इतर

डिंक्या रोग

Botryosphaeria dothidea

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • झाडाच्या कोवळ्या सालीवर मध्यवर्ती मांसाच्या सभोवताली उंचावलेले फोड येतात.
  • फोड करपट जखमांमध्ये विकसित होतात आणि त्यातुन पिवळसर तपकिरी चिकट स्त्राव गळतो.
  • या जखमांवर कँकर्स तयार होतात जे खोडाच्या जुन्या सालीत एकमेकात मिसळतात.

मध्ये देखील मिळू शकते

7 पिके
बदाम
सफरचंद
जर्दाळू
आंबा
अधिक

इतर

लक्षणे

झाडांच्या सालीतुन मोठ्या प्रमाणात होणार्‍या चिकट स्त्रावगळीमुळे रोगाचे हे नाव पडले आहे. १-६ मि.मी. व्यासाचे उंचावलेले फोड काटक्यांच्या, फांद्यांच्या किंवा खोडांच्या सालींवर येणे ही पहिली लक्षणे आहेत. या फोडांमध्ये सामान्यत: रोगाच्या मूळ प्रवेश बिंदूशी (लेंटेल) संबंधित त्यांच्या मध्यभागी चिन्ह असते. हंगामाच्या सुरवातीला देखील संक्रमण होते पण लक्षणे मात्र पुढच्या वर्षी आढळतात. जसे झाड वाढते तसे मध्यवर्ती मांसाळ भाग सामान्यतः फारच कमी दिसतो किंवा अनुपस्थित असतो, परंतु त्याचे सभोवतालचे क्षेत्र करपट आणि रंगहीन होते. ह्या डागातुन भरपूर प्रमाणात पिवळसर तपकिरी चिकट स्त्राव प्रामुख्याने जोराच्या पावसानंतर गळत रहातो. हा चिकट स्त्राव नंतर सुकुन गडद तपकिरी किंवा काळा पडतो. जर हे कँकर्स २ सें.मी. पेक्षा मोठे झाले तर एकमेकात मिसळायला सुरवात होते. गंभीर संक्रमणात वाळलेले भाग आतील भागांपर्यंत पोचुन पूर्ण फांदीलाच वेढतात आणि अखेरीस फांदी वाळते. फुल, पान आणि फळे बहुधा संक्रमित होत नाहीत.

Recommendations

जैविक नियंत्रण

या रोगासाठी कोणतेही जैविक उपचार नाहीत. सौम्य ब्लीच (१०%) किंवा अल्कॉहोलने चोळण्याने छाटणी उपकरणे पुरेशी निर्जंतुक होतात आणि त्यामुळे बुरशीचा प्रसार बागेत होण्यापासुन टाळता येतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बाहेरची कँकर्स लक्षणे कमी करण्यासाठी बुरशीनाशकांचा उपयोग केला जाऊ शकतो पण ह्यामुळे जंतुंचे दीर्घ कालावधीसाठी नियंत्रण करता येत नाही. क्रेसोक्सिम मिथाइल आणि ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन संयुगांवर आधारीत बुरशीनाशके जर शिफारशीत प्रमाणे फवारणी केली तर रोगाच्या घटना सातत्याने कमी होतात आणि कँकर्सची मापही कमी होतात. क्रेसोक्सिम मिथाइल जर एयर ब्लास्ट स्प्रेयरसह वापरले तर ते उपचारही प्रभावी ठरतात.

कशामुळे झाले

जरी याच कुटुंबातील इतर बुरशी देखील यात सहभागी होत असल्या तरी बोट्रीस्फेरिया डोथिडे नावाच्या बुरशीमुळे मुख्यत: लक्षणे उद्भवतात. हे जंतु संक्रमण काळामधल्या वेळी रोगट साल आणि मृत फांद्यांमध्ये जगतात. वसंत ऋतुत यांचे बीजाणू निर्माण होतात आणि एक वर्षापर्यंत होत रहातात. हे बीजाणू पावसाच्या सपकार्‍याने आणि थेंबांनी किंवा सिंचनाच्या पाण्याद्वारे पसरतात. ते बहुधा झाडाच्या अस्तित्वात असलेल्या जखमेतुन किंवा सालीवरील नैसर्गिक छिद्रातुन आत शिरतात. जास्त काळासाठी ओली आणि आर्द्र परिस्थिती राहिल्यास संक्रमणास अनुकूल असते. भौतिक किंवा रसायनिक जखमा किंवा अन्य जंतुंविरहित कारणे (उदा. पाण्याचा ताण) यामुळेही डिंक्या रोग होऊ शकतो. चांगली देखभाल न केलेल्या बागा खासकरुन रोगामुळे नुकसानीस प्रणव असतात. आतापर्यंत तरी कोणत्याही प्रजातीच्या झाडात डिंक्या रोग बुरशीस पुरेशी प्रतिकारक पातळी दिसुन आली नाही.


प्रतिबंधक उपाय

  • झाडाची, या रोगासाठी नैसर्गिक प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी संतुलित खते द्या.
  • खोड ओल होणार नाही अशी सिंचन पद्धत वापरा.
  • संक्रमित झाडांवर वापरल्यानंतर किंवा नेहमीच्या वापरानंतर छाटणीचे साहित्या निर्जंतुक करा.
  • पावसानंतर किंवा सिंचनानंतर झाडी ओली असताना लगेच छाटणी करणे टाळा.
  • झाडीतुन हवा खेळती राहील अशा प्रकारची छाटणी करा.
  • बागेतुन आणि आजुबाजुने तण काढा.
  • हिवाळ्यातील छाटणीत अनुत्पादक आणि मृत लाकडी अवशेष काढा.
  • फांद्या काढुन बागेपासुन दूर नेऊन गाडा किंवा जाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा