द्राक्षे

द्राक्षांवरील कवडी रोग

Elsinoe ampelina

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • छोटे तपकिरी डाग नविन पानांच्या वरच्या बाजुला दिसतात.
  • मोठे राखाडी रंगाचेआणि कोरडे धब्बे.
  • गळल्यानंतर पानांवर भोके तयार होतात.
  • खोड, नविन फांद्याही प्रभावित होतात.
  • राखाडी डागांच्याबरोबर तपकिरी कडा फळांवर दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते


द्राक्षे

लक्षणे

बुरशी वेलीच्या, पानांच्या, कोंबांच्या, फांद्यांच्या आणि नव्या कोंबांच्या हिरव्या भागांवर हल्ला करते. तरीपण, नविन झपाट्याने वाढणार्‍या भागात हिचा संसर्ग जास्त दिसतो. पानांवर छोटे तपकिरी डाग वरच्या बाजुला दिसतात. जसजसे ते मोठे होत जातात ते अनियमित होतात आणि त्यांचा केंद्रबिंदु हळुहळु राखाडी होतो आणि सुकतो. अखेरीस मेलेला भाग गऴुन पडतो ज्यामुळे बंदुकीतुन गोळी मारल्यासारखे छिद्र निर्माण होते. असेच डाग फांद्यांवर, कोंबांवरही दिसतात आणि त्यांना वेढतात ज्यामुळे कँकर तयार होतो आणि मरु लागतात. छोटे, गोल, जांभळे डाग फळांवरही येतात. ते हळुहळु वाढुन केंद्रात खोलगट आकाराचे आणि राखाडी रंगाच्या सोबत तपकिरी किनारीचे होतात. ते सालीला आच्छादत असल्याने फ़ळे सुकतात आणि गळतात किंवा गुच्छात सुकुन कडक होतात. ह्याच्या राखाडी रंगाच्या केंद्रामुळे ह्याला बर्डस आय रॉट (पक्षाच्या डोळ्यासारख्या आकाराचे सडणे) हे सामान्य नावही आहे.

Recommendations

जैविक नियंत्रण

द्रव लाइम सल्फर किंवा कॉपरची फवारणी वसंताच्या सुरवातील कळ्या उमलण्यापूर्वी केल्यास बुरशीची जास्त लागण टाळता येते. ऑरगॅनिक सर्टफिकेशन प्रोग्रॅम मध्ये ही बुरशीनाशके वापरायची परवानगी आहे ना हे जरुर तपासा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. चांगल्या शेतीच्या सवयींचा अवलंब आणि वेळेत फवारलेल्या संरक्षक बुरशीनाशकाने अँथ्रॅकनोसचे नियंत्रण केले जाऊ शकते. कळ्या उमलत असताना जर द्रव लाइम सल्फरचा किंवा बोर्डो मिश्रणाचा फवारा मारल्यास अँथ्रॅकनोसची समस्या कमी होण्यात मदत होते. कॅप्टान, क्लोरोथॅलोनिल आणि मँकोझेबसारख्या नोंदणीकृत कीटनाशकांचा वापर नविन कोंबांसाठी आणि फळांसाठी करावा. कळ्या उमलल्यानंतर फ़ळे धरुन त्यांना रंग येईपर्यंत दर दोन अठवड्यांनी फवारणी करावी.

कशामुळे झाले

ऐलसिनो अँम्पेलिना नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे दिसतात. ही बुरशी कोंबात आणि बाधीत वेलींच्या सालीत विश्रांती घेते. वसंतात, ही बीजांडे निर्माण करते जी पावसाचे पाणी उडण्याने पसरतात. वारा आणि पाऊस बीजांडांना नविन, वाढणार्‍या पानांवर किंवा कोंबांवर घेऊन जातो. वेलींचे भाग बराच काळ ओले राहिल्याने (१२ तास किंवा जास्त) आणि तापमान २ ते ३२ डिग्री सेल्शियस असल्यास ह्या बीजांडाचे प्रजोत्पादन आणि नविन बीजांडे निर्माण होण्यास अनुकूल असते. जितके तापमान आणि आद्रता उच्च असेल तितक्या लवकर बुरशीची लागण पसरते आणि लक्षणे लवकर दिसायला लागतात. थंड हवेत बुरशीची वाढ कमी होते. पानगळती आणि थेट फळांना नुकसान होत असल्याने पीकावर आणि फळांच्या प्रतीवर परिणाम होतो.


प्रतिबंधक उपाय

  • सुर्यप्रकाश भरपूर मिळेल आणि हवा चांगली खेळती राहील अशा जागी पेरणी करा.
  • उपलब्ध असल्यास जास्त सहनशील प्रकारचे बियाणे वापरा.
  • वेलींमध्ये भरपूर अंतर ठेवा.
  • घरात वाढवलेल्या द्राक्षांसाठी रोगट कचरा पुरलेल्या जागी पालापाचोळा किंवा खोडाचे पातळ साल अंथरा.
  • शेतातील जंगली द्राक्षे काढुन टाका.
  • वेलींवर लक्ष ठेवा आणि रोगाची लक्षणे दिसणारी फळे अथवा रोपाचे भाग काढुन टाका.
  • हिवाळ्याच्या सुरवातीला जेव्हा पीके सुस्तावलेली असतात तेव्हा वेलींची छाटणी करा.
  • शेतातुन रोपांचे अवशेष काढुन टाका.
  • शेत नांगरुन रोपांचे अवशेष आणि रोगट फळे गाडुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा