवा पाण्याबरोबर एका झाडावरुन दुसर्‍या झाडावर होते. बकानेचे वहन शेतातील कामांद्वारेही जसे कि काढणी करते वेळेस संक्रमित झाडातील बुरशीच्या बीजाणुंना निरोगी बियाणांवर पसरु देणे आणि बुरशीचे बीजाणु असलेल्या पाण्यात बियाणे भिजविल्याने देखील होते. ३०-३५ डिग्री सेल्शियसचे उच्च तापमान रोगाच्या वाढीस अनुकूल असते.


प्रतिबंधक उपाय

  • रोगाच्या घटना कमी करण्यासाठी निरोगी बियाणे वापरा.
  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाणाची निवड करा.
  • रोपांचे निरीक्षण करा आणि पालिश, अल्बिनो रोपे लावण्याचे टाळा.
  • जास्त नत्र असलेल्या खतांचा वापर टाळा.
  • पेरणीपूर्वी खोल नांगरा ज्यामुळे सुर्यकिरणातील युव्ही किरणे जमिनीवर पडतील.
  • लागवड करण्यापूर्वी आधीच्या पीकाचे अवशेष नांगरुन काढा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा