लिंबूवर्गीय

लिंबावरील कावडी रोग

Glomerella acutata

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर तपकिरी ठिपके उमटतात.
  • डाग सुकुन गळतात.
  • कोवळे कोंब आणि पाने पूर्णपणे करपून गळतात.
  • कोवळी फळे देखील अकाली गळतात.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

लिंबावरील करपा फुल, नविन पान आणि फळांवर परिणाम करतो आणि त्याचे ठिपके सुरवातीला बारीक असतात पण नंतर वाढुन मोठ्या भागांना व्यापतात. पान आणि फळे बहुधा गळतात आणि फांद्या सुकतात ज्यामुळे "सुकलेले शेंडे" नावाची लक्षणे दिसतात. पानांवरील लक्षणे करपट ठिपक्यांसारखी दिसतात आणि त्यामुळे जर हे करपट भाग गळुन पडले तर त्यात बंदुकीने गोळी मारल्यासारखा परिणाम दर्शवितात. गंभीर संक्रमित कोवळे कोंब आणि पाने पूर्णपणे करपून गळतात. पुढे शेंड्यांचे कोंब वाळू लागतात आणि पाने विकृत आकाराची होतात. कोवळ्या फळांना संक्रमण झाल्यास फळे अकाली गळतात. उशीरा झालेल्या संक्रमणामुळे फळांवर खोल व्रण होऊन फळे विकृत होतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

ग्लोमेरेला अॅक्युटाटाविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत, माफ करा. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कप्तान किंवा मॅनेबवर आधारीत बुरशीनाशके ग्लोमेरेला अॅक्युटाटाविरुद्ध चांगले परिणाम देतात. फुलधारणेच्या सुमारास उपचार सुरु करा.

कशामुळे झाले

या रोगाच्या साथीचा पूर्ण अभ्यास केला गेलेला नाही. लिंबावरील करपा एका हंगामाच्या शेवटापासुन दुसऱ्या हंगामाच्या सुरुवातीपर्यंत वाळलेल्या फांद्यां आणि जुन्या पानांच्या व्रणांमध्ये जिवंत रहातो. पाणी उडण्याबरोबर पसरलेल्या बीजाणूद्वारे ते केवळ नविन भागांना संक्रमित करतात. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्गजन्य पदार्थ असल्यामुळे आणि पाने सतत एकमेकांशी घासत असल्यामुळे या रोगाचे नियंत्रण करणे अतिशय अवघड आहे.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाणांची निवड करा.
  • निरोगी झाडापासून धरलेले किंवा प्रमाणित स्रोतांकडील बियाणे वापरा.
  • लागवड करण्यापूर्वी रोपांवर रोगाचे लक्षण तपासा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी नियमितपणे बागेचे निरीक्षण करा.
  • पीक घेतल्यानंतर शेतातील पालापाचोळा आणि इतर अवशेष काढा किंवा जाळुन टाका.
  • बागेत हवा चांगली खेळती ठेवण्यासाठी लागवडीचे अंतर योग्य ठेवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा