ढोबळी मिरची आणि मिरची

मिरचीवरील करपा

Phytophthora capsici

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • कोवळी रोपे कोलमडतात.
  • फांद्यांवर काळे किंवा तपकिरी ठिपके येतात.
  • सर्व संक्रमित भाग प्रभावित होतात.
  • मूळे गडद तपकिरी आणि मऊ पडतात.
  • पानांवर आणि फळांवर गडद हिरवे पाणी शोषल्यासारखे ठिपके दिसतात.
  • झाडाची वाढ खुंटून मर होते.

मध्ये देखील मिळू शकते


ढोबळी मिरची आणि मिरची

लक्षणे

कोरड्या भागात संक्रमण बहुतेकदा झाडांच्या बुडावर आणि मुळांवर दिसते. झाडाच्या जमिनीलगत खोडाच्या भागात विशिष्ट असे काळे किंवा तपकिरी ठिपके येतात. उच्च आर्द्रतेच्या वातावरणात झाडाचे सर्व भाग प्रभावित होतात. संक्रमित मुळे गडद तपकिरी आणि मऊ पडतात आणि झाडा कोलमडतात. पानांवर आणि फळांवर गडद हिरवे पाणी शोषल्यासारखे डाग येतात. जुन्या झाडांवर बुंधाकुजीची लक्षणे दिसतात. गडद तपकिरी डाग खोडांना वेढतात परिणामी झाडांची मर होते. फळ शेतात काढणीनंतर किंवा साठवणीत कुजतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

बुरखोलडेरिया सेपॅशिया (एमपीसी-७) जिवाणूची केलेली चाचणी फायटोप्थोरा कॅप्सिसिचा भक्षक म्हणुन सकारात्मक आली आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. फवारणीद्वारे मेफेनॉक्झम असणार्‍या उत्पादांचा वापर लागवडीच्या वेळी आणि त्याला पूरक म्हणुन फिक्स्ड कॉपर बुरशीनाशकाचा वापर दोन अठवड्यानंतर केल्यास, संक्रमणाची सुरुवात प्रतिबंधीत करता येते. जेव्हा बुंधाकुजची लक्षणे दिसतात तेव्हा फळांना नुकसानापासुन वाचविण्यासाठी मेफेनॉक्झमचा वापर ठिबक सिंचानाद्वारेही केला जाऊ शकतो

कशामुळे झाले

फायटोप्थोरा कॅप्सिसि ही जमिनीतून उद्भवणारी बुरशी असून ती टोकाच्या वातावरणातही तग धरते. ही झाडाच्या अवशेषात, पर्यायी यजमानात किंवा जमिनीतसुद्धा तीन वर्षांपर्यंत जिवंत राहू शकते व त्यांचा प्रसार सिंचनाने किंवा जमिनीवरील पाण्याने होतो. पी. कॅप्सिसिची वाढ ७ आणि ३७ डिग्री सेल्शियसच्या दरम्यान होते पण ३० डिग्री सेल्शियस तापमान सर्वात जास्त अनुकूल असते. वाढलेल्या तापमानात आणि उच्च आर्द्रतेच्या आदर्श परिस्थितीत हा रोग फारच झपाट्याने वाढु शकतो. थंड हवामानात या रोगाचा प्रसार मंदावतो.


प्रतिबंधक उपाय

  • शक्य झाल्यास जमिनीचा सामू तपासा आणि चुनकळीसह समायोजित करा.
  • शेताची तयारी करताना जमिनीला शेणखत द्या.
  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास सहनशील किंवा प्रतिकारक वाणांची निवड करा.
  • माती भुसभुशीत रहाण्यासाठी जास्त पाणी देणे टाळा.
  • जास्तीचे पाणी वाहुन जाऊ देण्यासाठी घुमटाच्या आकाराचे वाफे तयार करा.
  • रोपे लावल्यानंतर रोपाच्या बुडाशी खोलगट भाग रहाणार नाही याची काळजी घ्या.
  • जमिनीची आर्द्रता स्थिर राखण्यासाठी प्लास्टिक अच्छादन वापरा.
  • शेतात आणि आजुबाजुने तण आणि पर्यायी यजमान काढुन टाका.
  • विभाजित नत्रासह संतुलित खते द्या.
  • रोपे दिवसभरात कोरडी होण्यासाठी सकाळी आणि नियमित पाणी द्या.
  • शेतात पाणी स्वच्छ द्या आणि कपडे, अवजारे वगैरीची खास करुन स्वच्छता ठेवा.
  • यजमान नसलेल्या पिकांसोबत २-३ तीन वर्षांसाठी पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा