मका

फाईओस्फेरीया पानावरील ठिपके

Phaeosphaeria maydis

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • बारीक, फिकट हिरवे ते पिवळे ठिपके पानाच्या पूर्ण पात्यावर विखुरतात.
  • कालांतराने हे ठिपके पांढुरके सुकलेले केंद्र व अनियमित कडा असलेले गोलाकार किंवा लंबगोलाकार डागात रुपांतरीत होतात.
  • गंभीर प्रकरणांमध्ये, ते एकमेकात मिसळतात आणि संपूर्ण पान करपल्यासारखे दिसते.
  • फाईओस्फेरीया पानावरील ठिपके हा कमी महत्वाचा साधारणपणे उशीरा येणारा रोग मानला जातो.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

मका

लक्षणे

प्राथमिक लक्षणांमध्ये बारीक, फिकट हिरवे ते पिवळे ठिपके पानाच्या पूर्ण पात्यावर उमटतात. कालांतराने हे ठिपके मोठे होऊन पांढुरके सुकलेले केंद्र व अनियमित कडा असलेले गोलाकार किंवा लंबगोलाकार (३-२० मि.मी) डागात रुपांतरीत होतात. गंभीर प्रकरणांमध्ये, ते एकमेकात मिसळतात आणि संपूर्ण पान करपल्यासारखे दिसते. पानाच्या खालच्या बाजुला या डागात बारीक काळे ठिपके दिसतात. जर रोपांच्या वाढीच्या प्रारंभादरम्यान संक्रमण झाल्यास आणि फुलधारणेआधी वरील पाने करपल्यास उत्पादनात मोठी घट निर्माण होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

फाईओस्फेरीया पानावरील ठिपके या रोगाविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मँकोझेब, पायराक्लोस्ट्रोबिन सारख्या बुरशीनाशकाची फवारणी करून रोगाचे नियंत्रण करता येते.

कशामुळे झाले

फाईओस्फेरीया मेडिस नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो जी झाडाच्या अवशेषात सुप्तावस्थेत रहाते. अनुकूल परिस्थितीत हिचे बीजाणू निरोगी झाडांवर वारा आणि पावसाच्या उडणार्‍या पाण्याच्या थेंबानी पसरतात. नविन पानांवर हे बीजाणू उगतात आणि दुय्यम टप्प्याचे संक्रमण सुरु करतात. जास्त पाऊस आणि उच्च सापेक्ष आर्द्रता (>७०%) या बरोबर थोडे कमी रात्रीचे तापमान (सुमारे १५ डिग्री सेल्शियस), रोगाच्या वाढीस अनुकूल असतात. हे हवामान जास्तकरुन समुद्रसपाटीपासुन उंचावर असते. हा रोग झाडाची उत्पादकता फक्त काही विशिष्ट प्रकरणांमध्येच प्रभावित करतो. ह्याला सामान्यपणे कमी महत्वाचा साधारणपणे उशिरा येणारा रोग मानला जातो.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • रोगाला अनुकूल असणारी हवामान परिस्थिती टाळण्यासाठी लवकर किंवा उशीरा पेरणी करा.
  • पीक घेतल्यानंतर खोल नांगरुन झाडांचे अवशेष गाडुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा