कापूस

कपाशी वरील कवडी (अँथ्रॅकनोज)

Glomerella gossypii

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर काळ्या सुकलेल्या कडांसकट लालसर ते फिकट तपकिरी ठिपके दिसतात.
  • फांद्यांवरील डागांमुळे झाडाची मर होते.
  • बोंडांवर पाणी शोषल्यासारखे ठिपके येतात जे मोठे होऊन खोलगट, पिवळ्या डागात बदलतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

कापूस

लक्षणे

कपाशीच्या वाढीच्या कोणत्याही टप्प्यावर कवडी होऊन सर्व भागांना प्रभावित करु शकते. रोप बुरशीनी संक्रमित झाले असता काळ्या करपट कडासकट बारीक लालसर ते फिकट तपकिरी गोलाकार ठिपके अंकुर आणि प्राथमिक पानांवर येतात. जर डाग जमिनीलगटच्या भागात आले तर खोड पूर्णपणे वेढले जाते, ज्यामुळे रोप किंवा कोवळ्या झाडांची मरगळुन मर होते. मोठ्या झाडात संक्रमण झाले असता खोड आणि सालीवर भेगा पडुन चिरते. प्रभावित बोंडांवर बारीक, गोलाकार, पाणी शोषल्यासारखे ठिपके येतात जे आर्द्र हवामानात मोठे होऊन खोलगट पिवळे ते तपकिरी डागात बदलतात. रुई गुंतते आणि धाग्याचा ठिसुळ गुंडाळा होऊन पिवळा ते तपकिरी पडतो. संक्रमित बोंड लहानच राहून वाळणे व अकाली फुटणेही सर्वसामान्य आहे.

Recommendations

जैविक नियंत्रण

आजपर्यंत तरी या रोगाविरुद्ध कोणतेही जैविक नियंत्रण पद्धती माहितीत नाही. जर आपणांस हिच्या घटना कमी करण्याची किंवा लक्षणांची गंभीरता कमी करण्याची कोणतीही यशस्वी पद्धत माहिती असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कप्तान, कार्बोक्झिन किंवा थायरम (बहुधा २ ग्रॅम प्रति किलो बियाणे) ची बीज प्रक्रिया केली असता, रोगाच्या घटना कमी होण्यास मदत मिळते. बोंडधारणेच्या काळात मँकोझेब, कॉपर ऑक्झिक्लोराइडची फवारणी केल्यास देखील लक्षणांची गंभीरता कमी होते.

कशामुळे झाले

कोलेक्टोट्रायकम गॉसिपियम जिला ग्लोमेरेला गॉसिपि असेही म्हटले जाते, या बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात. ती एका हंगामातुन दुसर्‍या हंगामापर्यंत बियाणांवर किंवा जमिनीतील संक्रमित बियाणांत सुप्तावस्थेत राहू शकते आणि हवामान अनुकूल झाल्यानंतर तिची वाढ परत सुरु होते. संक्रमित झाडांचे अवशेष, कुजलेले बोंड किंवा दूषित बियाणे याद्वारे तिचा प्रसार दूरवर होऊ शकतो. शेताच्या आत, दुय्यम संक्रमण वारा, पावसाचे उडणारे थेंब आणि कीटकांद्वारे हिच्या बीजाणूंचा प्रसार होतो. अॅरिस्टोलोचिया ब्रॅक्टेयाटा आणि हिबिस्कस डायव्हर्सिफोलियस या तण यजमानांत देखील ही बुरशी जगु शकते. या बुरशीच्या वाढीसाठी ऊबदार(२९ ते ३३ डिग्री सेल्शियस) तापमान आणि आर्द्र हवामान अनुकूल असते. बोंडधारणेच्या काळात लांबलेला पाऊस किंवा दाट लागवड या रोगाच्या वाढीला मानवते.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या देशातील क्वारंटाईनच्या नियमांविषयी जागरुक रहा.
  • फक्त निरोगी आणि बुरशीमुक्त बियाणे किंवा कलमे वापरा.
  • आपल्या भागात ह्या रोगास प्रतिकारक वाण मिळत असल्यास ते लावा.
  • सरकी काढलेली बियाणेच लावा.
  • शेतातुन पाण्याचा निचरा चांगला होऊ द्या.
  • ह्या रोगास, रोपांना जास्त प्रतिकारकता मिळण्यासाठी आणि जमिनीचा कस सुधारण्यासाठी कंपोस्ट द्या.
  • शेतात पाणी साचू देऊ नका आणि जास्त पाणी देणे टाळा.
  • तुषार सिंचन टाळा.
  • रोपे ओली असताना शेतात कामकरु नका.
  • तण आणि संभावित पर्यायी यजमान काढुन टाका.
  • पिकत असलेली फळे जमिनीला स्पर्श करु देऊ नका. संक्रमित झाडांचे अवशेष काढुन जाळुन टाका.
  • यजमान नसलेल्या पीकांबरोबर २-३ वर्षांसाठी पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा