पपई

पपयीवरील काळे ठिपके

Asperisporium caricae

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • खालच्या पानांवर तपकिरी डाग येतात.
  • डाग मोठे होतात आणि काळे, उंचावलेले पावडरीसारखे फोड होतात.
  • फळांवर काळे केंद्र असलेले उथळ, फिकट तपकिरी, व्रण असतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

पपई

लक्षणे

पानांच्या खालच्या बाजुला हे डाग नंतर मोठे होऊन काळे, उंचावलेले, पावडरीसारखे फोड होतात ज्यांचा व्यास ४ मि.मी. पर्यंत असु शकतो. ह्या रोगाच्या नंतरच्या टप्प्यावर हे व्रण वाळतात आणि पानाचा बराचसा भाग व्यापतात. जास्त बाधा झाली असता किंवा इतर बुरशींच्या जंतुचाही संसर्ग झाला असता, बाधीत पाने गळतात ज्यामुळे रोपाचा जोम नाहीसा होतो. जरी हे पानांवर कमी प्रमाणात दिसले तरी फळांतही उथळ फिकट तपकिरी, अनियमित व्रण ज्याच्या केंद्रात बुरशीचे काळे ठिपके असतात ते स्पष्ट दिसतात. फळे जर वाढीच्या लवकरच्या टप्प्यावर बाधीत झाली तर अकाली गळु शकतात. व्रण असुनही फळांच्या गरावर सडण्याचे कोणतेही लक्षण दिसत नाही.

Recommendations

जैविक नियंत्रण

अॅस्पेरिस्पोरियम कॅरिकेविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार अजुनपर्यंत तरी मिळाले नाहीत. जर आपल्याकडे ह्या रोगावरील काही खात्रीलायक उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जास्त लागण झाल्यास डिथिओकार्बामेटस बुरशीनाशकांचे पानांवरील फवारे परिणामकारक ठरतात.

कशामुळे झाले

अॅस्पेरिस्पोरियम कॅरीके नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात. ही बुरशी मुख्यत्वेकरुन मध्य अमेरिका आणी दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व भागात तसेच पूर्व आफ्रिकेत सापडते. पाने आणि फळे दोन्हीला लागण होऊ शकते आणि पिकाच्या प्रकाराप्रमाणे आणि हवामानाप्रमाणे लक्षणे थोडी वेगळी असु शकतात. ह्या रोगाची तीव्रता खालील पानांवर आणि ओल्या आद्र हवेच्या काळात जास्त दिसते. ह्या जंतुंचे माहितीत असलेले पपया हे एकच यजमान रोप आहे आणि बहुधा ह्याचा प्रभाव फारच कमी असतो कारण फळांवरील लक्षणे वरवरचीच असतात. तरीपण ह्या रोगामुळे फळाच्या प्रतिवर परिणाम होऊ शकतो.


प्रतिबंधक उपाय

  • झाडाचे बाधीत भाग किंवा गळलेली फळे काढुन नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा