सोयाबीन

सोयाबीनच्या दाण्यावरील जांभळे डाग

Cercospora kikuchii

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • वरच्या पानांवर जांभळट ते तपकिरी ठिगळांची रंगहीनता दिसते.
  • लाल तपकिरी ठिपके खोडावर किंवा शेंगावरही येऊ शकतात.
  • विविध आकाराची (छोट्या ठिपक्यापासुन ते मोठ्या धब्ब्यांपर्यंत) गुलाबी ते जांभळी रंगहीनता दाण्यांवर दिसुन येते.
  • संक्रमित बियाणे वापरल्यास उगवण क्षमता आणि रोपाचा जोम प्रभावित होतो.

मध्ये देखील मिळू शकते


सोयाबीन

लक्षणे

वाढीच्या उशीराच्या टप्प्यावर, फुल आणि शेंगधारणेच्या काळात लक्षणे दिसतात. रोगाचे वैशिष्ट्य आहे वरील पानांची जांभळट ते तपकिरी रंगहीनता आणि ती उन्हाने करपल्यासारखी दिसणे होय. लाल तपकिरी ठिपके खोडावर आणि शेंगावरही दिसतात. संक्रमित बियाणे दिसायला निरोगी असतात किंवा दाण्यांच्या सालीवर गुलाबी ते जांभळट रंगहीनता बारीक ठिपक्यापासुन ते मोठ्या धब्ब्यांपर्यंत विविध आकारात दिसते. यामुळे जरी पीकाच्या उत्पन्नावर परिणाम होत नसला तरी बियाण्याची उगवण क्षमता आणि रोपाचा जोम प्रभावित होतो.

Recommendations

जैविक नियंत्रण

सर्कोस्पोरा किकुचिविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जास्त रंगहीन बियाणांना कीटनाशकांची बीज प्रक्रिया करा यामुळे रोग पसरण्यास आळा बसु शकतो. शेंगधारणेच्या सुमारास कीटनाशकांची फवारणी करण्याचा विचार करा ज्यामुळे करपा आणि शेंगातील संक्रमण प्रतिबंधित केले जाऊ शकते. बुरशीनासकांचे फवारे पानांवर मारा उदा. मँकोझेब (२.५ ग्रॅ/ली.पाणी) शेंगधारणेच्या सुरवातीच्या काळात मारल्यास पानांवरील करपा आणि शेंगातील संक्रमणाचा प्रतिबंध होतो.

कशामुळे झाले

सर्कोस्पोरा पानांवरील ठिपके हे सर्कोस्पोरा कुकुचिमुळे होतात. ही बुरशी जमिनीतील रोपांच्या अवशेषात आणि बियाण्यात जगते. उच्च सापेक्ष आर्द्रता, उबदार हवामान (सुमारे २२ ते २६ डिग्री सेल्शियस), वारा आणि पावसाचे उडणारे पाणी ही बुरशी पानांवर पसरण्यास आणि वाढण्यात अनुकूल असतात. सुरवातीचे संक्रमण बहुधा जमिनीला समांतर असते आणि फुलोर्‍यापर्यंत किंवा शेंगा धरण्याच्या टप्प्यापर्यंत दृष्य नसते. बुरशी हळुहळु शेंगात शिरते आणि दाण्यात वाढते ज्यामुळे त्यावर वैशिष्ट्यपूर्ण जांभळट किंवा तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात.


प्रतिबंधक उपाय

  • बुरशीविरहित प्रमाणित बियाणे वापरा.
  • सहनशील वाणही उपलब्ध आहेत.
  • यजमान नसणार्‍या पीकाबरोबर फेरपालट केल्यास संक्रमण सिमीत राहू शकते.
  • नांगरणे, उन देणे आणि वार्‍यामुळे या बुरशीचे रोपाच्या अवशेषात जगणे कमी होते.
  • पीक घेतल्यानंतर रोपाचे अवशेष काढुन नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा