बाजरी

पायरीक्युलारिया पानावरील ठिपके

Magnaporthe oryzae

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर राखाडीसर, पाणी शोषल्यासारखे व्रण येतात आणि कालांतराने मोठे होऊन करपतात.
  • पाने पिवळी पडून अकाली गळतात.
  • कणसाच्या दांड्यावर देखील संक्रमण होऊ शकते आणि रोग वाढल्यास ते कोलमडतात.

मध्ये देखील मिळू शकते

3 पिके

बाजरी

लक्षणे

पानांवर पाणी शोषल्यासारखे व्रण पहिल्यांदा दिसतात व नंतर हे व्रण मोठे होऊन करपतात. ह्या करपलेल्या भागांचे केंद्र राखाडी असतात. हे व्रण लंबगोलाकार किंवा हिऱ्याच्या आकाराचे आणि २.५ मि.मी. व्यासाचे असतात. बहुधा त्यांच्या कडा पिवळ्या असतात पण कालांतराने हे ठिपके मोठे होऊन करपत असल्याने केंद्रित वर्तुळांसारखे दिसतात. कणसाच्या दांड्यावर देखील संक्रमण होऊ शकते आणि रोग वाढल्यास ते कोलमडतात. कोलमडल्याने कणीस वाढत नाही आणि जर ती वाढलीच तर दाणे आक्रसलेले येतात. जास्त लागण झाली असता, खूपच क्लोरोसिस होते ज्यामुळे कोवळी पाने अकाली मरतात. गंभीर संसर्गामध्ये पाने पिवळी पडून वळतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

रोपवाटिकेत बोर्डो मिश्रण ८-१० दिवसांच्या अंतराने आणि शेतात १४ दिवसांच्या अंतराने वापरण्याची शिफारस करण्यात येत आहे. बहुतेक नुकसान कणसांच्या दांड्यावर संक्रमण होण्याने होत असल्याने, कणीस लागायच्या आधीपासुन फवारणी करणे संसर्ग कमी करण्यासाठी महत्वाचे आहे. लसणीचा अर्क, नीम अर्क किंवा हिनोसॅन (ऑरगॅनोफॉस्फेट)ची फवारणी देखिल बुरशीचा संसर्ग कमी करतात. ऑरगॅनोमेर्क्युरियलची बीजप्रक्रिया सुद्धा संभाव्य रोगाची क्षमता कमी करण्यास मदत करते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ट्रायसायक्लाझोलच्या बरोबर हेक्झाकोनाझोल असणारी बुरशीनाशके ह्या बुरशीचा नियंत्रण करण्यात परिणामकारक आहेत. प्रॉक्लोरॅझच्या उपचारांमुळे पुरेशा बुरशीचे प्रमाण कमी करण्यात यशस्वी झाले आहेत. पोटरी अवस्थेच्या काळापासुनच ही मिश्रणे अठवड्याच्या अंतराने तीनदा वापरलायला हवीत, तरच शेताच्या परिस्थितीवर परिणामकारकरीत्या नियंत्रण करता येईल आणि उत्पादनात वाढ होईल.

कशामुळे झाले

मॅग्नापोर्थे ओरिझाए नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात. ही बुरशी झाडाच्या अवशेषात किंवा संक्रमित कणसाच्या आक्रसलेल्या दाण्यात रहाते. प्रामुख्याने ह्या रोगाचा प्रसार बीजाणू वार्‍याने उडुन होतो. हे बीजाणू तण किंवा इतर पर्यायी यजमान असलेल्या गवतजन्य धान्याच्या झाडातुन येतात. संक्रमित बियाणे रोपवाटिकेत संसर्ग पसरवितात व कालांतराने मुख्य शेतात प्रवेश करतात. दमट वातावरण ह्या रोगास अत्यंत अनुकूल असतो आणि हिरवट-राखाडी रंगाच्या वाढीत बीजाणू असतात. ह्या बीजाणूची उगवण आणि यजमान पेशींत शिरकाव करणे हे २५ डिग्री सेल्शियस तापमानात सगळ्यात जास्त होते. संक्रमित कणसातील दाण्यात ही बुरशी असल्यामुळे, ही बियाणे पुढच्या मोसमात वापरु नयेत.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी झाडापासून धरलेले किंवा प्रमाणित स्रोतांकडील बियाणे वापरा.
  • ह्या रोगाच्या लक्षणांसाठी रोपवाटिका आणि शेताचे नियमितपणे निरीक्षण करा.
  • संक्रमित झाडे लगेच काढुन नष्ट करा.
  • कापणीनंतर शेतीची मशागत करून झाडांची अवशेष नष्ट करा.
  • शेतात आणि आजुबाजुला असलेले तण आणि पर्यायी यजमानांचे नियंत्रण करा.
  • संक्रमित शेतातील धान्य बियाण्यासाठी वापरू नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा