मका

फ्युसॅरियम कणीस कूज

Fusarium verticillioides

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • हा रोग विशेषकरुन मोसमात उशीरा आणि साठवणीच्या काळात विकसित होतो.
  • काही दाण्यांवर पांढरी, गुलाबट रंगाची बुरशी दिसते.
  • दाण्यांवर गव्हाळ किंवा तपकिरी छटा वरच्या टोकापासुन गोलाकार संरचनेत पसरताना दिसते.
  • पूर्ण कणीस वाळते आणि बुरशीमुळे दाणे पूर्णपणे नष्ट होतात.
  • बुरशी विष सोडत असल्याने कणीस खाण्यायोग्य रहात नाही.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

मका

लक्षणे

मक्याचे वाण, हवामान आणि रोगाची गंभीरता याप्रमाणे लक्षणे थोडी फार बदलू शकतात. रोग विशेषकरुन मोसमात उशीरा आणि साठवणीच्या काळात विकसित होतो. संक्रमित दाण्यांवर पांढरी, गुलाबीसर बुरशी निरोगी दाण्याच्या आजुबाजुला अधुनमधुन पसरलेली दिसते. दाण्यात रंगहीनताही दिसते. ते गव्हाळ किंवा तपकिरी रंगाचेही होऊ शकतात. ही रंगहीनता वरच्या टोकाच्या मध्यापासुन सुरु होऊन गोलाकारात पसरते. जर रोगाच्या विकासाला तापमान (उबदार आणि कोरडी हवा, कीटकांची उपस्थिती) अनुकूल असेल तर बुरशी पूर्ण कणसात घर करते आणि बुरशीची भरपूर वाढ दिसुन येते. पूर्ण कणीस वाळते आणि दाणे कदाचित पूर्णपणे नाहीसे होतात. पिकाच्या उत्पादनात मोठी घट होते. बुरशी विष सोडत असल्याने कणीस खाण्यायोग्य रहात नाही.

Recommendations

जैविक नियंत्रण

स्युडोमोनास फ्लुरोसेन्स नावाच्या जिवाणूवर आधारीत द्रावणांची बीज प्रक्रिया केल्यास किंवा फवारणीद्वारे वापरल्यास रोगाच्या घटना कमी होतात आणि विष उत्पादनही कमी होते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मोसमात लवकर बुरशीनाशकाचा वापर केल्यास कणसावरील संक्रमण सिमीत करता येते. नुकसान कणसात होत असल्याने बुरशीनाशकांचा परिणाम रोगाचा प्रतिकार करण्यासाठी जास्त होत नाही. ज्या किड्यांमुळे कणसाला इजा होते आणि त्यातुन बुरशी आत शिरते, त्यांचे नियंत्रण करण्याचा विचार करा. प्रोपिकोनाझोल असणारे उत्पाद १ मि.ली./ली. चा वापर दाणे कडक होण्याच्या सुमारास बु्रशीचे नियंत्रण करण्यासाठी वापरावे.

कशामुळे झाले

फ्युसॅरियम व्हर्टिसिलिऑइडस नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो पण फ्युसॅरियमच्या इतर जातीही अशीच लक्षणे दर्शवितात. ही बियाणे, झाडांचे अवशेष किंवा गवतवर्गीय पिके सारख्या पर्यायी यजमानात जगते. बीजाणूचे वहन मुख्यत्वेकरुन गारपीटीने किंवा किडे आणि पक्षांनी खाण्यासाठी केलेल्या जखमांतुन किंवा शेतात काम करताना कणसाला झालेल्या जखमेतुन ही बुरशी आत शिरते. तिथेच ती उगवते आणि आत शिरण्याच्या जागेपासुन दाण्यात घर करते. किंवा, ती झाडाच्या मुळाजवळ वसाहत करते व पद्धतशीरपणे वर चढत जाते. झाडांवरील संक्रमण विविध प्रकारच्या हवामान परिस्थितीत होऊ शकते पण लक्षणे मात्र उबदार आणि कोरड्या हवामानात आणि जेव्हा झाडे फुलधारणेच्या काळात असतात तेव्हा जास्त गंभीर होतात. मक्यावरील ही सर्वसामान्य बुरशी आहे.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या बाजारात उपलब्ध असल्यास सहनशील किंवा प्रतिकारक वाण लावा.
  • क्षेत्रिय हवामान परिस्थितीशी जुळवुन घेतलेली रोपे लावा.
  • दाट लागवड टाळा.
  • रोपाच्या वाढीच्या नंतरच्या टप्प्यात चांगले खत देण्याची खात्री करा.
  • संक्रमित दाणे साफ करुन किंवा वेगळे साठवा ज्याने विष उत्पादन होणार नाही.
  • साठवणीची जागा चांगली स्वच्छ करुन घ्या.
  • झोडपण्याच्या जागी ओल राहू नये म्हणुन काढणीपूर्वी हवामान वृत्त तपासा.
  • काढणी करताना कणसाला इजा होणार नाही याची काळजी घ्या.
  • दाण्यांची साठवण कमी आर्द्रता आणि कमी तापमानात करा.
  • पीक घेतल्यानंतर झाडांचे अवशेष नांगरुन गाडुन टाका.
  • यजमान नसणार्‍या पीकांबरोबर किमान एक वर्षासाठी तरी पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा