ऑलिव्ह

ऑलिव्हच्या पानांवरील ठिपके

Venturia oleagina

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • गडद, काळे ठिपके पानांच्या वरच्या बाजुला येतात, जे वाढत रहातात.
  • प्रत्येक ठिपक्या भोवती पिवळी प्रभावळ असते.
  • नंतर पानगळ, काटक्यांची मर आणि फुले न उमलणे होते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
ऑलिव्ह

ऑलिव्ह

लक्षणे

वसंत ऋतुत उशीरा, काळे डाग (ज्यांना सर्वसामान्यपणे मोर ठिपके म्हणुन ओळखल जात) झाडीच्या खालील पानांच्या वरच्या बाजुला येतात. हे ठिपके फांद्यांवर आणि फळांवरही येऊ शकतात पण पानांवर सर्वसामान्यपणे दिसतात. पानांच्या खालच्या बाजुला कोणतीही दृष्य लक्षणे दिसत नाहीत. जसजसा मोसम प्रगत होतो, तसतसे हे गडद ठिपके वाढु लागतात आणि पानाचा बराचसा भाग (०.२५ ते १.२७ व्यास) व्यापतात. ह्या ठिपक्यांच्या सभोवताली पिवळी प्रभावळ हळु-हळु उमटते आणि पूर्ण पानभर पसरते. झाडांची पानगळ होते आणि गंभीर बाबतीत काटक्यांची मर होते. फुल विकसनही होत नाही ज्यामुळे पीक उत्पादनात खूप घट होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

शरद ऋतुत तोडा झाल्यानंतर आणि नंतर परत एकदा हिवाळ्यात उशीरा जर हवामान फारच ओलसर असेल तर झाडीवर बोर्डो मिश्रणासारख्या सेंद्रीय कॉपर संयुगांची फवारणी करा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. शरद ऋतुत तोडा झाल्यानंतर आणि नंतर परत एकदा हिवाळ्यात उशीरा जर हवामान फारच ओलसर असेल तर झाडीवर कॉपर संयुगांची (उदा. कॉपर हायड्रॉक्साइड, कॉपर ऑक्झिक्लोराइड, ट्रायबेसिक कॉपर सल्फेट आणि कॉपर ऑक्साइड) फवारणी करा.

कशामुळे झाले

फ्युसिक्लॅडियम ओलियाजिनम नावाच्या बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात जी, खालील सावलीच्या भागात किंवा फारच थोडा सूर्यप्रकाश मिळणार्‍या वातावरणात किंवा दाटीने झाडी असलेल्या भागात फोफावते. हिला ऊगवणीसाठी सौम्य ते कमी तापमान आणि पानांवरील मोकळी आर्द्रता लागते म्हणुन ती शरद ऋतुतील, हिवाळ्यातील किंवा वसंत ऋतुतील पावसाच्या वेळी संक्रमण करते. धुक, दव आणि उच्च आर्द्रता हे रोगाच्या प्रसारात योगदान देणारे महत्वाचे घटक आहेत. ह्याविरुद्ध उन्हाळ्यातील ऊष्ण आणि कोरड्या हवामानात बुरशी निष्क्रिय होते आणि अखेरीस सूप्तावस्थेत जाते. ह्याचे संकेत ठिपक्यांच्या बदलणार्‍या रंगातुन मिळतात. ठिपके पांढरे पडुन खपली धरते. जुन्या पानांपेक्षा कोवळी पाने संक्रमणास जास्त संवेदनशील असतात. १४-२४ अंश तापमान जरी प्राधान्यकृत असले तरी ही २-२७ अंश तापमानातही चांगलाच तग धरते. जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता किंवा असंतुलनही झाडाच्या संवेदनशीलतेत भर घालते. उदा. नत्राचा अतिरेक आणि कॅल्शियमची कमतरता हे झाडाची संरक्षण क्षमता कमकुवत करते.


प्रतिबंधक उपाय

  • रोगाच्या लक्षणांसाठी बागेचे नियमित निरीक्षण करत चला.
  • नत्रयुक्त खते जास्त देऊ नका आणि कॅल्शियम कमी पडू देऊ नका.
  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास लवचिक किंवा प्रतिकारक वाण लावा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा