सोयाबीन

सोयाबीनवरील पर्ण गुच्छ करपा

Rhizoctonia solani

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पाने पिवळी पडतात.
  • तपकिरी बेढब डाग येतात.
  • झाडांना वेढतात आणि शेंड्यांची पूर्ण मर होते.
  • पानगळ होते.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके
सोयाबीन
तंबाखू

सोयाबीन

लक्षणे

सुरवातीला गोलाकार किंवा अनियमित आकाराचे लालसर तपकिरी कडांसकट हिरवे पाणी शोषल्यासारखे ठिपके जुन्या पानांवर, काही वेळा वेगळ्या पानांवर येतात. रोगाच्या नंतरच्या टप्प्यावर, डाग तपकिरीसर किंवा गव्हाळ रंगाचे होतात आणि डाग देठ, फांद्या आणि कोवळ्या शेंगांवरही उमटतात. फुगलेले तपकिरी भाग देठ आणि फांद्यांवर वाढतात. कापसासारख्या बुरशीच्या वाढीने पानांचे गुच्छ एकत्रित बांधले जाणेही सामान्य आहे. गंभीर संक्रमणामुळे पान आणि शेंगा करपल्यासारखे दिसतात आणि पानगळ देखील होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

जैविक घटक, वनस्पतींचे अर्क आणि अत्यावश्यक तेल संसर्गावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. परजीवी बुरशी ट्रायकोडर्मा हर्झियानम र्हिाझोक्टोनिया बुरशीबरोबर स्पर्धा करते. कांदा, लसुण आणि हळदीचे अर्क बुरशीची कार्यक्षमता कमी करुन वाढ कमी करतात. मेंथा, सिट्रोनेला, पेपरमिंट, पाल्मारोजा आणि जेरॅनियमचे तेले देखील संक्रमणास नियंत्रित ठेवतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर बुरशीनाशकांची गरज भासली तर फल्युक्सापायोक्सॅड बरोबर पायराक्लोस्ट्रोबिन असणार्‍या उत्पादांची फवारणी करा. हंगामात फक्त दोनदाच बुरशीनाशकांची फवारणी करा. जर पीक काढण्यास २१ दिवसांपेक्षा कमी काळ असला तर उपचार सुरु करु नका.

कशामुळे झाले

र्‍हिझोक्टोनिया सोलानी नावाची बुरशी जमिनीत किंवा रोपांच्या अवशेषांत जगते. ती तणांसारख्या पर्यायी यजमानांवर सुप्तावस्थेत रहाते. उबदार तपामान (२५ ते ३२ डिग्री सेल्शियस) आणि उच्च सापेक्ष आर्द्रता जास्त काळ असल्यास रोपांवर वारा आणि पावसामुळे बुरशीचा प्रसार खूप जास्त होतो. ती पानांना एकत्र विणते आणि पानांची "जाळीदार" गादी तयार करते, त्यामुळे रोपाला वैशिष्ट्यपूर्ण पैलु मिळतो.


प्रतिबंधक उपाय

  • सहनशील वाण लावा.
  • बुरशीचा प्रसार होणार नाही याची खात्री करुन गादीवाफे आणि शेत काळजीपूर्वक तयार करा.
  • हवा चांगली खेळती रहाण्यासाठी लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • यजमान नसणार्‍या पीकांबरोबर (मका आणि ज्वारी) किमान २ वर्षांसाठी तरी पीक फेरपालट करण्याची शिफारस करण्यात येते.
  • तणांची अवास्तव वाढ (तण पर्यायी यजमान म्हणुन कामी येतात) होऊ देऊ नका.
  • कोणत्याही उर्वरित बुरशीच्या निवारणासाठी खोल नांगरणी करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा