भात

मलमली काणी

Villosiclava virens

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • काही दाण्यांवर छोट्या नारिंगी, गुळगुळीत गाठी दिसतात.
  • नंतर ह्या गाठी वाळतात आणि हिरवट काळ्या पडतात.
  • दाणे रंगहीन, हलके होतात व उगवण क्षमता देखील कमी होते.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके

भात

लक्षणे

ओंबी धारणेच्या सुमारास लक्षणे खास करुन जेव्हा पुष्पकोष पक्व होत तेव्हा दृष्य होतात. सुमारे १ सें.मी. व्यासाचे नारिंगी, मखमली, अंड्याच्या आकाराच्या गाठी कणसातील प्रत्येक दाण्यावर दिसतात. कालांतराने हा गोळा फुटतो आणि दाणे पिवळसर हिरवे किंवा हिरवट काळे होतात. कणसातील फक्त काही दाण्यांवरच बीजाणूंच्या गाठी तयार होतात. रोपाच्या इतर भागांवर याचा परिणाम होत नाही. धान्याचे वजन आणि उगवण क्षमता घटते.

Recommendations

जैविक नियंत्रण

बियाणांना ५२ डिग्री सेल्शियस तापमानाचे उपचार १० मिनीटे केले असताही संक्रमणाच्या घटना कमी होतात. कॉपरवर आधारीत बुरशीनाशकांचे (२.५ ग्रॅ/ली. पाणी) प्रतिबंधक फवारणी ओंबी धारणेच्या सुमारास करावी. एकदा रोगाचे निदान झाले कि मग कॉपरवर आधारीत बुरशीनाशकांची फवारणी करून रोगाचे नियंत्रण करता येते आणि उत्पादन देखील थोडे वाढते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बुरशीनाशकांच्या बीज प्रक्रियेने या रोगाला बहुधा आळा घातला जात नाही. कणिस लागायच्या सुमारास (५०-१००%) प्रतिबंधक उपाय म्हणुन खालील उत्पाद प्रभावी असतात: एझॉक्सीस्ट्रोबिन, प्रोपिकोनाझोल, क्लोरोंथॅलोनिल, एझॉक्सीस्ट्रोबिन + प्रोपिकोनाझोल, ट्रायफ्लोक्झिस्ट्रोबिन + प्रोपिकोनाझोल, ट्रायफ्लोक्झिस्ट्रोबिन + टेब्युकोनाझोलची प्रतिबंधक फवारणी फुलधारणे आधी पीकावर केल्यास रोगाचे नियंत्रण परिणामकारकरीत्या (५०% ते १००%) होते. एकदा रोग लक्षात आल्यानंतर त्याचा प्रसार प्रभावीपणे रोखण्यात मदत करणारे इतर उत्पाद ऑरियोफ्युगिन, कॅप्टन किंवा मँकोझेब आहेत.

कशामुळे झाले

व्हिलोसिक्लावा विरेन्स नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात, जी रोपांच्या सर्व टप्प्यांवर संक्रमित करु शकते पण लक्षणे मात्र फुलधारणेनंतर थोड्याच काळात किंवा दाणे भरायच्या वेळेसच दिसतात. हवामान परिस्थिती संक्रमणाचे परिणाम ठरविते, जास्त सापेक्ष आर्द्रता (९०%वर), वारंवार पाऊस आणि २५-३० अंशाचे तापमान बुरशीस अनुकूल असते. जास्त नत्र असलेल्या जमिनीही या रोगाच्या विकासाला अनुकूल असतात. लवकर लागवड केलेल्या भातावर काणीची समस्या कमी दिसते. अगदी खराब परिस्थिती म्हणजे रोग गंभीर होऊ शकतो आणि पिकाचे २५% नुकसान होऊ शकते. भारतात ७५% पर्यंत नुकसान पाहिले गेले आहे.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित दुकानदाराकडुनच निरोगी बियाणे घ्या.
  • उपलब्ध प्रतिकारक वाण लावा.
  • रोगाचा उद्रेक टाळण्यासाठी शक्य असल्यास लवकर पेरणी करा.
  • शेत कायम पाण्याने भरण्यापेक्षा आलटुन पालटुन पाण्याने भरणे आणि कोरडे ठेवणे (आर्द्रता कमी होते) असे नियोजन करा.
  • नत्रचा उपयोग संयमित करा आणि विभाजित करा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • शेताचे बांध आणि सिंचनाचे पाट स्वच्छ ठेवा.
  • शेतातुन तण काढा आणि पीक घेतल्यानंतर संक्रमित अवशेषही काढुन टाका.
  • काढणीनंतर खोल नांगरणी करून जमीन तापू द्या म्हणजे रोग पुढच्या हंगामापर्यंत नेला जाणार नाही.
  • शक्य होईल तेव्हा संवर्धन मशागत आणि सतत भातशेती करा.
  • संवेदनशील नसलेल्या पिकांसह २-३ वर्षांसाठी पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा